हेतुर्धर्मार्थकामानां भार्या सच्छीलशालिनी ।
विवाहकालशुद्धया सच्छीलं तस्माद्रवीमि ताम् ॥४॥
वैदिक मंत्रांनीं युक्त असलेला ब्राह्मविवाहविधि हाच ब्राह्मणांना लग्नाचा मुख्य विधि सांगितला आहे . ब्राह्मविवाहामध्यें कालाची शुद्धता पाहून विवाहसंस्कार केल्यानें भार्या धर्मपरायण व सच्छील होऊन तिच्या सहवासानें पतीला धर्म , अर्थ व काम असे त्रिविध पुरुषार्थ साधितां येतात . म्हणून विवाहसमयीं सर्व प्रकारची शुद्धता पाहून नंतर वैदिकसंस्कारपुर्वक पतिपत्नींचा प्रेमळ , पवित्र व पुण्यप्रद संयंध जोडावा , म्हणजे दंपत्य चांगल्या प्रकारें नांदतें .
विवाहसंबंधास बंधनें .
सापिंडयगोत्रप्रवरान्वयानां शुर्द्धि बुधेन प्रथमं विचिंत्य ।
चिंत्यानि वैवाहिकसाधनानि तदन्यथात्वं यदनर्थहेतुः ॥५॥
विचारी पुरुषानें विवाहाच्या पूर्वीं , ज्या कुलांतील वधूवरांचा संबंध जोडा - वयाचा असेल त्यांचें परस्परांतील सापिंडय ( मूळ पुरुषापासून पिढयांचा संबंध ), गोत्र , प्रवर आणि कुळ यांची शुद्धता पाहून नंतर अष्टविध मैत्री , वधूवरांचे परस्पर अनिष्ट योग , इत्यादि विवाहसाधनांचा विचार करावा .