ॐ , र्हीँ , क्लीं , हूं मातंग्यै फट स्वाहा।
या मंत्राने मातंगीची उपासना करावी .
मातंगी -ध्यान
श्यामांगी शशिशेखरां त्रिनयनां रत्नसिंहासनस्थिताम।
वैदैर्बाहूदन्डौरसिखेटकपाशांकुशधराम ॥१॥
अर्थः -
मातंगी देवी श्यामवर्णा , अर्धचंद्र धारण करणारी व त्रिनेत्री आहे . तिने आपल्या चारही हातांत खड्ग , खेटक , पाश व अंकुश ही चार अस्त्रे धारण करुन रत्नजडित सिंहासनावर ती विराजमान आहे .
जपहोम
वरील मंत्राचा सहा हजार जप केला म्हणजे एक पुरश्चरण होते . आणि जपाचा दशांश घृत , शर्करा व मध मिश्रित करुन पळसाच्या समिधांनी होम करावा .
मातंगी -स्तव
आराध्य मातश्चरणाम्बुजे ते , ब्रह्मदयो विश्रुतकीर्तिमापुः।
अन्ये परं वा विभवं मुनींद्रा ; परां श्रियं भक्तिभरेण चान्ये ॥१॥
नमामि देवी नवचंद्रमौली , मातंगिनी चंद्रकलावतंसाम।
आम्नायकृत्यप्रतिपद्धितार्थ , प्रबोधयन्ती हृदि सादरेण ॥२॥
चिरेण लक्ष्यं प्रद्दातु राज्यं , स्मरामि भक्त्या जगतामधीशे।
वलित्रयांग तव मध्यमम्ब , नीलोत्पलं सुश्रियभावहन्तीम ॥३॥
कान्त्या कटाक्षैर्जगतां त्रयाणां , विमोहयन्ती सकलान्सुरेशि।
कदम्बमालाञ्चितकेशपाशां , मातंगकन्यां हृदि भावयामि ॥४॥
ध्यायेदारक्तकपोलबिम्बं , बिम्बाधरन्यस्तललामवश्यम।
आलोललीलाकमलायताक्षं मन्दस्मितं ते वदनं महेशि ॥५॥
स्तुत्यानया शंकरधर्मपत्नी , मातंगिनी वागधिदेवतां ताम।
स्तुवन्ति ये भक्तियुता मनुष्याः परां श्रियं नित्यमुपाश्रयन्ति ॥६॥
भावार्थः -
हे माते , तुझ्या चरणकमलाच्या आराधनेने ब्रह्मादि देव कीर्तिमान झाले . कित्येक मुनिजन परम वैभवाप्रत प्राप्त झाले ; तसेंच अनेक दृढ भक्त श्रीमान झाले . चंद्रकलेने तुझे मस्तक शोभायमान आहे , हृदयामध्ये वेदप्रतिपादित अर्थ सर्वदा तूंच प्रबोधित करतेस . तुझ्या शरीराचा मध्यप्रदेश वलित्रययुक्त असून कांति नील कमलाप्रमाणे सुशोभित आहे . हे सुरेश्वरी , आपल्या कांतीने व नेत्रकटाक्षांनी तूं त्रैलोक्य मोहित करितेस . कदम्बमालांनी बद्ध असे तुझे केशपाश असून आरक्त कपोलयुक्त मुखकमल अत्यन्त सुंदर आहे . त्यावर चंचल अलकावली विराजित आहे . विशाल नेत्र आणि मंदस्मित मुख अशा त्या परम पूज्य मुखकमलाचे मी ध्यान करतो . जो भक्तिमान पुरुष शंकराची धर्मपत्नी वागीश्वरी जी मातंगिनी तिचे ध्यान खाली दिलेल्या कवचद्वारा करितो , तो सदासर्वदा मोठा संपत्तिमान होतो .
मातंगिनी -कवच
शिरो मातंगिनी पातु भुवनेशी तु चक्षुषी।
तोतला कर्णयुगुलं त्रिपुरा वदनं मम ॥१॥
पातु कंठे महामाया हृदि माहेश्वरी तथा।
त्रिपुरा पार्श्वयोः पातु गुह्यं कामेश्वरी मम ॥२॥
ऊरुद्वये तथा चण्डी जंघायाञ्च रतिप्रिया।
महामाया पदे पायात सर्वागेषु कुलेश्वरी ॥३॥
य इदं धारयेन्नित्यं जायते संपदान्वितः।
परमैश्वर्यमतुलं प्राप्नोति नात्र संशयः॥४॥
तात्पर्यार्थः -
मातंगिनीकवच जो धारण करतो , त्याला परमोत्तम अतुल ऐश्वर्याची प्राप्ति होते यांत संशय नाही .