|
स्त्री. स्त्री. ( काव्य ) आई किंवा आईप्रमाणें मानिलेल्या वृद्ध बाईस आदरानें म्हणतात ; गरीब , प्रेमळ , धर्मशील स्त्री ; माउली पहा . मुखीं प्रगट होय जी करि सुखी जना मावली । - केका ७३ . मावली ; आई . सासुरवासें शीणली । तिये भेटे जेंवि माउली । - ऋ ११ . ( लडिवाळपणें ) आईस म्हणतात . बुझावीतां माउली काय बोले । अम्ही देवासी नाहिं पूजियेले । - ध्रुवचरित्र ११ . ( नवनीत पृ . ४११ ). आईसारखी कोणतीहि भली स्त्री . त्या माउलीच्या सदगुणांचें कीर्तन करावें तें थोडेंच . - विवि १० . २१८ . ( - अव . ) जलदेवता . [ सं . मा ] जलदेवता . [ सं . मातृ ] माऊल , पण , पणा - नपु . आईची माया ; दयाळूपणा ; ( सामा . ) माणुसकी . [ माउली + पण , पणा ] माउशी , माऊशी , मावशी , माउसी , माऊसी , मावसी - स्त्री . मावशी ; आईची बहीण . ( ल . ) सापत्नमाता . ध्रुव पितयाचे अंकीं बैसला । तंव माउशियेनें ढकलिला । - कथा ७ . १० . ८ . माऊसबहीण - स्त्री . मावशीची मुलगी . [ मावशी + बहीण ] माऊसभाऊ - पु . मावशीचा मुलगा . माऊसा , मावसा - पु . मावशीचा नवरा .
|