श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १७ वा
ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.
श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वते नम: ॥
ब्राह्मण क्षत्रीय वैश्यासी नाडी भिन्न ॥ क्षत्रीय करावे गो ब्राह्मण प्रजा पाळणे ॥ संध्या रुद्र गायत्री जप अनुष्ठान ॥ हाची धर्म तयाचा ॥१॥
आता कलयुगा अंती ॥ क्षत्रीये नाना व्यापार करीती ॥ ऐंसी वंशाची स्थीति ॥ कलयुगामाजी झाली ॥२॥
मुक्तदेव अख्यान ऐंसे झाले ॥ त्याचे स्वधर्म कर्म बोलीले ॥ मृत सूतके शास्त्री निर्मीले ॥ द्वादश दिवसें नीश्चीती ॥३॥
दश दिन विटाळ नीगुती ॥ विवाह पाच दिवस निश्वीति ॥ तीर्थं वृत होम करीती ॥ ते तुम्ही परीसाबे श्रोते ॥४॥
ऐंसी तघाची कलीयुगी स्थीती ॥ सांगेन नीगृत अवधारी ॥ सुत म्हणे ऋषी सुमती ॥ मुक्तदेव वंश काय करीती ॥५॥
ते ऐंका ऋषी समस्ती ॥ विख्यात जगती पृथ्वीवरी ॥६॥
चिंतार तगटगरी सोनारी करिती ॥ तांबट लोहार सुतार नीगृती ॥ सौदागर राज वस्त्र अर्पीती ॥ उदर पोषीती ऐंसे परी ॥७॥
सूत बोलीला ऋषी लागून ॥ ऐंसे झाले मुक्तदेव अख्यान ॥ सकळ ऋषी ऐकून ॥ म्हणती धन्य ऋषीवर्या ॥८॥
कथा ऐकली समूळ सर्वत्र ॥ तुमचेनी मुखे अति पवित्र ॥ आता येथोनी कथा विचित्र ॥ आणखी वर्ण सांगावे ॥९॥
ब्रह्मांड पुराणी वर्ण वैभव खंडन जाण ॥ त्याचा इतिहास विवर्ण ॥ भविष पुराणीचे महीमान ॥ कथा संपूर्ण कथीयेली ॥१०॥
इती ब्रह्मांडपुराणेतिहास ॥ भविषोत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्म शास्त्र प्रमाण त्यास ॥ सप्तदशमोध्याय गोड हा ॥११॥
श्री कृष्णार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 07, 2011
TOP