Dictionaries | References ल लोळणे Script: Devanagari See also: लोळत पडणे Meaning Related Words लोळणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लोळण्याची क्रिया किंवा भाव Ex. मुलाचे मातीत लोळणे पाहून आई त्याच्यावर रागावली. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdलुथुर फुथुर जानाय benলুটোপুটি gujઆળોટવું hinलोटना kanಹೊರಳಾಡು kasڈُلگُن malഉരുളല് nepसुत्न oriଗଡ଼ିବା sanअवलुण्ठनम् tamஉருகுதல் telదొర్లాడుట urdلوٹنا , لوٹ verb जमीन इत्यादीवर वरचे अंग खाली व खालचे वर होईल अशा तर्हेने गडबडणे Ex. आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी लहान मुले जमीनवर लोळतात. HYPERNYMY:काम ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmলুটি বাগৰ দিয় bdलुथुर फुथुर जा benশুয়ে পড়া kanಹೊರಳಾಡು kasڈُلگُن ترٛاوُن ڈُلگُن دُین kokलोळप malഉരുളുക nepपसारिनु panਲਿਟਣਾ sanलुठ् tamஉருள் urdلوٹنا , لڑھکنا , مچلنا लोळणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. जमीन इ० वर वरचे आंग खाली व खालचे वर होईल अशा तर्हेने गडबडणे .आंथरुणावर निजलेल्या मनुष्याने निजलेल्या ठिकाणापासून अव्यवस्थितपणे कुशीवर वळून वळून दूर जाणे .नेसलेल्या वस्त्राचे सोगे जमिनीवर फरफटणे .उपयोगी पडण्याच्या स्थितीत असून ( पदार्थ किंवा माणूस ) कांही उपयोग न केला जात असल्याकारणाने किंवा उद्योगधंदा न मिळाल्या कारणाने रिकामा राहणे ; अव्यवस्थितपणे इतस्ततः पडणे . अनेक पदवीधर केवळ ब्राह्मण म्हणून लोळत आहेत . हा पहा तुझा चाकू येथे लोळत पडला आहे . [ सं . लोठन ; प्रा . लोलण ]०घोलणे सक्रि . ( मुकद्दमा , कज्जा , गोष्ट , बेत इ० चा ) सर्व बाजूंनी किंवा साधकबाधक प्रमाणे विचारांत घेऊन खल किंवा वाटाघाट करणे ; जोराने आपले विचार मांडणे . लोळविणे , लोळवणे , लोळाविणे सक्रि .एखाद्यास लोळावयास लावणे .( ल . ) पाडणे ; मारणे ; चीत करणे ; पराभव करणे .लंबे करणे ; अंगावर चाल करुन आलेल्याला आपल्या आंगच्या सामर्थ्याने ढकलून देऊन किंवा चोप देऊन जमिनीवर आपटणे ; लोळावयास लावणे . चोरांनी रात्री दोन असामीस लोळविले .लडबडविणे ; माखणे ; बुडविणे . ते देवे भक्तिरसे जाणो स्वचरणरजांत लोळविले । - मोद्रोण १० . ४० . [ लोळणे चे प्रयोजक ] लोळविणारा गीध - पु . एक पक्षी . इं . लॅमर गेयर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP