श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ७ वा
ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.
श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वते नम: ॥
मुक्तदेव भूपति ऐसा जाण राजा करी प्रजा पाळण ॥ प्रभावती राणी मुखे सज्ञान ॥ नगर जाण महिष्मती ॥१॥
येरी कडे काय झाले ॥ एकदा वन क्रीडेसी इच्छिले ॥ भार्या सहित निघाले ॥ पुत्र प्राप्ति कारणें ॥२॥
वसंत ऋतु दिवस जाण ॥ वन दिसे शोभाय मान ॥ फळ पुष्प फुलले जाण ॥ शोभती द्राक्ष मंडप ॥३॥
नारंगी दाळिंब खर्जुरी अंजीर ॥ च्यूतवृक्ष आणि बोरी ॥ रातांजन कपीत्थक लहारी ॥ ताडमाड शोभती ॥४॥
लवंग वेली नाना पुष्प वाटिका ॥ जाई-जुई मालति देखा ॥ भ्रमर झुंकारति नेटका ॥ पुष्प सुवासी चंपा मोगरा ॥५॥
वंश लागले सघन दाट ॥ फणस लोंबती गज घट ॥ ऐसे वन अचाट ॥ त्या माझी थाट सावजाचा ॥६॥
सिंह शार्दुल जाण ॥ जंबुक नकुळ हरीण ॥ कस्तूरी मृग जवादी जाण ॥ वनामाजी क्रीडती ॥७॥
भुजंग मस्तक मणीचे ॥ कल कलाट काग साळीयाचे ॥ शुक पक्षी बोलते वाचे ॥ कपोत आणि बक पक्षी ॥८॥
अतिरम्य वसंत ऋतूते ॥ पक्षी क्रीडाती सावचित्त ॥ ऐसीया वना माजी अकस्मात ॥ भार्या सहित मुक्तदेव आले ॥९॥
फल पुष्प शोभती पाहे ॥ तेथें आंत शिवालय ॥ देवाचें स्थळ सगुण पाहे ॥ सरोवर ते ठाइ असे ॥१०॥
तिथे मुक्तदेव भार्यासहित जाण ॥ केलें विधीयुक्त स्थापण ॥ मग प्राणायाम करुन ॥ ध्यानस्त बैसला ॥११॥
ऐसें करोनी ध्यान ॥ सर्व सामग्री सिध्द करुन ऋषी पत्न्या पाचारुन ॥ केलें पूजन विधी युक्त ॥१२॥
इति श्री ब्रह्मांड पुराणेतिहास ॥ भविष्योत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्म शास्त्र प्रमाण त्यास सप्तमोध्याय गोड हा ॥१३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥
N/A
References : N/A
Last Updated : February 07, 2011
TOP