अंगाईगीते - बाळाचे गायी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
बाळाचे गायी
बाळाचे गायी गेल्या आंबरायी
बाळाचे गायी गेल्या गोठणीवं
बाळाचे गायी गेल्या धसाधसा
बाळाला नूनू पसापसा
बाळाचे गायी आल्या गोठीयात
बाळाला दूदू लोटीयात
बाळाच्या गायी
बाळाच्या गायी आंबराईत गेल्या
बाळाच्या गायी गायरानात गेल्या
बाळाच्या गायी गेल्या धसाधसा
बाळाच्या दूध मिळाले पसापसा
बाळाच्या गायी आल्या गोठ्यात
बाळाला दूध मिळाले लोट्यात
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP