|
वि. ( शब्दशः ) शिस्तीचा ; व्यवस्थित ; नियमित ; ऋजुमार्गी ; नियमाप्रमाणें चालणारा ; शिक्षित . ( रूढ ) विद्वान् ; सभ्य ; संभावित . २ उत्कृष्ट ; वरिष्ठ ; श्रेष्ठ ; आदरणीय ; पूज्य . ३ उर्वरित ; राहिलेला ; वाकीचा ; शेष . उदा० यज्ञशिष्ट ; हुतशिष्ट . हें शिष्ट मध्दन म्हणे धर्मात्मा भावितें चुकेल कसें । - मोसभा ४ . ५२ . [ सं . शिष् ] म्ह० शिष्टागमने अनध्यायः संभावित , पूज्य लोक आले असतां आपला व्यवसाय बंद , बाजूला ठेवावा . ०मंडळ न. प्रेषित किंवा प्रतिनिधीमंडळ . विनंति करण्याकरितां , भेट घेण्याकरितां , शिष्टाई करण्याकरितां पाठविलेली मंडळी . ( इं . ) डेप्यूटेशन . ०संप्रदाय पु. संभावित , श्रेष्ठ , पूज्य लोकांची रीत , मार्ग , पध्दति , वागणूक , चाल . ०सभा स्त्री. श्रेष्ठ , बडया , सन्मान्य लोकांची सभा , मंडळ , समाज . ०संभावना स्त्री. १ शिष्ट लोकाचें आदरपूर्वक स्वागत , वागवणूक ; सत्कार ( विवाह , यज्ञादि प्रसंगीं आहेर , देणगी , दान वगैरे देणें ) २ अहेर ; देणगी . ( अशा प्रसंगीं दिलेली ). शिष्टाइकी , शिष्टाई , शिष्टायकी - स्त्री . १ श्रेष्ठपणा ; मोठेपणा ; मान ; पूज्यता ; आदरणीयता . २ नियमितपणा ; व्यवस्थितपणा ; मान ; पूज्यता ; आदरणीयता . २ नियमितपणा ; व्यवस्थितपणा ; शिस्त ; चोखपणा . ३ संभावितपणाची मध्यस्थी ; विवाहादि व्यवहारांत जुळवून आणण्याकरितां केलेली मध्यस्ती , सांगितलेल्या समजुतीच्या गोष्टी वगैरे ; दोन पक्षांत ऐक्य घडवून आणण्याकरितां केलेली मध्यस्थी , बोधपर कथन वगैरे . शिष्टागम , शिष्टाचार - पु . १ परंपरागत आलेली सभ्यपणाची , संभावीत रीत , पध्दति , चाल . शिष्टागम विधानें । विविध याग वितानें । - ज्ञा १५ . १८९ . २ विवाहादि प्रसंगी यजमानास केलेला अहेर , देणगी वगैरे . ३ शास्त्रांत प्रत्यक्ष न सांगितलेले परंतु रूड आचार ; नियम , रीत , पध्दति . शिष्टाचार करणें - लोकव्यवहारास अनुसरून , वाईट दिसूं नये म्हणून केवळ एखादी गोष्ट वरवर करणें . शिष्टावणें - अक्रि . श्रेष्ठत्वास चढणें ; मान्यता पावणें ; योग्यता नसतां स्वतःस मोठें समजणें ; उगाच मोठेपणा अंगीं आणणें .
|