Dictionaries | References

सोड

   
Script: Devanagari

सोड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also the sum or matter remitted, the abatement. 2 Letting go freely; setting at large; or suffering to proceed, without curb or check, in his own way or course.

सोड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Remission. Letting go freely.

सोड     

 स्त्री. १ कर्ज इ० ची सूट ; अशी सूट दिलेली रकम . २ मोकळीक देणें ; अटकाव न करतां जाऊं देणें ; उपेक्षेची मोकळीक ; सवलत ; मुक्तता . ३ परवानगी . ४ काडीमोड ; सोडचिठ्ठी ( लग्नाची ). [ सोडणें ]
०खत   चिठ्ठी पत्र --- स्त्री . १ सोड्णुक्तीचें पत्र ; सांडखत ; आपल्या मालकींतून सोडलेल्या ( गांव , शेत , किल्ला इ० च्या ) वस्तूच्या मोकळिकेविषयीचें आज्ञापत्र ; सांडपत्र ; सृटपत्र . २ ज्यावरुन कोणी मनुष्य आपला विवाहित संबंध तोडतो असा लेख .
०धांव   - स्त्री . ( उद्योग धंदा ) सोडून , निघून जाणें , टाकून , पळून जाणे ; धरसोड करणें .
०पेंढी   - स्त्री . मोठ्या ( गवत इ० च्या ) भार्‍यांतून विक्रीसाठीं बांधलेली लहान पेंढी .
०बांध   - स्त्री . १ वरचेवर मोकळें करणें व बांधणें . २ असल्या प्रकारचा धंदा , नोकरी , घोड्यांची सोडबांध मजकडे होती , अतां निराळा घोडक्या ठेवला
०मुंज   - स्त्री . मुलाच्या उपनयनाचे वेळीं त्याचे कमरेस जी मुंज ( गवताची दोरी ) बांधलेली असते ती सोडण्याश विधि , गृहस्थाश्रमांत प्रवेश करण्याची मोकळीक ; समावर्तन संस्कार .
०मोकळ   - स्त्री . १ सोडून मोकळें करणें ( गवताचा भारा इ० ). २ काम इ० ची साधारण मोकळीक ; सोडवणूक ; पशु , नोकर इओवर फारसा दाब न ठेवणें ( क्रि० करणें ; देणें ) ३ कर्ज ; इ० पैकी कांही रकम सोडून देणें . ४ सोडमोकळीक ; विसकटलेली , मोकळीक दिलेली विसाव्याची , फुरसतीची स्थिती .
०वण   वणी वणूक --- स्त्री . १ मुक्तता ; मुक्त होणें ; मुक्ततेची स्थिति ; मोकळीक ; स्वतंत्रता ; सुटका २ मुक्ततेचा कोणताहि उपाय . ३ पळवाट ; छिद्र ; अपवाद . ४ सोडवणी ; मळ्यांतील पाटांतून वहाणारे पाणे ( शेलण्यानें नव्हे ). वणें , विणें --- १ जाऊं देणें ; सुटे असें करणें , मोकळे करणें ; बंधमुक्त करणें . २ कांहीं प्रसंगीं भिंतीवर चित्रें , रांगोळी , आकृति ; प्रतिमा इ० काढणें , रेघोट्या ओढणें . ३ मालकाडून काधून घेणें , ४ गूढ , उखाणा इ० उकलणें , ५ ( गणित ) प्रश्नाचें बरोबर उत्तर देणें ,
०वून   --- हातचा राखून ठेवणें ; पळवाट काढून ठेवणें ; सुटण्याच्या उपायाची तरतूद पूर्वीच करुन ठेवणें ; सुटण्याच्या उपायाची तरतूद पूर्वीच करुन ठेवणें .
ठेवणें   --- हातचा राखून ठेवणें ; पळवाट काढून ठेवणें ; सुटण्याच्या उपायाची तरतूद पूर्वीच करुन ठेवणें ; सुटण्याच्या उपायाची तरतूद पूर्वीच करुन ठेवणें .
०सांडे  स्त्री. कर्ज इ० ची सूट ; या सुटीची रकम सोडण न . १ ( को .) नारळाचें चोड ; नारळावरील तंतुमय आवरण . २ ( ल .) हट्टी ; चिकट माणूस . सोडणी स्त्री . १ सोडवणूक . २ ( ल .) मोक्ष . - ज्ञा १८ . ४४ . सोडणूक स्त्री १ मुक्तता २ ताटातूट ; वियोग ; संबंध सोडणें . ३ जाऊं देणें . ४ पळवाट ; सुटण्याचा मार्ग . सोडणें उक्री . १ मोकळें करणें ; खुलें करणें ; बंधन , करार यांतून मुक्त करणें ; वचक , घोटाळा , त्रास ; संकट यांतून वांचतिणें . २ वेगळें , विभक्त होणें ; ताटातूट करणें , गाठ , बंधन इ० खुलें करणें ; उलगडणें ; संबंध , जोडणी , मांडणी इ० विजोड करणें , ३ सामान्यंत : उलगडणें ; संबंध , जोडणी , मांडणी इ० विजोड करणें . ३ सामान्यंत : जाऊं देणें ; असूं देणेम ; राहूं देणें ; सूट ( कर्ज , दोष ) देणें , सोडून देणें , हात काढून घेणे ; मुक्त , सहन , माफ , क्षमा करणे , शरण येणें ; टाकणें ; फेकणें ; ओतणें ; गाळणें ; निथळणें ( घाम , इ० ); शिलगाविणें ( तोफ , बंदूक इ० ); सुटणें पहा . ४ धावपिणें ; पळविणें दमविणें ( घोडा , इ० ). ५ कोणत्याहि धातृच्या ऊन प्रत्ययांत रुपापुढें हें क्रियापद योजल्यास ती क्रिया पूर्णपणें करणें असा अर्थ होतो . टाकणें पहा . उदा०करुन सोडणे ; देऊन सोडणें इ० ६ प्रगट करणें . विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगनिद्रा। ज्ञा १७ . १ म्ह० ( व .) सोडला तर पळतो , धरला तर चावतो ( साप ). दुष्टाशीं निकट संबंध ठेवल्यास आपली इज्जत घेतो , न ठेवल्यास तो शेफारतो . [ सं . छोरणम् ‍ \

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP