Dictionaries | References

झांकणें

   
Script: Devanagari
See also:  झाकणें

झांकणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .
   A lid, cover, top.

झांकणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A lid, cover, top.
   A lid, cover, top.
 vt   To cover; to close with a top or lid. To hide or conceal.

झांकणें

 उ.क्रि.  १ आच्छादणें ; झांकण घालणें . त्यामाजीं बाणांच्या संधानें । झांकिन्नली यादवसैन्यें । - मुवन ३ . ७० . २ लपविणें ; छपविणें . ३ ( ल . ) ( एखादी गोष्ट , व्यवहार ) छपविणें ; दाबून , लपवून ठेवणें ; दाबादाबी करणें . ४ ( उपकार इ० ) न फेडतां तसेच ठेवणें , राखणें . तुझा ऐसा उपकार मी न झांकीं । - र १३ . [ सं . झष =( आच्छादणें )- झाँख - झाँक - भाअ १८३४ . प्रा . झंप = झांकणें . सं . शाख = पूर्णपणें व्यापणें किंवा सं . छादन ] म्ह० न्हातीचे बाल व खातीचे गाल झांकत नाहींत . ( वाप्र . ) झाकउघड - स्त्री . झांकणें आणि उघडणें . उघडझांक पहा . झांकली मूठ - स्त्री . ( एखाद्याची अप्रकट ) स्वाभाविक स्थिति ; परिस्थिति ; स्वरूप . म्ह० झांकली मूठ सव्वा लाखाची = आपण होऊन आपली ( ज्ञान , संपत्ति इ० कांची ) स्थिति उघडी करून दाखवूं नये . त्यांत आपली अब्रू राहते . झाकलें माणीक - न . ( ल . ) दिसायला साधा पण खरोखर गुणी व विद्वान मनुष्य . झांकल्या पाठीचा - वि . ज्याला कांहीं सबब सांगता येईल किंवा जो फारसा अक्षम्य समजला जाणार नाहीं असा ( अपराध इ० ). झांकल्या पाठीनें - क्रिवि . अब्रू गमावून न घेतां ; प्रतिष्ठितपणानें ; बोज कायम ठेवून . झाकल्या मुठीं , झाकल्या मुठीनें - क्रिवि . गुपचूप ; बभ्रा न करितां ; बोभाटा न होऊं देतां ; कोणालाहि कळूं न देतां ; गुप्तपणें . झांकसापा करणें - सक्रि . ( व . ) दाबादाबी करणें . झांकून - क्रिवि . संक्षेपानें . - शर . झांकापाक , झाकापाक , झांकापाकी , झाकापाकी - स्त्री . १ जेवण झाल्यानंतरचीं स्वयंपाकघरांतील उरलींसुरलीं कामें ( समुच्चयानें ). स्वयंपाक घरांतील झाकापाक करून त्याही वर गेंल्या . - कोरकि ३०३ . २ जलदीनें , गडबडीनें आवरणें , उरकणें . [ झांकणें द्वि . ] झांकीव - वि . १ झांकण , ढांपण असलेला ( डबा , पेटी इ० ). २ ज्यावर झांकण , आच्छादन ठेवलेलें आहे असा . ३ झांकून ठेवलेला ; लपवून ठेवलेला ; बंद करून ठेवलेला . [ झांकणें ] झांक्या - वि . झाकणारा . [ झांकणें ]
  न. झांकण अर्थ १ पहा . जैसें झांकणें चर्मकुंडाचें । उघडितांच नये । - दा ३ . १ . १४ .

झांकणें

   झांक उघड
   झाकणें व उघडणें
   उघड झांक पहा.

Related Words

झांकणें   कान झांकणें   अंग झांकणें   डोळे झांकणें   लाज झांकणें   पाठ झांकणें   आग्नि तृणानें झांकणें   गवतानें अग्‍नि झांकणें   पडदा ओढणें   पडदा पाडणें   गुरंगुटणें   झांका   बोखारणें   भैरवाची सेवा असणें   भैरवाची सेवा करणें   पादावगुंठन   आच्छादणें   चिंवर   चिवर   मडक्या तोंडाक इ लोकां तोंड धांपचें कठीण   उघडझांक   उघडझांप   गुरगटणें   गुरगुटणें   झांकींव   झांपणें   चिवली   ढापणी   माती आड करणें   माती आड घालणें   माती आड टाकणें   माती आड ठेवणें   पांघरुण घालणें   गुढारणें   छुपा   झाकणें   झांकुळणें   झांकोळणें   अंथरणें   अंथुरणें   अपिधान   ढापणें   बोंथ   झांक   झगा   छत्री   चील   झांपड   झापड   आच्छादन   मीलन   आवरणें   कडाकोट   झांप   झाक   कान   अंग   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP