Dictionaries | References

घडणें

   
Script: Devanagari
See also:  घडून येणें

घडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ghaḍaṇē or ṅghaḍūna yēṇēṃ v i To happen, occur, fall out, come to pass: also to be accomplished or done by.
   .
   ghaḍaṇēṃ v c To touch. Ex. तो शूद्र मला घडला. Though transitive, it admits not of नें and inflects not the agent.

घडणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Form, forge, draw up. Touch.
 v i   Happen, occur, fall out.

घडणें

 उ.क्रि.  १ हातोडयानें ठोकून ठोकून , तासून तासून , भट्टींत तापवून , कोरून आकार देणें , बनविणें ; तयार करणें ; निर्माण करणें ; उत्पन्न करणें . शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं कैसें पां चढिजे । - ज्ञा १८ . १७६७ . ते लावण्याची लतिका । तिसी घडेअंबिका । - कथा १ . ३ . ३६ . २ ( माहिती , हिशेब , जमाखर्च ) लिहून काढणें ; नमूद करणें ; तयार करणें ; आकारणें . [ सं . घटन ; प्रा . घडण ; सिं . घडणुं ; गुज . घडवुं ]
 उ.क्रि.  १ स्पर्श करणें ; शिवणें . तो शूद्र मला घडला . या क्रियापदाचा प्रयोग करतांना कर्त्याची नेहमीं प्रथमाच पाहिजे . कर्ता तृतीयेचा नसावा . २ मेटणें नातरी उद्यानीं माधवी घडे । - ज्ञा १ . ४३ . [ सं . घृष - घृष्ट - घट्ट = घांसणें ; स्पर्शणें ]
 अ.क्रि.  १ जुळून येणें ; होणें ; बनणें ; अस्तित्वांत येणें . २ उत्पन्न होणें . हे आंगा तंव घडले । जीवींचि आथी जडले । - ज्ञा ३ . २५५ . ३ पार पडणें ; शेवटास जाणें . तेथें वाग्निश्चयो घडे कैचा । - एरुस्व २ . २९ . सुसंगति सदा घडो । - केका ११८ . ४ मिळणें ; होणें ; जुळून येणें ; साधणें . घडे शत्रु लोकांत त्याचा प्रवेश । ५ ( एखाद्याकडून एखादी गोष्ट ) सिध्दीस , तडीस जाणें ; आमच्या हातानें तुमचें कार्य जितकें घडेल तितकें करूं [ सं . घटन ; प्रा . घडण ]

घडणें

   घड मोड, सोनार धड
   दागिन्यांची नेहमी घडामोड केली, जुने मोडून नवे करीत गेले की, प्रत्‍येक वेळी सोनाराला मात्र लाभ होतो व मालकाचे सोने कमी कमी होत जाते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP