Dictionaries | References

भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा

   
Script: Devanagari
See also:  भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा , भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा , भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा

भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा     

पोटांत चांगली भूक लागली म्हणजे कोंडासुद्धां गोड लागतो व दमून झोंप येत असली म्हणजे उशाला धोंडा घेतला तरी गाढ झोंप येते. अगदीं बेतावर गोष्ट आली म्हणजे बरें वाईट कोणी पाहात नाहीं. -पामो २३४. ‘ भुकेला कोंडा, निजायला धोंडा, आणि सुताराला ओंडा ह्या वस्तु बहुमोलाच्या आहेत. ’ -शाब १.५३. " तेथें निजावयास फरसबंदीवांचून दुसरें कांहीं नव्हतें. तथापि, ‘ भुके० ’ ह्या म्हणीप्रमाणें त्याला तेथें गाढ झोंप लागली. " -मधुमक्षिका. Hunger needs no sauce, sleepiness no pillow.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP