अंगाईगीते - दूध
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
दूध
नीज रं नीज बाला
दारी गोसावी आला
बालाची आस गेली तांबडे माला
गोसाव्यानं पैसा दिला
बाल दुधाला गेला
दुधाची मडकी घेऊन आला
दूध
नीज रे नीज बाळा
दारी गोसावी आला
बाळाची आई गेलीये तांबड्या माळावर
बाळाला गोसाव्याने पैसा दिला
बाळ दूध आणायला गेला
दुधाचे मडके घेऊन आला
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP