श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ४

श्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.


मिरवोनि ज्ञान पसरिती ढोंग । निंदिती राजयोग मुर्खपणें ॥१॥

तेचि निःसंशय जाणावे अभक्त । तारक एकचि सत्य राजयोग ॥२॥

गुरुचिया दाप्तां लेखिती सामान्य । नेणोनि प्रमाण संतांचे तें ॥३॥

सांगतीं मोळियां सर्वाचि श्रेष्ठ मार्ग । संती राजयोग वाळिया हें ॥४॥

तयांपाशी स्थीर नोहावें क्षणैक । नाशे अक्षयसुख तयां संगे ॥५॥

सद्भावें रिघावें शरण योगियांसी । द्यावा पायांपाशी बळी जीव ॥६॥

नेदी संप्रदाय नेम आचरण । नोहावें शरण ऐशां काहीं ॥७॥

ऐसियाचा संग झाल्या क्षण एक । त्याहुनी नसे पातक ब्रह्माडींहीं ॥८॥

ढळों नये कोणी केलियांही विघ्न । साधावें संपुर्ण याचि देहें ॥९॥

हणें जनार्दन सकळ याचिसाठी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP