Dictionaries | References इ इंग्रजी कायदा, पगाराचा वायदा Script: Devanagari Meaning Related Words इंग्रजी कायदा, पगाराचा वायदा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इंग्रजी राज्यांतला सर्वात मोठा फायदा असा लोकांना जो वाटूं लागला तो म्हणजे महिन्याच्या महिन्याला पहिल्या किंवा एका ठराविक तारखेला पगार मिळणे होय. बिनसरकारी नोकरीत अशी व्यवस्था बहुधा असत नाही. यामुळे सरकारी नोकरी सर्वांत चांगली असा समज कायम होऊन बसला. पूर्वी पेशवाईत पगार सालिना ठरविला असूनहि तो ज्या त्या साली पुरा मिळत नसे. बारा महिने नोकरी घेऊन अकरा महिन्यांचा पगार दिला जाई. इंग्रजी आमदनी आल्यापासून महिन्याच्या महिन्याला सर्व पगार व नोकरीनंतर पेनशन हे फायदे साहजिकच डोळयांत भरले.इंग्रजी राज्य हे कायद्याने निगडित असून सर्व कामे नियमाप्रमाणें चालते व पगार अगदी नियमितपणें मिळतो. पूर्वीच्या राजवटीत पगार वेळच्यावेळी मिळत नसे. परंतु इंग्रजी राज्याबद्दल लोकांच्या नजरेस जर कोणती गोष्ट विशेष प्रामुख्याने आली असेल, तर ती पगार अगदी महिन्याच्या पहिल्या तारखेस मिळतो ही होय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP