Dictionaries | References

तुळशी

   
Script: Devanagari
See also:  तुळस

तुळशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A shrub venerated by the Hindús; disting. into काळी तु0 & पांढरी तु0 or राम तु0 Alone, the word is understood esp. of Holy basil, Ocymum sanctum. तु0 उपटून भांग लावणें To displace a good man for a bad one. तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागतो Used in excuse of the employment of evil means to accomplish a good end.

तुळशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A shrub venerated by the Hindus. Holy Basil.
तुळस उपटून भांग लावणें   Displace a good man for a bad one.
तुळशीच्या मुळांत कांदा लावावा लागतो   Used in excuse of the employment of evil means to accomplish a good end.

तुळशी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : तुळस

तुळशी

  स्त्री. ( व . ) हिंदू लोकांत पूज्य मानिलेले एक झाड ; काळी व पांढरी अथवा रामतुळस असे हिचे भेद आहेत . तुळस ही हिंदुस्थानातच आढळते . ( हा शब्द तुळस - सी असाहि वापरला जातो ). [ सं . तुलसी ] ( वाप्र . )
०उचलणे   शपथ घेणे .
०उपटून   लावणे - वाईट मनुष्य पदरी ठेवण्याकरिता चांगल्या मनुष्यास काढून टाकणे . तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागणे - चांगला हेतु सिद्धीस नेण्यास वाईट साधनांचा उपयोग करण्याविषयी सबब सांगणे . तुळशीत भांगेत तुळस - चांगल्या व वाईट गोष्टी एका ठिकाणीच पिकतात . तुळशीपत्र कानांत घालून बसणे - ऐकले न ऐकलेसे करुन स्वस्थ राहणे . तुळशीपत्र ठेवणे - हक्क सोडणे . ( हलबायाच्या घरावर ) तुळशीपत्र ठेवणे - परभारे दुसर्‍याची वस्तु तिसर्‍याला देऊन टाकणे . सामाशब्द - काष्ट - न . तुळशीचे लांकूड . ( प्रेताचे दहन करण्यास , उगाळून गंध करण्यास किंवा माळेचे मणी करण्यास याचा उपयोग करतात ).
भांग   लावणे - वाईट मनुष्य पदरी ठेवण्याकरिता चांगल्या मनुष्यास काढून टाकणे . तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागणे - चांगला हेतु सिद्धीस नेण्यास वाईट साधनांचा उपयोग करण्याविषयी सबब सांगणे . तुळशीत भांगेत तुळस - चांगल्या व वाईट गोष्टी एका ठिकाणीच पिकतात . तुळशीपत्र कानांत घालून बसणे - ऐकले न ऐकलेसे करुन स्वस्थ राहणे . तुळशीपत्र ठेवणे - हक्क सोडणे . ( हलबायाच्या घरावर ) तुळशीपत्र ठेवणे - परभारे दुसर्‍याची वस्तु तिसर्‍याला देऊन टाकणे . सामाशब्द - काष्ट - न . तुळशीचे लांकूड . ( प्रेताचे दहन करण्यास , उगाळून गंध करण्यास किंवा माळेचे मणी करण्यास याचा उपयोग करतात ).
०पत्र  न. तुळशीचे पान . ( ल . सामान्यतः लहान मानलेली दक्षिणा किंवा देणगी ).
०मंजरी  स्त्री. तुळशीचा शेंडा - तुरा . कासे दिव्य पितांबर । गळां तुळसीमंजर्‍यांचे हार ।
०वर्ग  पु. तुळस , सब्जा सार्ख्या पुष्पांतील दोन आंखूड व दोन लांब असे पूंकेसर असलेल्या झाडांचा वर्ग .
०वात  स्त्री. ( बायकी ) कापसाच्या सुताची चार बोटांच्या रुंदीवर सूत गुंडाळून केलेली १२ सुतांची एक वात . ह्या वाती तुळशीच्या लग्नापासून दररोज दोन वाती या प्रमाणे वर्षभर लावतात .
०विवाह  पु. कार्तिक शुद्ध द्वादशीस विष्णूची मूर्ति व तुळशीचे झाड यांचा जो विवाह होतो तो .
०वृंदावन  न. तुळशीचे केलेली विशिष्ट रचना .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP