Dictionaries | References

घरटी

   
Script: Devanagari
See also:  घरट , घरटण , घरटणा , घरटा , घरटीस , घरठा

घरटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 A whirl, twirl, gyration. v घाल. Ex. सर्प धरायासाठीं घारीनें दाहा घरट्या घातल्या. 5 A trip or turn; a going and returning, esp. a fruitless one. Ex. कृपणाचे घरीं किती घरट्या घातल्या तर तो काय देणार?
gharaṭī a Ground in the घरट--rice &c.

घरटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A whirl. The share (of a collection) due from or to each household. A trip or turn. A house.

घरटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  प्रत्येक घरामागे   Ex. ह्या कामासाठी घरटी दोनशे रुपये वर्गणी ठरली आहे.

घरटी     

क्रि.वि.  ( कों . ) प्रत्येक घरागणीक ; घरोघर ; प्रत्येक घरीं ; एकहि घर न वगळतां ; त्यानें घरटी काठी चालू आहे इतका नारूचा उपद्रव डोळयांनीं पाहिला . - खेया २५ .
 स्त्री. १ ( कों . ) प्रत्येक घराचा , कुटुंबाचा वर्गणींतील , वांटणींतील भाग , हिस्सा ; घरपट्टी . २ ( राजा . ) वर्गणी , पट्टी , दंड , देणग्या देण्याच्या किंवा घेण्याच्या बाबतींत स्वतंत्रपणें मोजलेलें प्रत्येक घर [ घर + पट्टी ]
 पु. स्त्री . १ घिरटी ; धान्य भरडण्यासाठीं , दळण्यासाठीं केलेलें मोठें जातें . हिरे , माणकें , मोतीं , सर्व जबरदस्त घरटाखालीं घालून त्यांचा चुरा केला . - वज्राघात ६६ . २ ( कों . ) भात भरडण्याचें मोठें जातें . ३ दळणारा ; धान्य इ० दळून पोट भरणारा ; घरट भुसारी याजवर मोहतर्फा मलिक बरी याचे कारकीर्दीपासून होता तो ... - मसाप २ . १६३ . ४ - स्त्री . न . गस्त ; घिरटी - मनको . [ सं . घरट्ट = मोठें जातें ]
 स्त्री. ( कों . ) भात भरडण्याचें मोठें जातें , जातिणी ; घरट . - वि . घरटांत घालून भरडलेलें भात . [ सं . घरट्ट ; म . घरट ]
 स्त्री. १ घिरटी ; फेरी ; गिरकी ; सुमनें गुंफिलीं वीरगुंठीं । त्यावरी मधुकरांची घरटी । - एभा ३ . ८३६ . - दावि २१३ . सर्प धरण्यासाठीं घारीनें दहा घरटया घातल्या २ गस्त ; पहारा ; ( इं . ) राउंड ; यापरी स्वयें मन । दुर्ग पन्नासी आपण । त्यासी सबाह्य राखण । घरटी जाण स्वयें करी । - एभा २२ . ३०६ . तुमच्या घराभोंवतीं सुदर्शनचक्राला घरटी करायला लावतों . - नामना ८२ . ३ येरझार ; हेलपाटा ; खेप ; खेटा ; जाणें व परत येणें इ० कांची निष्फळ क्रिया . कृपणाच्या घरीं कितीहि घरटया घातल्या तरी तो काय देणार ? ४ ( ल . ) आडकाठी ; कैद ; प्रतिबंद . जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । - ज्ञा २ . ३११ . [ घ्व . ]
०खोती  स्त्री. गांवचें सगळें दळण दळून देण्याचा मक्ता . [ घरटी + खोती = मक्ता ]
०कर   कार - वि . १ गस्त घालणारा ; पहारा करणारा ; राखणदार ; रखवालदार . रामाश्रमीं अहोरात्र । जटायु झाला घरटी कार । - भारा - किष्किंधा १६ . १३२ . घरटीकार मी तुमचा । - मुआदि ५ . ४४ . गांवांत रात्रौ जागती घरटीकर । - मक ३४ . १०० . २ चार ; हेर ; गुप्तपोलीस . ३ ( सामा . ) जासूद ; बातमीदार . तों सभेस घरटीकार सांगत । रावणासन्मुख वर्तलेलें । - रावि १९ . १७३ . [ घरटी + कार = करणारा ]
०आमंत्रण  न. गांवांतील प्रत्येक घरीं दिलेलें जेवणाचें निमंत्रण , बोलावणें .
०भर   सारा - पु . मराठयाच्या अमदानींत जात्यांवर , घरटांवर बसविलेला कर .

घरटी     

घरटी, घड्याळ, बायको नीट केल्‍यावीण राहूं नको
धान्य दळणाचे जाते, वेळ दाखविणारे घड्याळ व घरकाम करणारी बायको यांचे एकदिवस जरी काही बिघडले तरी सर्व घडी विसकटून जाते. याकरितां ही नेहमी नीट व्यवस्‍थित असतील व चालतील अशी काळजी घेणें फार आवश्यक आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP