|
पु. ठेवी . - दा १६ . ३ . ११ . - पु . बंदी ; कैदी . ' सेंभर बंद रांडापोरे नेली .' - पेद ३४ . १९ . बांधण्याचें साधन ; दोरी ; फीत ; नाडी . बंध ; बंधन ; मर्यादा ; शिस्त . ( ल . ) बेडी ; श्रृंखला ; आळा ; कोंडी . अटक ; कैद . बळें तोडिला बंद त्या त्रीदशांचा । अंगरखा , बंडी इ० स बांधण्यासाठीं लावलेला कसा . नियम ; कायदा ; अट ; शासन . ... लिहिण्यास कांहीं नियम व बंद असतील असें सांप्रतचे दफतराचे स्थितीवरुन वाटत नाहीं . - इनाम ४८ . संधि ; बोटांचा सांधा ; पेरें . देशी कागदाच्या तावाची घडी ; दोन वरखी कागदाचा ताव ; कागद दुमडल्यावर त्याचे प्रत्येकी होणारे दोन भाग , घड्या . त्यावरुन दुबंदी , तिबंदी , चौबंदी इ० बंद कागदाचा कोरा असे । - चांगदेवचरित्र ३ . २० . ( गंजिफांचा खेळ ) हातांतील एका रंगांतील अगदीं खालचा हुकूम ; राजा , वजीर यांच्या शिवाय वरच्या दरजाचें पान . ( ल . ) जमाव ; रांग ; टोळी . बंद कापिला गोसाव्याचा । - ऐपो ३९२ . ( इमारत ) भिंतीच्या रुंदीचा एक दगड किंवा वीट . ( इं . ) हेडर . - मॅरट ४६ . ( बैलगाडी ) सुंभाची दोरी . ( हिं . ) भरती . - शर . [ सं . बन्ध ; फा . बन्द ] - वि . रोधलेला ; अडविलेला ; मना केलेला ( रस्ता , वाट ). थांबलेलें ( काम ). लावून घेतलेलें ( दार इ० ). ( वाप्र . ) बंदा खालीं बसणें , सहस्त्र बंदाखालीं बसणें - बंधांनीं , कर्तव्यतेनें ( विशेषत : शपथेच्या , वचनाच्या ) बांधलें जाणें . भरल्या बंदांत , बंदाखालीं बसणें - जाणूनबुजून , नांदत्या घरांत , भरल्या घरांत बसून , वचन पुरें न केल्यास , खोटें बोलल्यास अनिष्ठाचा प्रसंग येणार असें माहीत असूनहि शपथ घेणें , वचन देणें , खातरीनें सांगणें या अर्थी ( स्वत : चें म्हणणें खरें आहे हें शपथप्रमाण करुन दाखविणार्या मराठी वाप्र . पैकीं हा एक आहे . याच्या सारखेच पुढील वाप्र . आहेत - ही काळीरात्र झाली ( चालली ) आहे ; हा रामपहारा आहे ; भरल्या तिन्हीसांजा ; मरती रात्र झाली ; सूर्य तपतो आहे ; मी अन्नावर बसलों आहे ; रक्ताची आण ; खोटें बोलेल तर जीभ झडेल ; तुमचे पाय समक्ष इ० ). भरल्या बंदांत , बंदा खालीं - क्रिवि . भरल्या , वसत्या घरांत , घराखालीं ( रडणें , भांडणें इ० चा निषेध कर्तव्य असतां प्रयोग ). सामाशब्द - ०खण खाना - पु . बंदीखाना ; कैदखाना ; तुरुंग . ०खलास खुलास सी - पु . बंधन , कैद यांतून मुक्तता . - वि . कैदेंतून सोडलेला ; बन्धमुक्त . अगोदर ... गुलामाची बंदखलासी करुन . - दिमरा १ . ३०७ . [ अर . खलास = सुटका ] ०छोड पु. बनछोड पहा . ०लेख पु. नियम , कायदे यांचा ठरावबंद , तक्ता . ०शाळ ळा - स्त्री . तुरुंग ; बंदीखाना . वसुदेवदेवकीची बंद फोडिली शाळ । - तुगा ४८२ .
|