Dictionaries | References

घुमणें

   
Script: Devanagari

घुमणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 To work or ferment;--used of हरीक. Ex. हे हरीक कांहींसे घुमतात निवळले म्हणजे चांगले होतील. 5 To play, stir, move; to be in lively action--a demon in possession. 6 To coo, to cry as a pigeon: also to make a loud and deep singing--birds. Ex. पंचम स्वरें पक्षी घुमति ॥ राघव स्मरणें गरजोनिया ॥. Also जेवीं घुमति पारवे पंक्ति ॥ तेवीं वाजति पादभूषणें ॥.

घुमणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To resound. ring, fill the aira loud and deep sound. To swell and heave. To play, stir, move; to be in lively action-a demon in possession. To coo, to cry as a pigeon.

घुमणें     

अ.क्रि.  १ ( तोफ इ० कांचा व गंभीर शब्द ) दुमदुमणें ; दणाणणें ; घोषणें ; प्रतिध्वनियुक्त होणें ; हवेंत भरून राहाणें . जंव नाशु नाहीं पवना । तंव वाचा आथी गगना । म्हणऊनि घुमे । - ज्ञा ६ . २७८ . २ ( वाद्यें इ० कांनीं ) आंतल्या आंत बराच वेळ खोल आवाज काढणें . ३ ( वाद , गप्प , आजार , आवाज , खेळ इ० ) रेंगाळणें ; लांबत जाणें ; चिघळणें ; रेंगणें . ४ ( पिशाच्चसंचारामुळें , थंडीच्या हुडहुडीमुळें , अति श्रमामुळें , रेंगाळलेल्या दुखण्यामुळें , हरीक इ० कांचा माद चढल्यानें ) हूं हूं करणें ; घापलणें ; उसासणें ; लाहक्या देणें ; धापा , सुस्कारे टाकणें ; कुंथणें . तरवारीनें कैक मेले कैक घायाळ तिथें घुमती । - विवि ८ . ४ . ८० . ५ ( हरीक इ० धान्य , पदार्थ ) चिवचिवणें ; उमळणें ; खतखतणें ; फसफसणें . हे हरीक कांहींसे घुमतात , निवळले म्हणजे चांगले होतील . ६ ( अंगांत संचारलेलें भूत ) चेष्टा करूं लागणें ; खेळणें ; हालचाल करणें . ७ ( पारवे इ० पक्ष्यांनीं आपला ) घूं घूं असा आवाज करणें . ( पक्ष्यांनीं ) तारगंभीर आवाज करणें , गाणें . जेवीं घुमति पारवे पंक्ति । तेवीं वाजति पादभूषणें । पंचमस्वरें पक्षी घुमती । राघव स्मरणें गर्जोनिया । ८ ( एखाद्या गोष्टीची ) बराच काळ बोलवा असणें . ते वाडा बांधणार हें वर्षभर घुमत आहे . ९ ( एखादी गोष्ट गुप्तपणें ) कर्णोपकर्णी पसरणें ; पसरलेली असणें . तिनें पोट केले आहे हे वर्तमान दोन महिने गांवांत घुमत आहे . १० लवकर पुरें व्हावें म्हणून चालू झालेलें कार्य लांबणीवर पडणें . तें काम चालू होऊन पांच वर्षे झाली , अझून घुमतेंच आहे , समाप्तीस गेलें नाहीं . [ सं . घूर्णन ; प्रा . घुम्म , घुम्मण ; सिं . घुमणु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP