Dictionaries | References

उणा

   
Script: Devanagari

उणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Deficient or scanty; less than the just number or quantity; falling short of. 2 Defective; wanting the just quantity. 3 Wanting or absent; required to complete. 4 Inferior; lower in value or excellency. 5 Low or mean; unbecoming one's station or character.

उणा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Scanty; defective; wanting. Inferior in value or excellence.

उणा

 वि.  अयोग्य , सदोष ;
 वि.  उणे , व्यंग ;
 वि.  अपुरा , अपूर्ण , कमी .

उणा

 वि.  
   कमी ; अपुरा ; नेहमीपेक्षां कमी ; विवक्षित परिमाणापेक्षां कमी . काय उणें कां करितोसि चोरी । - तुगा ११९ . गुणा न म्हणतां उणा अधिक आदरें सेविती - केका २३ .
   अपुरा ; अपूर्ण ; सदोष ( कार्य , सामग्री ); अपुरी असलेली ( गोष्ट ). शेताचा सरंजाम जमविला खरा , परंतु उणा आहे ; कांकीं आंत बैल उणे आहेत म्हणून .
   हलका ; कमी योग्यतेचा , प्रतीचा . म्हणौनि आसुरी उणी संपदा नव्हे । - ज्ञा १६ . २५६ . वैश्य जातीपेक्षां शूद्र जाति उणी .
   मानहानिकारक ; अयोग्य ; एखाद्याचें व्यंगदर्शक ( शब्द , भाषण , इ० ). बोले शब्द उणा विदेह पिसुणामध्यें तदा त्या गुणा ॥ - आसी ५१ .
   नपूंसक . वडील बाईल म्हणे उण्या । धाकटी बाईल म्हणे सुन्या ॥ - नामदेवनाटक १९ .
   गैरहजर ; अविद्यमान ; कमती . [ सं . ऊन ]
०अप्रा वि.  अपुरा ; विवक्षित मापाहून कमी ( कापड ). उणा पहा . [ उणा + अपुरा ]
०दुणा वि.  
   अपमानकारक ; कमी अधिक ; तिरस्कारदर्शक ; मर्मभेदक ( शब्द , भाषण , बोलणें ). कोणाला उणेंदुणें बोलणें बोलूं नये
   सरासरी . उणापुरा पहा . [ सं . ऊन + द्विगुण ]
०पुरा वि.  कमीअधिक ; जवळजवळ ; अजमासें , सुमारें ; सरासरी . मला पुण्यास आल्याला उणापुरा एक महिना झाला . [ सं . ऊन + पूर्ण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP