|
विपुअव . १ चार जण ; चार आणि चौथे या दोहोंचय अर्थांत थोडासा फरक आहे . चार शब्द सर्वसाधारणपणें वापरतात परंतु चौघे हा शब्द सजीव प्राण्यास उद्देशून - विशेषत : मनुष्यांस उद्देशून वापरतात . ( - स्त्री = चौघी - चौथ्या ; - न . चौघें - चौघीं ). २ थोडे ; तिघे - चौघे तीन - चार . ३ जग ; जनता ; समाज ; लोक ; जन उदा० चौघांचा विचार , बुध्दि , रीत . चौघांची वाट ती आमची - आपली वाट . चौघांत जावें लागतें . चौघांत बातमी पसरली . ४ ( सांकेतिक ) चार वेद . न . मनी चौघांचीं उत्तरें । उपवांशाएं नावरे । - ऋ ४४ . ५ चार देह ; सूक्ष्म , स्थूल . कारण व महाकारण देह ; शरीर . राजस विठाबाई माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजूनियां चौघासी लावी आपुलिये सोई वो । - तुगा २८९ . ६ चार मुक्ती . चौघी जणी तटस्थ पाहती । स्वरूपस्थिति न वर्णवे । - ह ३ . २ . ७ चार वाचा ( परा , पश्यंति , मध्यमा , वैखरी ). कृष्ण वर्णुनिया श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । - एरुस्व ६७६ . [ चौ = चार ] ( वाप्र . ) चौघांत बसणें - अक्रि . लोकांत , समाजांत वावरणें , वागणें ; लौकिक राखणें . चौघांवर तान घेणें - ( उप . ) लोकमत झुगारून देणें ; जनतेचा , समाजाचा निर्णय धाब्यावर बसविणें ; अधिक उंच तान , लकेर घेणें ; लोकांवर ताण करणें . वि. चार ; चौघे पहा . [ सं . चतुर = चार ]
|