वध्वा वरस्य वा तात : कूटस्थाद्यदि सप्तम : ।
पंचमी चेत्तयोर्माता तत्सापिंडयं निवर्तते ॥६॥
‘ सपिंड ’ या शब्दापासून सापिंडय शब्द झाला आहे . स म्हणजे समान आणि पिंड म्हणजे मूळ पुरुष ; कर्थात् मूळ पुरुष ज्यांचा एक असेल , अशा सापिंडयांतील वधूवरांचा विवाह करणें निषिद्ध मानिलें आहे . पण हा सापिंडयाचा नियम कांहीं नियमित पिढयांपर्यंतच प्रतिबंधक ठरविला आहे , ही येथें शास्त्रकारांची व्यवहारदक्षता दिसून येते . वधूवरांचा पिता मूळ पुरुषापासून सातवा असेल आणि त्यांची माता मूळ पुरुषापासून पांचवी असेल , तर पुढील पिढीला सापिंडयाची निवुत्ति होते म्हणजे अनुक्रमें आठव्या व सहाव्या पिढींतील वधूवरांचा विवाह करणें शास्त्रविहित आहे . वधूवरांच्या पित्याकडून जो सापिंडसंबंध मूळपुरुषाकडे पोंचतो , त्यास पितृद्वारक सापिंडय म्हणतात . व त्यांच्या मातेकडून पोंचतो त्यास मातृद्रारक सापिंडय म्हणतात . या विषयाचें विशेष विवरण धर्मसिंधु , निर्णयसिंधु इत्यादि ग्रंथांतरीं आहे .
सापिंडयसंकोच .
वर जें पितृद्वारक आणि मातृद्वारक सापिंडय सांगितलें आहे , त्याचा संकोच करून , अगदीं संकटावस्था प्राप्त झाली तर तिसर्या पिढीपासूनही विवाह करावा असें कांहीं ऋषींचें मत आहे . आणि तदनुसार कांहीं कुलांमध्यें मूळ पुरुषापासून तिसर्या पुरुषानें तिसर्या कन्येशीं म्हणजे बहिणीच्या मुलाशींचे ) विवाह करण्याची पद्धति आहे . पण ज्यांच्या कुलामध्यें हा संप्रदाय शिष्टसंमत समजला जात असेल , व परंपरेनें तो चालत आला असेल , त्यांनींच मातुलकन्या वरावीं . कारण असा संबंध करणें हा गौण पक्ष आहे असें पुष्कळ लोक समजतात , व अनेक शास्त्रकारांचेंही तसेंच मत आहे . त था पि , संकटसमयीं मात्र असा संबंध करावा असें
कांहीं ऋषि म्हणतात . पण याहीपेक्षां विचित्र संप्रदाय कर्नाटकांत शिष्टसंमत समजला जाऊन भाऊ , बहिणीच्या कन्येशीं म्हणजे भाचीशीं प्रतिबंधरहित उघड रीतीनें विवाह करितो . कांहीं देशस्थांत , म्हणजे तैत्तिरीय शाखेच्या यजुर्वेदी ब्राह्मणांतही दारिद्यामुळें केवळ अतिसंकटकाळीं असा विवाह करण्याची क्वचित् रूढी आहे . पण हा प्रकार शास्त्रनिषिद्ध आहे . कारण बहिणीची कन्या ही भावाला नात्यानें स्वतःच्या कन्येप्रमाणेंच होते ; म्हणून हा संधंध वर्ज्य करावा . असो . सांप्रत , एका मूळपुरुषाच्या पिढीपासून मातृपक्षाकडून चतुर्थ पुरुषाशीं विवाह करण्याचा प्रचार सर्वत्र रूढ होत चाललेला आढळतो . पण यांत एक मुख्य गोष्ट अत्यंत आवश्यक आहे ती ही कीं , विवाहनीय वधूवरांचें समान गोत्र व समान प्रवर असूं नयेत . म्हणून या निय मा चें उल्लंघन द्विजांनीं कदापि करूं नये .
विरुद्धसंबंध .
वधूवरयो : परस्परं पितृमातृसाम्ये विरुद्धसंबंध : ।
अविरुद्धसंबंधामुपयच्छेत ॥ ( स्मृति .)
वधूवरांमध्यें परस्परांत नात्यानें मातृपितृतुल्य संबंध जर येत असेल . तर तो विरुद्धसंबंध होतो , म्हणून अशा वधूवरांचा विवाह करूं नये ; कारण अविरुद्ध संबंध असेल , तेथेंच कन्या द्यावी असें सर्वसामान्य स्मृतिवचन आहे . विरुद्धसंबंध म्हणजे उदाहर णा र्थ , सावत्र आईची बहीण , व तिची कन्या , भगिनीची कन्या ( मामाभाची ) चुलत्याच्या बायकोची बहीण , बायकोच्या बहिणीची मुलगी इत्यादिकांशीं विवाह करूं नये . सारांश , सापिंडयसंबंध नसूनही जर विरुद्धसंबंधाचें नातें असेल तर विवाह होत नाहीं .
दत्तक सापिंडय .
भाऊवंदांपैकीं स्वगोत्रांतील मुलगा दत्तक घेतला असेल , तर तो सगोत्र व सपिंडच आहे म्हणून त्याच्याबद्दल सापिंडयसंबंधाचा विचार करण्याचें कारणच नाहीं . आतां परगोत्रांतील मुलगा दत्तक घेतला असेल तर त्यानें जनक ( जन्मदात्या ) पित्याचें गोत्र व दत्तक घेणार्या पालक पित्याचें गोत्र अशीं दोन्ही गोत्रें पाळलीं पाहिजेत . म्हणजे जनक गोत्रांतील कन्येबरोबर व पालक गोत्रांतील कन्येबरोबर त्याला विवाह करितां येत नाहीं . हा दोन गोत्रांचा संबंध कितीही पिढया लोटल्या तरी कधींच तुटत नाहीं . इतकेंच नव्हे , तर स्वतः दत्तक , त्याची पुत्रपौत्रप्रपौत्रादि सर्व संतति व उभयकुलांतील त्याचे सर्व सपिंड ह्या सर्वांनीं हें दोन गोत्रांचें नियमबंधन पाळलेंच पाहिजे . जर उपनयन झालेला परगोत्रांतील मुलगा दत्तक घेतला असेल , तर त्या मुलानें जनक मातापितरांचें ( जन्मदात्या मातापित्यानें उपनयन केल्यामुळें ) अनुक्रमें पांच व सात पिढया सापिंढय पाळावें आणि पालक मातापितरांचें तीन पिढया पाळावें . पण परगोत्रांतील दत्तकाच्या पालक पित्यानें जर मुलाचे उपनयनादि संस्कार केले असतील , तर पालक मातापितरांचें अनुक्रमें पांच व सात पिढया व . जनक मातापितरांचें तीन पिढयाच सापिंढय पाळावें . ह्याचप्रमाणें परगोत्रांतील कन्या दत्तक घेतली असतां जनक व पालक अशा दोन्ही पित्यांचीं गोत्रें विवाहाला वर्ज्य करावीं .