श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १०

श्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.


गुरुनिकट वासगुरु मुखें श्रवण । मनन आचरण सर्व स्वेसी ॥१॥

झाल्यावीण आधीं साधनी प्रवीण । शिष्या आत्म खुण देवो नये ॥२॥

ऐसे झाल्यावेन दिधल्या नोहे प्राप्त नोहेचि उद्धार बुडे अधिक ॥३॥

तेवी देवो नये शिष्य झाल्या वीण । दिधल्यावीण मंत्र संप्रदाय ॥४॥

करोनि पुजन आधी झाल्यावीण । सबार्ह्म अर्पण सर्वस्वेशीं ॥५॥

गुरुशिष्यीं हो मर्यादा सांडिली । यालागी बुडाली योगास्थिती ॥६॥

लक्षो निया देही भजावा श्रीराम ॥ तारक तें नाम ते चि भक्ति ॥७॥

जपती तेंचि नाम संत हरि हर । बाह्म दंभ येर अमक्ति ते ॥८॥

येथें सर्व पात्र नारी नर शुद्र । असे अधिकार सकळांसी ॥९॥

आळसें अभिमानें खोवुं नये स्वहित । वदोनि भगवंत बुद्धी दाता ॥१०॥

व्हावया उद्धार पाहती पितरे वास ॥ आतांची श्रीगुरुस शरण व्हावें ॥११॥

नोहे जो प्रत्यक्ष स्वानुभर्वे मुक्त । भुमीवरी व्यर्थ जन्मा आला ॥१२॥

म्हणे जनार्दन स्वानुभव घाटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP