|
पु. १ अधिकार ; सक्ति ; जोम ; सत्ता . सावकाराचा जोरा कीं सरकाराचा जोर . २ जुलूम ; जबरदस्ती ; अन्यायाचा दंड , शिक्षा . ३ शह ; जोर . स्वामीचे पुण्यप्रतापें अबदालीस जोरा पोंचवून तंबी करतील . - इमं २६० . [ फा . झोर ] जोरावणें - अक्रि . १ ( अक्षरश : व ल० ) बळावणें ; समर्थ , शक्तिमान , पराक्रमी , तेजस्वी होणें . २ जुलमी होणें ; माजणें . जोरावले वनकरी थडकांस देती . - अर्वाचीन ( खरे ) ४५६ . ३ जोराचा होणें . ( वारा , पाऊस , मनोविकार , रोग ). झरझर चला , पाऊस जोरावल्यावर मजल आटोपणार नाहीं . ४ जोरानें वाढणें ; फोफावणें ; पाणी मिळूं लागतांच झाड जोरावलें . ०वर वार - वि . १ जोरदार ; बलवान ; समर्थ . मालोजी जोरावर । - मघ्व ३१४ . २ जुलमी ; जबरीचा ; जबरदस्त . ०वरी वारी जोरावा - स्त्रीपु . १ बळजबरी ; जुलूम ; जबरदस्ती . आपणावरी जोरावरी करिताती . - रा २० . ४५ . २ पाठपुरावा ; पाठबळ ; मदत . [ फा . झोरावर ]
|