श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १० वा
ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.
श्री गणेशाय नम: ॥ गोपाल कृष्णाय नम: ॥
किती एक काळ झालीया वरी ॥ मग प्रभावती गर्भ धरी ॥ पूर्ण झाले नवमासावरी ॥ पुत्र सगुण झाला ॥१॥
बहुत आनंदला मुक्तदेव नृपति ॥ ऋषी जातक वर्णिती ॥ याचकासी द्रव्य अगणिती ॥ बहुविध वाटिले ॥२॥
दिवसें दिवस चंद्रकाळा ॥ बाळ वाढे हर्षे भूपाळा ॥ तृतीय वर्षी वेल्हाळा ॥ द्बीतिय पुत्र जन्मला ॥३॥
तया नाम बाहुमान जाण ॥ राया केले जातक वर्णन ॥ हर्षे याचक तोषवून ॥ केलें पूजन यथा विधी ॥४॥
पंच वर्षावरी जाण ॥ केलें तयाचे मुंजी बंधन ॥ वेदोक्त मंत्र होम हवन ॥ वसीष्टा संपूर्ण पै केला ॥५॥
वसीष्टा पासी विद्याभ्यास ॥ धनुर्विद्या प्रवीण केले सर्वास ॥ मग ऋषी कन्या आनोने परीयेस ॥ लग्न सोहळा मांडिला ॥६॥
मंदपाळ ऋषीची कुमारे ॥ ते ज्योतिमाना दीलि सुंदरी ॥ मागधाची कन्या अवधारी ॥ बाहुमानाची ते स्त्री झाली ॥७॥
चित्रवर्ण सुतीक्षणाची कन्या ॥ देऊनी लाविले लग्ना ॥ जांबलींची कन्या जाण ॥ वीचक्षणासी दीधली ॥८॥
त्रैंबक ऋषीची कन्यारत्न ॥ शांजली कन्या वर्णास दीधलीं जाण ॥ रुक्मरथ संपूर्ण ॥ लग्न सोहळा पै कैला ॥९॥
गर्गाची कन्या रुक्मदासी दीली ॥ बहुत आनंदे उल्हासली ॥ कौसिक कन्या रत्न अर्पीली ॥ रुक्म भूषणासी तेधवा ॥१०॥
मेळवून सकळ ऋषी मंडळ ॥ शिव पार्वती गण मेळ ॥ इंद्र चंद्र गण गंधर्व सकळ ॥ लग्न सोहळा पै केला ॥११॥
ऐंसे संपादून पाच दिवस ॥ देव दुंदुभी वाजविती परियस ॥ पुष्प वृष्टी आसमास ॥ महोत्सव थोर पै केला ॥१२॥
गण गंधर्व गायन करीती ॥ रंभा उर्वशी मेनका नाचती ॥ ऋषी वेदघोष करीती ॥ लग्न यथा विधी पै झाले ॥१३॥
ऐंसा पाहोनी लग्न सोहळा ॥ सर्व हे गेलें आपुल्या स्थळा ॥ मुक्तदेव प्रभावती वेल्हाळा ॥ स्वनगरासी पै गेलें ॥१४॥
इति ब्रह्मांड पुराणेतिहास ॥ भविष्योत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्मशास्त्र त्यास प्रमाण ॥ दशमोध्याये गोड हा ॥१५॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 07, 2011
TOP