विषकन्यायोग

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


सूर्यभौमार्किवारेषु तिथिर्भद्रा शताभिधा ।

आश्लेषा कृत्तिका चेत्स्यात्तत्र जाता विषांगना ॥३९॥

जनोर्लग्ने रिपुक्षेत्रसंस्थितः पापखेचर : ।

द्वौ सौम्यावपि योगेऽस्मिन्संजाता विषकन्यका ॥४०॥

लग्ने शनैश्चरो यस्या : सुतेऽर्को नवमे कुज : ।

विषाख्या सापि नोद्वाह्या विविधा विषकन्यका ॥४१॥

( १ ) रवि , मंगळ किंवा शनि यांपैकीं एकाद्या वारीं भद्रातिथि म्हणजे द्वितीया , सप्तमी किंवा द्वादशी यांपैकीं एकादी तिथि असून त्याच दिवशीं शततारका , आश्लेषा , कृत्तिका यांपैकीं एकादें नक्षत्र असतां , अशा तिथिवारनक्षत्रयोगावर जन्मलेली कन्या विषकन्या म्हणावी .

( २ ) जिच्या जन्मलग्नीं पापग्रह असेल व तो शत्रुक्षेत्रींचा असेल , तीही विषकन्या जाणावी .

( ३ ) किंवा जन्मलग्नीं दोन शुभग्रह असून जर ते शत्रुक्षेत्रीं असतील तर तीही विषकन्या होय .

( ४ ) वराच्या शत्रुगृहीं असणारा पापग्रह वधूच्या जन्मलग्नीं असतां विषकन्या योग होतो . अथवा

( ५ ) जन्मलग्नीं शनि , पंचमस्थानीं रवि आणि नवमस्थानीं मंगळ असा ग्रहयोग असतां ती विषकन्या म्हणावी .

असे विषकन्यायोगाचे चार पांचप्रकार आहेत .

विषकन्यायोगाचा अपवाद .

जन्मभाज्जन्मलग्नाद्वा द्युनपः स्वगृहे शुभ : ।

केंद्रे कोणेऽथवा चंद्रो लग्नाधीशः शुभग्रह : ॥४२॥

बृहस्पतिर्भृगुः स्वोच्चे मित्रस्थे बलिनस्तथा ।

एषु योगेषु या जाता न भवेत् विषकन्यका ॥४३॥

जन्मराशीपासून ( म्हणजे चंद्रापासून ) किंवा जन्मलग्नापासून सप्तमेश शुभग्रह असून स्वक्षेत्रीं असेल अथवा लग्नस्वामी शुभग्रह असून केंद्रांत १।४।७।१० किंवा त्रिकोणांत ५।९ या स्थानीं असेल किंवा तेथेंच ( केंद्रांत किंवा त्रिकोणांत ) चंद्र , गुरु किंवा शुक्र बलवान् म्हणजे स्वगृहीं , उच्चीचे मित्रक्षेत्रीं , अथवा शुभ ग्रहांनीं द्द ष्ट असतील , तर विषकन्यात्वदोष नष्ट होतो . असे योग असतां कुजदोषाचाही परिहार होतो .

विषकन्यायोगाचा परिहार .

जन्मोत्थं च विलोक्य बालविधवायोगं विधाय व्रतं

सावित्र्या उत पैप्पलं हि सुतया दद्यादिमां वा रह : ।

सल्लग्नेऽच्युतमूर्तिपिप्पलघटै : कृत्वा विवाहं स्फुटं

दद्यात्तां चिरजीविनेऽत्र न भवेद्दोषः पुनर्भूभव : ॥४४॥

कन्येच्या जन्मकुंडलींत वैधव्यसूचक दुष्ट ग्रहांचा योग दिसल्यास त्या कन्येकडून सावित्रीचें किंवा अश्वत्थाचें व्रत करवावें . किंवा गुप्त रीतीनें विष्णुमूर्ति , अश्वत्थ किंवा कुंभ यांचेबरोबर त्या कन्येचा विवाह करून नंतर ती कन्या शुभ मुहूर्तावर दीर्घायुषी , योग्य व सुलक्षणी वराला द्यावी . असा कुंभादिविवाह केल्यामुळें त्या वधूला पुनर्विवाहाचा दोष लागत नाहीं .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP