Dictionaries | References

झारा

   
Script: Devanagari
See also:  झारिया , झारी , झारेकरी , झार्‍या

झारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
and the bridge; to deepen the sound. 2 Applied by some to the chord which produces the base-sound, viz. the पितळी तार. 3 A ladle-form culinary utensil having perforations.

झारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A thread placed on the points of contact of the strings (of a वीणा &c.) A ladle-form culinary utensil.

झारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दांडा असलेले आणि एका टोकास सपाट, वाटोळे आणि सच्छिद्र असलेले स्वयंपाकातील उपकरण   Ex. तो झार्‍याने बुंदी काढत होता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઝારો
hinपौना
kanಜಾಲರಿ
kokजारो
malനീണ്ട കൈപിടിയുള്ള അരിപ്പ
panਪੌਣਾ
sanजालनी
tamநீண்ட கரண்டி
urdپَونا , جھرنا , جھانجھا , حلوائیوں کا سوراخ دار کفگیر

झारा     

 पु. १ सोनाराच्या दुकानांतील राख विकत घेऊन किंवा रस्ता इ० कांतील पडलेला केरकचरा इ० चाळून , गाळून तींतून सोन्याचे कण काढून त्याजवर चरितार्थ करणारी एक जात व तींतील व्यक्ति . मिरविति गुणज्ञ कनका काढी सूक्ष्मा जपोनि झारा ज्या । - मोमंभा २ . २ . - इनाम ४४ . धुळी माजील सोनें जैसें । भेसळलें न दिसे । तें निवडूं जाणे जैसें । झारियाचि पै । - विउ ४ . ५९ . सरंजामदाराची झारेकर्‍याप्रमाणें चौकशी सुरू झाली . २ ( ल . ) कृपण ; कद्रू . [ झारणें ]
 पु. १ दांडा असलेले व एका टोकास सपाट , वाटोळें व सच्छिद्र असलेलें स्वयंपाकाचें पळीसारखें उपयोगी उपकरण . यानें तेल गळून कढईतील तळलेले पदार्थ वर काढतां येतात . तंजावरकडे याला झारीची पळी म्हणतात . २ गाळण्याचें साधन ; गाळणी . नीर बहुत ठाईं हिंडलें । झारा घातला मग निवळलें । - दावि ७७४ . ३ पाणी तापविण्याच्या बंबांतील विस्तव ठेवण्याची जाळी . [ सं . झृ - झर किंवा - क्षर : प्रा . झर ; फा . झिर ]
 पु. १ वीणा इ० तंतुवाद्याच्या घोडीजवळ तारेखालीं घातलेला कापूस , लोकरीची दशी ; जिव्हाळी ( इच्या योगानें आवाज चढा होतो ). २ तंतुवाद्यांतील खर्ज स्वराची पितळी तार . ३ झार्‍याच्या योगानें निघणारा चांगला आवाज . या आवाजासारखा कंठांतून निघणारा आवाज . [ घ्व . झार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP