मंत्रप्रकरण - सरस्वती मंत्र

" श्रद्धावान लभते फलं" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.


" ॐ र्‍हीं ॐ "

हा चिंतामणी नामक सरस्वतीचा अपूर्व मंत्र आहे . पुरश्चरणपूर्वक एक वर्षपर्यंत ह्या मंत्राचा जप केल्याने मंत्र सिद्ध होतो . ह्या प्रकारे सिद्धि झाल्यावर साधक ज्या व्यक्तिच्या मस्तकावर हात ठेवील तो असामान्य श्लोकरचनेमध्ये निपुण होईल . मग स्वयं साधकाची तर गोष्टच बोलावयास नको . कांही अनुभविक असे सांगतात की , तुलसीवृंदावनाजवळ बसून वरील मंत्राचा दररोज चौदा हजार जप केल्याने चौदा महिन्यांत सिद्धि प्राप्त होते .

सरस्वतीस्तोत्र प्रारंभ

शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामाद्यां जगद्व्यापिनीम।

वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यांधकारापहाम ॥

हस्ते स्फाटिकमालिका विदधती पद्मासने संस्थिताम।

वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम ॥१॥

आगच्छ वरदे देवि त्र्यक्षरे ब्रह्मवादिनि।

गायत्री छंदसां मातर्ब्रह्ययोनि नमोऽस्तुते ॥२॥

ॐ अस्य श्री दशश्लोकी महासरस्वतीस्तवराजस्य बृहस्पतिऋषिः

अनुष्टुप छंदः श्री महासरस्वतीप्रीत्यर्थ जपे विनियोगः ॥

मंत्रो यथाः -

" ॐ ऐं र्‍हीं क्लीं मम चतुर्दश विद्यासिद्ध्यर्थे श्रीमहासरस्वतीप्रीत्यर्थे च जपे विनियोगः ॥ ॐ पद्मासने शब्दरुपे ऐं र्‍हीं क्लीं वदवद वाग्वादिनी स्वाहा. ॐ ऐं र्‍हीं क्लीं वद वद वाग्वादिनि मम जिव्हाग्रे सरस्वती स्वाहा " ह्या बीजमंत्राचा नित्य अष्टोत्तर शत जप केला असता साधकाच्या जिव्हाग्राचे ठायी सरस्वतीदेवी वास करिते.

बृहस्पतिरुवाच -

सरस्वती नमस्यामि चेतनां हृदिसंस्थिता। कंठस्थां पद्मयोनेस्तु ऐं र्‍हींकार सुरप्रियाम ॥ मतिदा वरदां चैव सर्वकामफलप्रदां । केशवस्य प्रियां देवी वीणाहस्तां वरप्रदाम ॥ ॐ ऐं र्‍हीं मंत्र प्रियां हृद्या कुमतिध्वंसकारिणी । स्वप्रकाशां निरालम्बामज्ञानतिमिरापहाम ॥ मोक्षदां च शुभा नित्या शुभगा शोभनप्रिया। पद्मोपविष्टाकुंडलिनी शुक्लवस्त्रां मनोहराम ॥ आदित्यमंडले लीनां प्रणमामि जनप्रियां । ज्ञानकारां परातीतां भक्तजाड्यविनाशिनीम ॥ इति सत्यस्तुता देवी वागीशेन महात्मना ॥ आत्मानं दर्शयामास शरदिन्दुसमप्रभाम ॥

अशा प्रकारे बृहस्पतींनी त्या देवीची स्तुती केल्याबरोबर शरच्चंद्राप्रमाणे शोभणारी अशी ती सरस्वती देवी दर्शन देती झाली आणी म्हणाली की , जो या स्तोत्राचे तिन्ही काली नियमाने पठण करील त्याच्या कंठामध्ये सदा सर्वदा मी वास करीन .

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP