मंत्रप्रकरण - बगलामुखी मंत्र

" श्रद्धावान लभते फलं" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.


ॐ क्लीं बगलामुखी सर्व हुष्टानां वाचं मुखं स्तंभय

जिव्हां कीलय कीलय बुद्धिं नाशय क्लीं ॐ स्वाहा .

ह्या छत्तीस अक्षरी मंत्राने बगलामुखी आराधना करावी .

बगलामुखी - ध्यान

मध्ये सुधाब्धिमणिमण्डपरत्नवेदी।

सिंहासनोपरि गतां परिपीतवर्णा।

पीतांबरभरणमाल्यविभूषितांगी।

देवीं स्मरामि धृतमुद्नरवैरिजिव्हाम ॥१॥

जिव्हाग्रमादाय करेण देवी वामेन शत्रून्परिपीडयन्तीम।

गदाभिघातेन च दक्षिणेन पीताम्बराढ्यां द्विभुजां नमामि ॥२॥

भावार्थः -

सुधानगरी मणिमय मंडपाचे ठायी रत्नवेदीच्या सिंहासनावर विराजमान असून पितांबर परिधान केलेली व सुवर्णालंकारांनी विभूषित अशी बगलादेवी आहे . तिने मुद्गल ( गदा ) व हातांतील गदेने शत्रूला पीडित करुन , पीतवस्त्र परिधान केलेली दोन भुजांनी युक्त ती देवी आहे . अशा त्या देवीस माझे नमन असो . याप्रकारे बगलामुखीचे ध्यान करावे .

पिवळे वस्त्र परिधान करुन हळदीने पिवळ्या केलेल्या गांठीची एक माला घेऊन तिने एक लक्ष जप करावा ; आणि त्याचे दशांश ( दहा हजार ) पिवळ्या फुलांचा होम करावा .

बगलामुखी - स्तोत्र

बगला सिद्धविद्या च दुष्टनिग्रहकारिणी।

स्तम्भिन्याकर्षिणी चैव तथोच्चाटनकारिणी।

भैरवी भीमनयना महेशगृहिणी शुभा ॥१॥

दशनामात्मकं स्तोत्रं पठेद्वा पाठयेद्यदि।

स भवेन्मंत्रसिद्धश्च देवीपुत्रं इव क्षितौ ॥२॥

अज्ञात्वा कवचं देवि यो भजेद बगलामुखीम।

शस्त्राघातामवाप्नोति सत्यं सत्यं न संशयः ॥३॥

हे दशनामात्मक स्तोत्र जो पठन व पाठन करील त्याचा मंत्र सिद्ध होऊन गौरीपुत्राप्रमाणे तो पृथ्वीवर संचार करतो . ह्या कवचाचे विधान न जाणता जो पुरुष बगलामुखीची उपासना करील तो शस्त्राघाताने मृत्यु पावेल .

बगलामुखी - कवच

ॐ र्‍हीँ मे हृदयं पातु पादौ श्रीबगलामुखी।

ललाटं सततं पातु दुष्टनिग्रहकारिणी ॥१॥
रसनां पातु कौमारी भैरवी चक्षुषोर्मम।

कटौ पृष्ठे महेशानि कर्णौ शंकरभामिनी ॥२॥

वर्जितानि तु स्थानानि यानि च कवचेन हि।

तानि सर्वाणि मे देवि सततं पातु स्मम्भिनी ॥३॥

तात्पर्य - ह्या कवचाच्या पठनप्रसादाने उत्तम प्रकारे रक्षण होते .

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP