|
पु. १ ठाव ; ठिकाण ; स्थान ; आश्रय ; आसन . २ अन्न वाढवण्यासाठीं ठेवलेलें पान , पत्रावळ यावरून . ३ ( ल ) जेवण्याचें ताट ; भोजनपात्र ; पत्रावळ . - स्त्री . ४ ( वादन ) मंदताल ( ध्रुपद म्हणतांना , पखवाज वाजवितांना ) सावकाश वाजविण्याचा किंवा म्हणण्याचा प्रकार ; विलंबित ; मध्यलयीच्या एका आवर्तनास लागणारा वेळ . ५ ( राजा . ) व्यालेल्या गाईचें दूध व वासरूं या दोहोस म्हणतात . पेजें ( दूध ) व जावपें ( वासरूं ). ६ प्रकार . - शर . ७ गुरें ; भांडीं इ० मोजतांना संख्यादर्शक म्हणून हें क्रियाविशेषण लावितात . उदा० दोन ठाय , तीन ठाय . [ सं . स्थान ] ठायीं घालणें - ठिकाणीं नेमणें ; ठेवणें ; कायमचें धरणें . नको माझे कांहीं । गुणदोष घालूं ठायीं । ठायीं करणें - सिध्द करणें . आत्मा अविकारी पाही । येणें निरूपणें केलें ठायीं । - एभा २८ . ४९६ . ठायीं ठायीं - ठिकठिकाणीं ; जिकडे तिकडे . ठायीं पडणें - १ पत्ता लागणें ; सांपडणें ; आढळणें ; उघडकीस येणें . ठायीं न पडे कै गेली । - मुरंशु ३३३ . २ मेळ असणें ; यथायोग्य मणें ; अनुकूल होणें ; स्वभाव जमणें . औषध ठाई पडिलें देव पडना . ठायींचा - वि . मूळचा . ठायक - वि . ( व . ) नेमका . तेथें ठायक जा . ०चूक वि. १ चुकलेला ; भलत्याजागीं ठेवलेला ; भलताचे ; विपरीत . २ हरवलेली वस्तु कोठें ठेविली त्याचें भान नसणारा अथवा ती वस्तु . ३ स्वत : स भटक्या समजणारा . ०ठिकाण ठिकाणा - नपु . जागाजुगा ; घरदार ; वसति . ०ठिकें वि. स्थिर ; दृढ . तेथ राहोनि ठायठिकें । - ज्ञा १० . ७४ . ०दुगण दुगन दुगूण दुगून - स्त्री . ध्रुपद इ० सावकाश म्हणण्याचा ते ध्रपद इ० दोन वळ म्हणणें किंवा मृदंगादि वाजविणें . ०पालट पु. राहत घर बदलणें ; थारेपालट . ०बसल्या क्रिवि . बसल्या बसल्या ; बसल्याजागीं ; घरबसल्या ; एके ठिकाणीं बसून ; आरामशीर ( चाकरी , रोजगार , धंदा , व्यापार , पगार , दरमहा , जेवण , गुजराण इ० शब्दाबरोबर योजतात ). ०वरी क्रिवि . येथपर्यंत . कर्मी हा ठायवरी । - ज्ञा १८ . ६८ . ठायींठाव , ठायेठाव , ठायेंठाव - अ . जेथल्यातेथें ; नेमका . त ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं । - ज्ञा ६ . २०४ . पूर्ण . तैं ठायेठावो विळुचि होये । - ज्ञा ८ . १५६ . जसा हवा तसा . तेव्हां ये वासनागर्भे । ठायेठावो । - ज्ञा १४ . ९४ . ठायेंठिकें - अ . ठाकठीक .
|