खंड ६ - अध्याय ३२
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ शक्ति अन्य आदि शक्तीस । विचारिती प्रश्न एक सुरस । जरी नव्हाता देव ऋषींच्या चित्तास । काम कांहीं तैं उरला ॥१॥
तरी ते कामासुराचा वध वांछित । हा काम तैं निष्काम कैसे असत । तें आदिशक्ति सांगत । सांगते भेद दोन्ही मार्गींचा ॥२॥
सकाम मार्ग निःकाम मार्ग । सांगतें ऐका भेद ज्ञानग । संशयच्छेद होऊन मग । चित्त तुमचें शमेल ॥३॥
स्वदेहपोषणासाठीं यशासाठीं । कामसंयुक्त भावयुक्त चित्तीं । देवांस जे नर भजती । ते सकास जाणावे ॥४॥
स्वस्त्रधर्म पालनार्थ करिती । देव सेवेस्तव कर्में जगती । ते देवांसी निष्काम भजती । परम भाव धरूनियां ॥५॥
देवांनी जी केली भक्ति । ती निःकामिकाच होती । ती कशी तें सांप्रती । प्रिय शक्तींनो ऐकावें ॥६॥
त्य निःकाम भक्तीचें चिन्ह । हित कामनेनें सांगेन पावन । सृष्टिस्थितिलयार्थ विनतमन । ब्रह्मादिदेव कर्मपर ॥७॥
जें गजाननासी म्हणती । आम्ही जीं कर्में करितों जगतीं । ती तुझी सेवा निश्चिती । क्रीडा तुझीच ती असे ॥८॥
सर्वांच्या ह्रदयांत राहून । भोग भोगसी तूं दोषविहीन । म्हणोनि ती सेवा पावन । देहपोषिक तुझीच ॥९॥
तुझ्या प्रीतिस्तव करित । आनंदें स्वधर्मकार्यें समस्त । सृष्टि आदि क्रिया तव तोषार्थ । म्हणोनि करितों ही प्रार्थना ॥१०॥
दैत्यमुख्यानें त्या सांप्रत । सेवा तुझी केली खंडित । ती सेवा करण्या असमर्थ । उत्सुक असूनही आम्हीं सारे ॥११॥
ऐसी प्रार्थना करित । देवसंघ विकत देवाप्रत । देहभोगादि भावांत । यशाची स्पृहा त्यांना होती ॥१२॥
स्वधर्मसंयुत टाचें विशेष चरित । जें ऐकतां भक्ति लाभत । श्रोत्यासी तैसी उद्गात्यासी ॥१४॥
कुंभकर्णादी सर्व जाती । कामासुराप्रती भयभीत चित्तीं । महावीराम त्या निवेदिती । घडला सर्व वृत्तान्त ॥१५॥
मयूरेश विकट नामें ख्यात । आला असे देवप्रार्थित । तो वधील महासुरांसी निश्चित । ऐसी आशंका वाततसे ॥१६॥
त्या विकटाचा दृष्टिनिपात । देवांसी तेजयुक्त करित । आम्हीं तेजविहीन समस्त । महामते हें आश्चर्य वाटे ॥१७॥
आतां विकटासी जावें शरण । हेंचि शुभद आपणा शोभन । अन्यथा असुरसंघ विनाश अशोभन । अटळ वाटे आम्हांसी ॥१८॥
कुंभकर्णाचें ऐकून वचन । झाले असुर क्रोधमग्न । निर्भर्त्सना त्याची करून । सर्वांसमक्ष बोलतसे ॥१९॥
ऐसा विकल होऊन । कां बोलसी भ्रांत वचन । कामासुराचा वेग सहन । करील ऐसा कोण कोण असे ॥२०॥
बळीचें वचन ऐकून । प्रतापी कामासुर बोले विषाद मन । आकाशवाणी सत्य होऊन । आला माझा शत्रू येथ ॥२१॥
आता मारीन किंवा मरेन । त्याची चिंता न करी माझें मन । कामासुराचा निश्चय ऐकून । दुर्मद असुर बोले त्यासी ॥२२॥
तेजस्वी वीर्ययुक्त वचन । कुंभकर्णे पाहिला विकट म्हणून । उत्पत्तिनाशयूक्त जाण । अन्यथा कैसे दर्शन झालें ॥२३॥
जें जें होतसे दृष्ट । तें तें होतसे विनष्ट । ऐसें वेदवचन इष्ट । मनीं आण महामने ॥२४॥
तेव्हां महाराजा कामासुरा तुजसी । कैसा मारील तुज वरयुक्तासी । चिंता सोडी राजेंद्र तयासी । आम्ही प्रार्थू निःसंशय ॥२५॥
शत्रूस यासम विजयवंत । होऊं आम्हीं निश्चियें जगांत । आज्ञा द्यावी महादैत्यांप्रत । तुझ्या चरणाचे किंकर जे ॥२६॥
पहा आमुचें महावीर्य रणांत । देवांचा नाश जें करील त्वरित । देवांनी माया केली अदभुत । आकाशवाणी करविली ॥२७॥
भयरूपिणी आकाशवाणी करून । दैत्य राक्षसा भिववून । देव साधू पाहती स्वइच्छित पूर्ण । विचार करी बुद्धिमंत ॥२८॥
ही आकाशवाणी नसत । देहधारी कैसा मारील तुल जगांत । तूं महाबळी प्रतापवंत । चिंता कशाची आतां तुजला ॥२९॥
दुर्मदाचें ऐकून वचन । बळी आदि महाक्रूर आनंदून । त्यास म्हणती तुझें भाषण । सर्वंथैव सत्य असे ॥३०॥
तदनंतर कामासुर । जमवून सर्व असुरवीर । चतुरंग बळें युक्त शूर । गजाननाशी लढण्या गेला ॥३१॥
शुक्रानें नंतर दैत्येंद्रास । बोध केला अति सुरस । विविध गोष्टी तयांस । सांगे तेव्हां उपदेशपर ॥३२॥
परी मदोत्सिक्त कामासुर । बळगर्वें मोहित फार । न ऐके वचन जें सांगे शुक्र । मायामोहप्रभावें ॥३३॥
मुनिमुख्य तो शुक्राचार्य जाणत । भावी काळवेग निश्चित । त्याचा निरोप घेऊन जात । परी कामासुर मानेना ॥३४॥
दैत्य क्रोधयुक्त प्रहर्षित । युद्ध करण्या अति उत्कंठित । देवांचें मर्दन करण्या जात । जेथ ते पूर्वी राहिले होते ॥३५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचारिते देवदैत्यसमागमो नाम द्वात्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP