* एकानंगा पूजा
हे एक स्त्रीव्रत आहे. एकानंगा हे एकानंशेचे दुसरे नाव आहे. कार्तिक शु. चतुर्थी, अष्टमी, नवमी किंवा चतुर्दशी या तिथीस हे व्रत करतात. चतुर्दशीच्या दिवशी पूजा करायची, ती एक फलित वृक्षाखाली करतात व तिला अन्नाचा महानैवेद्य दाखवितात. मग त्या अन्नातला उत्कृष्ट अंश देवीला पोचविण्याबद्दल बहिरी ससाण्याची किंवा दुसर्या एखाद्या पक्ष्याची प्रार्थना करतात, या व्रताचा विशॆष हा की, या दिवशी पतीच्या अगोदर पत्नी भोजन करते.
* विनायकी (गणपती - व्रत )
या चतुर्थीला 'स्कंद चतुर्थी' म्हणतात. या दिवशी गणेशबंधू षडाननाने देव-दानव यांच्या युद्धात जय प्राप्त व्हावा म्हणून श्रीगणेशाचे व्रतपूर्वक पूजन केले. त्यास लाल कमळे वाहिली. त्यावेळी प्रसन्न होऊन गणेशाने त्याला त्या युद्धात यशस्वी होण्याचा वर दिला व आपले मयूर वाहन देऊन ही चतुर्थी तुझ्या नावे होईल, असा वर दिला.