|
न. १ धान्य वगैरे लावण्याची जागा ; क्षेत्र ; लागवड केलेली जमीन . २ पीक ; उगवलेले , पिकलेले उभें धान्य . ३ शेतकाम ; कृषिकर्म ; धान्य पिकविण्याचे काम ; शेती . ४ नवरात्रांत किंवा चैत्रांत रहू करतात तो ; भांडयांत रुजत घातलेले धान्य व त्याचे अंकुर . ५ ( ल .) उपजिविकेचे साधन ; धंदा ; व्यवसाय . पोटाची तजवीज . [ सं . क्षेत्र ; प्रा . छेत ] शेत उतरणे - कणसे चांगली बाहेर पडून भरणे ; कणसे , चांगली येणे . शेत घरांत ठेवणे , असणें , करणें - खंडाने न देतां शेताची मशागत स्वतः करणे . शेत तोडणे - कोवळ्या भाताच्या रोपावर रोग पडणे - कृषि २३६ . शेत सोसणे - भात रोप्याचे केसर पांढरे पडणे ; शेत सुकणे , वाळणे ; एक रोग . [ सं . शुष् ] भरल्या शेतांतून काढणें , भरल्या शेतांतून ढकलणें , भरल्या शेतांतून उठविणे - लाभ होण्याच्या ऐनवेळी काढून लावणें ; हातातोंडाशी आलेला घास काढून घेणे . ०आडगरा वि. पु. नाचणीची एकजात . ०एरंड पु. एरंडीचे झाड ; सुरती एरंडीचे झाड ; सुरती एरंड ; मळा एरंड दुसरा मोगली एरंड , वईएरंड . ०करी पु. १ शेतीवर निर्वाह करणारा ; शेतीची मेहनत करणारा ; कृषीवल . २ शेताचा मालक , धनी . ३ शेती ; खंडकरी ; शेतावर काम करणारा ; कर्दा ; कूळ . ०कापशी स्त्री. शेतांत पेरावयाचे , उगवणारें कापशीचे झाड . ०काम न. शेतीचे काम धंदा . ०कामी काम्या - वि . शेतावर काम करणारा ; शेतकीच्या कामी येणारा , उपयोगी पडणारा ; कृषीवल . ०खप्या पु. १ केवळ शेतकाम ज्याला माहित आहे इतर कांही विद्या नाही असा मनुष्य ; अडाणी , गांवठी मनुष्य ; गांवढा . २ शेतकाम करणारा परंतु ज्याचा वास्तविक धंदा शेतकीचा नव्हे , असा ब्राह्मण वगैरे मनुष्य . ०खेत न. जमीनजुमला ; शेती ; वतनवाडी . ०गणा पु. शेतजमीनीचा समुदाय ; लागवडीची जमीन . ०गहूं पु. गव्हाची एक जात ; पाणी न देतां शेताच्या ओलीवर येणारा गहूं . ०गी स्त्री. शेतकाम ; कृषिकर्म ; जमीनीची मशागत , लागवड वगैरे . वेठीचे उपद्रवामुळे रयत परागंदा होत्ये , शेतगी होत नाही . - वाडसमा ३ . २२४ . ०घर न. शेतांतील घर ; शेतकामांसाठी शेतांत बांधलेली झोपडी वगैरे . ०जमीन स्त्री. लागवडीखालील जमीन . ०पेढी स्त्री. शेतकर्यास कर्ज देणारी सहकारी पतपेढी . ०पोत न. १ सामान्यतः शेती ; शेतीखालील जमीन ; शेतीवाडी ; जमीनजुमला . २ शेतीची कामें ; कृषिकर्म . [ शेत द्वि . ] ०वाडी स्त्री. शेतभात ; शेतीवाडी . ०भात शेतीभाती - नस्त्री . शेती ; शेतजमीन ; शेतीवाडी ; सामान्यतः शेतीची जमीन व लागवडीची कामें यांस व्यापक संज्ञा . ०मळा पु. शेती , बागायत वगैरे ; जिराईत व बागाईत शेती यांस सामान्य व्यापक संज्ञा . ०माल पु. शेतीत पिकणारा माल . ०वड शेताड - स्त्री . १ लागवडीची जमीन गांवासभोवतीची . ०वड वडा - १ पु . एक फुलझाड ; दुधाणी , कुंभा पहा . २ एक झुडुप . ०वस्ती स्त्री. १ ( हंगामात ) शेतावरील वास्तव्य , राहणे . २ शेतकरी लोकांची वस्ती , गांव , खेडे , गांवढे गांव . ०वळी स्त्री. चांभार लोकांत मामाने बाशिंग बांधल्यावर वर शेजारच्या घरी जातो हा विधि . ०वाडी स्त्री. शेती , लागवडीखालील जमीन , कुरणे , बागायत , आवार , वाडगे वगैरे शेतीसंबंधी जमीनीस व्यापक शब्द . ०वार पत्रक वारी - नस्त्री . गांवांसंबंधी कुळकर्णी किंवा तलाठी यानें ठेवावयाचे सर्व जमीनीचे शेतांच्या अनुक्रमानें नोंदणीपत्रक , तक्ता . ०वाळूक न. शेतांत होणारे एक काकडीसारखे वेलाचे फळ ; चिबूड . ०सनदी वि. लष्करी अथवा इतर सरकारी कामाबद्दल पूर्वी सनदेसह शेत मिळत असे , तसे शेत धारण करून नोकरी करणारा . ०सनदी पु. लष्करी नोकरीबद्दल शेताची सनद मिळालेला सैनिक . जेथे किल्ले आहेत तेथे किल्लेदार शेतसनदी शिपाई ठेवीत . - नि १०६१ . शिपाई पु. लष्करी नोकरीबद्दल शेताची सनद मिळालेला सैनिक . जेथे किल्ले आहेत तेथे किल्लेदार शेतसनदी शिपाई ठेवीत . - नि १०६१ . ०सरी स्त्री. शेती , पिके वगैरेस सामान्य व्यापक संज्ञा . शेतकरी पिकली . ०सारा पु. जमीनीवरील कर ; शेतीवरील कर , महसूल . ०हेत न. जमीनजुमला ; शेतवाडी . शेतकी - स्त्री . १ शेतकाम ; शेतकर्याचा धंदा , व्यवसाय . २ पीक ; उभे पीक ; शेत . शेताड , शेताडी - शेतवड पहा . शेती , शेक - स्त्री . १ शेतकी ; शेतजमीन . २ शेतलागवडीसंबंधी कामें . शेती - पु . शेताचा मालक , धनी . - स्त्री . शेतजमीन ; शेतकी . शेती पाऊस - पु . पिकांना योग्य असा पाऊस . शेतीभाती - स्त्री . शेतवाडी , जमीन पहा . २ शेतीची कामें .
|