|
उ.क्रि. १ ओरखडणें ; ओरबडणें ; खरखरीतपणें चोळुन काढणें ; घासटणें . २ खुरारपणें ; उपटणे ( गवत , तण इ० खुरप्याने ). ३ निष्काळजीपणानें , खरखरीतपणें ( खरखर वाजत ); हजामत करणें , भादरणें . ४ ओबडधोबड रीतीनें कसें तरी कच्चें , घाईनें लिहिणें , टिपणें टांचणें . ' जन्माच्या कर्मी कुठें कोटी आठवली ती सुद्धां शिळी , पण तिच्या जिवावर चार पानें खरडलीं . ' - नाकु ३ . ४५ . ५ संक्षिप्त ठांचण करणें ; सारांश , मुद्दे लिहुन काढणे . ६ घसाफशीनें ओढणें , नांगरणे , दळणें इ० ७ चेंचणें ; चुरणें ; ठेंचणें . खंरंगटणें पहा . ८ खरड काढणें ; पाण उतारा करणें . ९ ( ल .) समुळ उच्छेद करणें ; खरडून काढणे . शत्रुस तेथुन खरडुन काढला .' - अक्रि ( प्राणी .) ढुंगणावर सरकाणें , चालणें ; खरचटणें ; फरफटणें ; सरपटणें . अ.क्रि. खुरटणे ; भुईंत जाणे : वाढ खुंटणें . ' हें झाड भुईशीं खरडतें .
|