वर्ण व वश्य विचार

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


कर्कवृश्चिकमीनाख्या ब्राह्मणा अथ बाहुजा : ।

मेषसिंहधनुष्काख्या वृषकन्यामृगा विश : ॥६९॥

तुलाद्वंद्वघटाः शूद्राश्चैते वर्णाश्च राशिजा : ।

वर्णाधिक्ये वर : श्रेष्ठो न कन्यावर्णतोऽधिका ॥७०॥

एको गुणः सद्दग् वर्णे तथा वर्णोत्तमे वरे

हीनवर्णे वरे शून्यं केऽप्याहुः सद्दशे दलम् ॥७१॥

कर्क , वृश्चिक आणि मीन या राशींचा ब्राह्मण वर्ण होय . मेष , सिंह , आणि धनु या राशींचा क्षत्रिय ; वृषभ , कन्या आणि मकर यांचा वैश्य ; आणि तूळ , मिथुन व कुंभ यांचा शूद्र ; याप्रमाणें राशींचे वर्ण जाणावे . हे वर्ण ध्यानांत ठेवण्याची सोपी रीति अशी आहे कीं , मीनापासून कुंभापर्यंत बारा राशींचे अनुक्रमानें ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र हेच पुन : पुन : जाणावे . जसें , मीनराशीचा विप्रवर्ण , मेषराशीचा क्षत्रिय , वृषभराशीचा वैश्य , आणि मिथुनराशीचा शूद्र : पुनः कर्कंराशीचा विप्र याप्रमाणें पुढें कुंभराशीपर्यंत वर्ण मोजावे . वधूवरांचा एक वर्ण किंवा वराचा उच्चवर्ण असेल तर गुण एक . वधूचा उच्चवर्ण असतां गुण शून्य . वर्णांच्या संबंधानें शूद्र , वैश्य , क्षत्रिय व ब्राह्मण हा अनुक्रमें अधिकाधिक उच्च क्रम जाणावा .

वश्यविचार .

द्वंद्वचापघटकन्यका तुला मानवा अजवृषौ चतुष्पदौ ।

कर्कमीनमकरा जलोद्भवा : केसरीवनचरोऽलिकीटका : ॥७२॥

वैरमक्ष्ये गुणाभावो द्वयो : साम्ये गुणद्वयम् ।

वश्यवैरे गुणश्चैको वश्यमक्ष्ये गुणार्धकम् ॥७३॥

वरील श्लोकामध्यें शब्दांवर जे अंक दिले आहेत ते राशींचे अनुक्रमांक आहेत . मिथुन , धनु , कुंभ , कन्या आणि तूळ ह्या मनुष्यराशि होत . मेष , वृषभ या चतुष्पादराशि होत . कर्क , मीन आणि मकर या जलचरराशि होत . सिंह ही वनचरराशि आणि वृश्चिक ही कीटकराशि आहे असें जाणावें . ह्या परस्पर राशींचें मित्रत्व किंवा वैर वगैरे व्यवहारावरून ठरावावें . तथापि बाजूस गुणांचें कोष्टक दिलें आहे , त्यावरूनही ठरवितां येईल . ज्या परस्पर राशींचें साम्य म्हणजे मैत्री आहे , त्याचे २ गुण दिले आहेत , ज्यांचें परस्पर वश्यवैर आहे , त्याचा १ गुण आहे . ज्यांचा परस्पर वश्यभक्ष्य संबंध आहे आहे त्याचा अर्धा गुण आहे , ज्यांचा वैरमक्ष्यसंबंध आहे त्याचा शून्य गुण आहे . परस्पर वैरमक्ष्यसंबंध म्हणजे , उदाहरणार्थ , जलचररशि ह्या मानवराशींचें भक्ष्य आहेत , व मानवराशींचें जलचरांशीं वैर आहे , म्हणून हा परस्पर वैरभक्ष्यसंबंध होय . याचप्रमाणें वश्यवैर , वश्यभक्ष्य इत्यादि जाणावें . स्पष्टीकरणार्थ , चतुष्पादराशींचें आडवें कोष्टक पहा . वधूवरांच्या समान प्रकृतीच्या राशी असतां २ गुण ; दोघांतून एकाची चतुष्पाद व दुसर्‍याची मानव असतां अर्धा गुण ; जलचर किंवा कीटक असतां १ गुण ; वनचर असतां शून्य गुण याप्रमाणें सर्व कोष्टक पहावें .

 

मा

की

चतु .

मानव

जल

वन

कीट

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP