श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १४ वा
ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.
श्री गणेशाय नम: ॥ जो सच्छीदानंद निर्मळ ॥
शिव शांत ज्ञान धन अचल ॥ जो भानुकोटी तेज अढळ ॥ सर्व काळ व्यापक जो ॥१॥
किती एक काळ झालियावरी ॥ मंद्राचळ पर्वती वास करी ॥ एक दोन पुण्ये तीर्थ करी ॥ प्रभावतीची मुक्तदेवा ॥२॥
मेळविले रुषी समस्त ॥ ऋषी पत्न्या पातल्या पतिवृता ॥ स्वयेंपाक केला सिध्दता ॥ ऋषी पत्न्या मिळोनी ॥३॥
वेदोक्त वीधी मार्ग करुनी ॥ मग पूजील्या सुवासिनी ॥ दु:ख वाटले मुक्तदेवा लागुणी ॥ भार्या विणे जीर्णे व्यर्थ हो ॥४॥
पत्नी वाचोची धीग्ग जीर्ण ॥ बाळका वाचून घर स्मशान ॥ ऐंसे ऋषी समस्त ऐकोन ॥ तया प्रती बोलीले ॥५॥
ऋषी म्हणे तया समस्ता ॥ ऐंसे परंपरा होत असता ॥ कार्य करुन आता ख्यांता ॥ शिवे बोधीले ते सत्ये असे ॥६॥
एक जाती एक येती ॥ नाशीवंत असे सर्व जगती ॥ त्रैलोक्य मेरु खचती ॥ प्रळये होता सर्व ही ॥७॥
परी आत्मा शाश्वत अविनाश ॥ निराकार शक्ती समागमे वसे ॥ काय करावे गंधर्व हु:ड्या सारीखे ॥८॥
मृग जळ न्याये संसार ॥ जैसे स्वप्नी देखे रत्न मंदीर ॥ जागृती माजी मिथ्याच्यार ॥ तैसा संसार व्यर्थ हा ॥९॥
ऐंसे बोधोनी तयास ॥ संतोष केले मुक्तेस्वरास ॥ ऋषी पत्न्या सहित आश्रमास ॥ गेले स्वग्रहास आपुल्या ॥१०॥
इतो ब्रह्मांड पुराणेतिहास ॥ भविषोत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्म शास्त्रा प्रमाण त्यास ॥ चतुर्दशोध्याय गोड हा ॥१४॥ ओव्या ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : February 07, 2011
TOP