|
न. कांडण्या - सडण्यासाठीं दगड खोदून अगर लांकडाचा ओंडा पोखरुन जो खोलगट भाग करतात तो . पीठु करणौउ एकें वेळें , उखळीं वसुंधरेचा ॥ - शिशु ९१४ . उखळांत घालून करी कांडण । आपुल्या करें मज देखतां । उखळ रोंविलें धर्मशाळे । भलती कांडी भलत्या वेळे ॥ - मुरंशु ४१३ . [ सं . उलूखल ; प्रा . उक्खल ; तुल० का . होरळु - उरळु = लवंडणें + कल्लु = दगड वरकल्ल ] न. एक मुलींचा खेळ . - मखे ३४४ . स्त्री. जमीनीची पहिली नांगरणी . फाळणी . [ सं . उत्खनन , उत्स्खलन ] ०पांढरें - वैभव प्राप्त होणें ; नशीब उघडणें ; अमूप द्रव्य मिळणें ( गरीबाच्या घरीं उखळाला कांहीं काम नसतें तेव्हां तें पांढरें असत नाहीं यावरुन ). ( एखाद्याच्या ) बेंबीचें उखळ - चमचमीत खाद्य पेयें मिळाल्यामुळें दोंद सुटणें . ( बेंबी उखळासारखी खोल होणें ); शरीर पुष्ट होणें . होणें - वैभव प्राप्त होणें ; नशीब उघडणें ; अमूप द्रव्य मिळणें ( गरीबाच्या घरीं उखळाला कांहीं काम नसतें तेव्हां तें पांढरें असत नाहीं यावरुन ). ( एखाद्याच्या ) बेंबीचें उखळ - चमचमीत खाद्य पेयें मिळाल्यामुळें दोंद सुटणें . ( बेंबी उखळासारखी खोल होणें ); शरीर पुष्ट होणें . ०मुसळाशीं पडणें - भांडणार्या व झगडणार्या माणसाचा सहवास घडणें . वाक्यप्रचार - उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा = घालमेल , अफरातफर करणारा ; कोणाच्या तावडींत न सांपडणारा , अर्थात द्वाड माणूस . उखळांत डोकें घालणें , देणें - जीव अतिशय धोक्यांत घालणें ; संकट , अनर्थ गुदरण्याच्या स्थितींत असणें , जाणें . म्ह० उखळांत डोकें घातल्यावर मुसळाला कोण भितो = स्वत : पत्करलेल्या साहसाचे परिणाम भोगावयास न कचरणें . गांठ पडणें - भांडणार्या व झगडणार्या माणसाचा सहवास घडणें . वाक्यप्रचार - उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा = घालमेल , अफरातफर करणारा ; कोणाच्या तावडींत न सांपडणारा , अर्थात द्वाड माणूस . उखळांत डोकें घालणें , देणें - जीव अतिशय धोक्यांत घालणें ; संकट , अनर्थ गुदरण्याच्या स्थितींत असणें , जाणें . म्ह० उखळांत डोकें घातल्यावर मुसळाला कोण भितो = स्वत : पत्करलेल्या साहसाचे परिणाम भोगावयास न कचरणें .
|