Dictionaries | References

कडकडीत

   
Script: Devanagari

कडकडीत

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : हुनहुनीत

कडकडीत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Rough. Ex. तव तें वल्कलें क0 कठीण ॥ नेसतां न येति सीतेलागून ॥ The common word is खरखरीत or खडबडीत.

कडकडीत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Intensely hot. Minutely exact and correct-a person or conduct. Hard, severe, rigorous. Strict or strikingly real.

कडकडीत

 वि.  कढत , प्रखर , फार गरम , रखरखीत ( पाणी , ऊन ;)
 वि.  काटेकोरपणे , न चुकता , नैष्ठिक ( व्रत , नियम पालन );
 वि.  अत्यंत पवित्र , फार सोवळा ( आचार धर्म );
 वि.  मोडण्यास कठीण , शुष्क ( भाकरी , कडबोळी );
 वि.  कुडकुदुम् , कुडकुडीत ( चावताना कडकड आवाज होणारे );
 वि.  परखड , स्पष्ट ( भाषण ).

कडकडीत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  अतिशय कठीण, न खातापिता केलेला   Ex. ती हरताळकेला कडकडीत उपास करते.
 adjective  कडकड करणारा   Ex. मशीनमधून शंभराचे कडकडीत नोटा निघाल्या.
MODIFIES NOUN:
पदार्थ
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
hinकड़कड़ाता
kanಕಡ ಕಡ ಶಬ್ದ ಮಾಡುವ
malപടപടാന്നിരിക്കുന്ന
   See : गरमगरम

कडकडीत

 वि.  १ दाताखालीं फोडतांना आवाज देणारा ; कुडकुडीत ; कुडूंकुंड वाजणारे ( तळलेले वाटाणे वगैरे ). २ अतिशय उष्ण ; कढत ( ऊन , पाणी इ० ). अति प्रखर ; ऐन ( दुपार ). ' कडकडित दुपारी चेंतला अग्निभारी । ' - मुंव १२६ . ३ ताजी ; तयार ; पक्की ; चांगली अवगत ( विद्या , ज्ञान ); त्या विद्येनें भूषित ( माणुस ). ४ भाडभीड न ठेवतां केलेलें ; स्पष्ट ; मोकळें खुलें ( भाषणें , व्यवहार ); अशा स्वभावाचा ; स्पष्टवक्ता ; तापट ( मनुष्य ). ५ अक्षरश ; शास्त्रोक्त आचरविचार पाळणारा ; फार सोवळा ; अत्यंत शुद्ध ; पवित्र ; कट्टा ( माणुस , सोवळें ) ' रामायणाचें वैशिष्ट स्थापन करणार्‍या अनेंक गोष्टीपैंकी कडकडीत चातुर्वर्ण्य ही एक गोष्ट असल्यामुळें आम्ही या गोष्टीस फार महत्व दिलें आहे .' - मसाप २ . २ . ११ . ' स्वतः पंतचरित्रकारहि तत्पूर्वीच्या पंतलेखकाचे बाबतीत कडकडीत सोंवळें राहिले आहेत असें नाही ' - भक्तमयूर केका प्रस्तावना १५ . ६ वाळलेलें आणि कडकड आवाज करणारें ; शुष्क ( कापड ). ७ नैष्ठिक ; अत्यंत नियमित ; न चुकतां पाळलेलें ; अतिशय कठिण ( व्रत , ब्रह्माचर्य , तपश्चर्या , वैराग्य इ० ). ८ खरेखुरें ; जागृत ( पिशाच्च , वारें , संचार ). ९ ( काव्य ) खडबडीत ; रखरखीत . ' तंव वल्कलें कडकडीत कठिन । नेसतां नये सीतेलागुन । ' - रावि १० . १४९ . ( ध्व . कडकड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP