प्रथम स्कंध - अध्याय दुसरा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
॥ श्रीगणेशायनमः । श्रीसरस्वत्यैनमः । श्रीमत्सग्दुरुचरणारविंदाभ्यांनमः । श्रीमहाराज्ञैनमः । सूतम्हणेधन्य आज भाग्यवान्मीसहज । प्रशनयोगेतुमच्यागुज । स्मरलेमजऋषीहो ॥१॥
सर्ववेदाचेजेंमत । सर्वशास्त्राचेवित्त । ऐसेउत्तमभागवत । सांगेन ऐकाएकचित्तें ॥२॥
जीचेकोमलपद । वंदितीदेव मुनिवृंद । तेनमूनिमोक्षप्रद । चरित्रतीचेवर्णितो ॥३॥
उत्पत्तिस्थितिलय । करीपरीनिरामय । व्ययरुपासीअव्यय । भासविलेजियेने ॥४॥
जरी ह्मणूविधीकर्ता । विष्णुजरीसर्वभर्ता । तरीदोघास्वाधीनता । अणुमात्रनसेची ॥५॥
झोपींगेलानारायण । नेणेध्याइचतुरानन । शेषावरीपराधीन । एकार्णवीनिजेला ॥६॥
आधारशक्तिमहाविद्या तीईश्वरीसर्ववंद्या । नमूनिसूतेआत्मविद्या । भागवतगातसे ॥७॥
हेश्रीमतभागवत । अठ्रासहस्रश्लोकयात । स्कंदबाराविख्यात । तीनशेअठ्राआध्याय ॥८॥
जीमूळ असे निर्गुणा । तीजईंझालीत्रिगुणा । कृष्णरक्तशुक्लवर्णा । कालीलक्ष्मीसरस्वती ॥९॥
सूष्ठयर्थह्मणोनिसर्ग । तीनीदेवप्रतिसर्ग । सोमसूर्यादिराजवर्ग । वंशवर्णनतीसरे ॥१०॥
मनूवर्णनमन्वंतरे । तयांचावंशविस्तरे । वर्णिजेतयथावसरे । वंशानुचरितपंचम ॥११॥
यापांचलक्षणाविषईं । दुजापुराणसंख्ये विषईं । दोनीश्लोकयाठाईं । गौरवाथंदेतसे ॥१२॥
श्लोक । सर्गश्चप्रतिसर्गश्चवंशोमन्वंतराणिच । वंशानुचरितंचैवपुराणंपचलक्षणं ॥३॥
मद्वयंभद्वयंचैवब्रत्रयंवचतुष्टयं । अनापलिंगकूस्कानिपुराणानिपृथक्पृथक् ॥४॥
ऐसीहींपांचलक्षणें । युक्त असतीपुराणें । मुख्य आणिउपपुराणे । अठ्राअठ्राआहेत ॥१३॥
मत्स्यपुराणपहिलें । चौदासहस्रकथिलें । मार्कंडेयवर्णिलें । नऊ सहस्रसुश्लोक ॥१४॥
साडेचौदाहाजार । भविष्याचा विस्तार । तैसेहें अठ्राहजार । श्रीदेवीभागवतपैं ॥१५॥
ब्रह्मपुराणदशसहस्र । शताधिकबारासहस्र । ब्रम्हांडपुढें अठ्रासहस्र । ब्रह्मवैवर्तसातवें ॥१६॥
अयुत असेवामन। पंचविसातचारशेउण । ऐसेसहस्रपुराण । नवमजाणावायूचे ॥१७॥
विष्णूचेतेवीसहस्र । वाराहगायत्रीसहस्र । अग्नीचेसोळासहस्र । तत्वसहस्रनारद ॥१८॥
पंचावन्सहस्रविस्तर । पद्मपुराण असेथोर । लिंगपुराणसुंदर । रुद्रसहस्रपधंरावे ॥१९॥
एकुणवीस सहस्र । गारुड असेअजस्र । कूर्मतेंसत्रासहस्र । एक्यांशीसहस्रस्कंदाचे ॥२०॥
ससंख्यहींमहापुराणें ऐकाआतांउपपुराणें । सनत्कुमारनारसिंह जाणे नारदशिवदौर्वास ॥२१॥
कपिलमनुकाव्यवरुण । कालीसांबनंदी गण । सौरपराशर आदित्यजाण । माहेश्वरभागवतवसिष्ठ ॥२२॥
एवंवदे वेदव्यास । मगवर्णिलाइतिहास । लक्षश्लोकेंभारतास । सत्यवतीपुत्रतो ॥२३॥
प्रतिमन्वंतरीद्वापरी । व्यासरुपेंस्वयेंहरी । एकवेदाविभागचारी । लोकहितार्थकरीतसे ॥२४॥
अल्पबुद्धीअल्पायुष । कलीमाजीस्त्रीपुरुष । ब्रह्मघ्नादिशूद्रास । वेदाधिकारनसेची ॥२५॥
तयांचेउद्धारासाठीं । प्रतिद्वापारी जगजेठी । व्यासरुपेपरीपाठी । रचितोहींपुराणें ॥२६॥
युगीयुगीजेजेव्यास । रचितेंझालेपुराणास । नांवेंत्यांचीसत्तावीस । सांगतोतींपरिसावी ॥२७॥
ब्रह्मादक्षप्रजापती । उशनाचौथाबृहस्पती । सूर्यमृत्युदेवपती । आठवातोवसिष्ठ ॥२८॥
सारस्वत आणित्रिधामा । त्रिवृषहीभरद्वाजशर्मा । अंतरिक्ष आणिधर्मा । त्रय्यारुणीधनंजय ॥२९॥
मेधातिथीव्रतीव्यास । अत्रीऋषीगौतमवीस । उत्तमनामेहर्यांम्यास । आणीवेनोवाजश्रवा ॥३०॥
सोम अमुष्यायणतृणबिंदू । भार्गवशक्तीतपस्रिंधू । जातुकर्ण्यकृपासिंधू । बादरायणयायुगी ॥३१॥
पुढिलियेद्वापरी । द्रौणीव्यासनिर्धारी । होणार ऐसीवैरवरी । ऐकिलीम्यागुरुमुखें ॥३२॥
अरणीभवशुकपुत्र । वैराग्यशीलपवित्र । तयाशींव्यासेहेंचरित्र । सांगपठणकरविलें ॥३३॥
तेवेळींमजलाधलें । सांगसर्व ऐकिलें । देवीचरित्रवहिलें । पुराणगुह्यपावन ॥३४॥
शुकसंभवकेविझाला । सूतेऐसाप्रश्न ऐकिला । शुकजन्माचियाकथेला । आरंभिलेंतयानें ॥३५॥
सरस्वतीतीराश्रम । व्यासाचातोअभिराम । सहजबैसलेविश्राम । तैंनवलवर्तलें ॥३६॥
आश्रमाचेवळवणी । राहतहोतीचिमणाचिमणी । तीबाळाचेवदनी । दाणादेतीसप्रेमे ॥३७॥
तयासीअंगेस्पर्शती । वारंवारमुखचुंबिती । क्षणहीतेनविसंबिती । पाहूनिऋषीमोहिला ॥३८॥
अहोधन्यसंसारसुख । जेणेंपाहिलेपुत्रमुख । त्यासीच इहपरसुख । पशुपक्षीसुखावती ॥३९॥
मजनाहींमुळींचगृह । तेथेंकैचादारसंग्रह । पुत्रहोणेचासंदेह । करणेचिनको ॥४०॥
धर्मशास्त्रीस्मृतीवचन । वेदींतैसेचिप्रमाण । पुत्रेवीण अनृण । नोहेस्वर्गमोक्षादी ॥४१॥
कोणतादेवसेवावा । जेणेपुत्रप्राप्तव्हावा । तरीथोरकोणह्मणावा । नकळेतत्वकांहींच ॥४२॥
ऐसेममगुरुचिंतित । तवनारद आले अकस्मात । मधुरमहतीवाजवीत । सामगायनकरितचि ॥४३॥
देखताचिबादरायण । अभ्युथ्यानेसन्मानून । उत्तमासनीबैसवून । अर्घादिकींपूजितसे ॥४४॥
परस्परेंकुशलपुसती । नारदह्मणेव्यासाप्रती । दुःख असेकींचितीं । उद्विग्नसेकासया ॥४५॥
व्यासह्यणेदेवर्षी । गतिनसेअपुत्रिकासी । पुत्रमागुकोणासी । मुख्यदेवकोणसांगा ॥४६॥
हांसोनीबोलेदेवमुनी । मीपुशिलेंपितयाजाउनी । थोरकोणत्रिभुवनी । देव असेसांगिजे ॥४७॥
विधीसांगेमजसी । तेऐकासावकाशी । एकदावैकुंठासी । गेलाहोताविधाता ॥४८॥
ध्यानीपाहूनहरीशी । आश्चर्यकरीमानसी । पुशिलेंतैंरमावराशी । चतुराननेंचातुर्यें ॥४९॥
देवाधिदेवासर्वज्ञा । त्रैलोक्यपाळीवाज्ञा । आद्यंततूंचिप्राज्ञा । अनंताद्वयपरब्रह्म ॥५०॥
सृष्टिस्थितिआणिलय । करुनितूंअव्यय । मृत्युवायूरवीभय । तुझेंचसर्वमानिती ॥५१॥
तुझापुत्रमीविधी । सकळ उत्पत्तीसाधी । हरसकळा शीबाधी । तोहीतुझेवचनांत ॥५२॥
ऐसेंअसूनरमाधवा । जपसीतूंकोणत्या देवा । तुजहूनिथोरकेशवा । कोणाअहेसांगिजे ॥५३॥
नवलफारमाझेमनी होतेतुजपाहतांध्यानी । गुप्तजेकींकृपाकरुनी । उकलोनिसांगिजे ॥५४॥
ऐकूनिऐशियाबोला । हरीह्मणेभलारेभलारे । प्रश्नतुवानेटकाकेला । सावधान ऐकिजे ॥५५॥
कर्ताभर्तासर्वहर्ता । तुजमज आणिउमाकांता । जाणतीलोकतत्वता । परीनेणतीते ॥५६॥
तुजमाजीजेराजसी । सात्विकीमतह्रदयवासी । शिवामाजीजेतामसी । प्रबळशक्तीतोचिपैं ॥५७॥
तयाशक्तीवांचूनिया । शक्तनोहेचिकराया अशक्तचीजाहलीया । सर्वकर्मेंराहती ॥५८॥
परोक्षेहेप्रमाण । वेदेहीगाइलेंजाण । महर्षीवाक्यप्रमाण । ऐसेंचिअसे ॥५९॥
प्रत्यक्षत्वांदेखिलें । निद्रेनेंमजव्यापिलें । सर्वज्ञत्वकोठेंगेलें । माझेतेव्हांचतुर्मुखा ॥६०॥
तेव्हांजीत्वांस्तविली । तामसीशक्तीमाउली । तिचेचकटाक्षबळी । मधुकैटभम्यांवधिले ॥६१॥
छिंन्नझालेंमाझेंशिर । तैकोठेंमीसर्वेश्वर । वेदेंगाइलीअपार । अगोचर बोलिली ॥६२॥
ममदेहींअश्वशिर । त्वष्टायोजीआज्ञानुसार । हयग्रीवेंम्यां दुर्धर हयशीर्षमारिला ॥६३॥
तिच्याच इच्छेंकरुनी । सुखेंवसेंवैकुंठभुवनीं । रमेसहशेषशयनी । गरुडासनीसुखावे ॥६४॥
कदाचिदिच्छेंकरुन । तीचेचभ्रमतोत्रिभुवन । असुरींयुद्धदारुण । करणेंमजलागतें ॥६५॥
मच्छकच्छादिअवतार । घेतांमजश्रमफार । टाकूनिरमामनोहर । सुखकाय अन्ययोनी ॥६६॥
जन्ममरणगर्भवास । भोगितोंमीसायास । कांसहेलकोणीत्रास । स्वतंत्र असेजरी ॥ ६७॥
देहधारणजैंझाले । पारतंत्र्यतैंलाधले । स्वकर्मसूत्रेंव्यापिलें । अणूपासूनिब्रह्मांड ॥६८॥
सर्वांतर्यामिनीकला । आदिमायातीप्रबला । तिचेआधीनझाला । सर्वलोकजाणिजे ॥६९॥
तीचेचकरावेंभजन । एकाग्रेकीजेध्यान । मगतीचकृपाकरुन । एरझारसंपवी ॥७०॥
ऐसीजीपरमपावनी । तुजमाजीतेजजनी । तिचेध्यानकरुनी । सुखसर्वलाधलों ॥७१॥
तूहीतीचेध्यानकरी । सुखेनांदेसंसारी । ऐसेसांगेमजहरी । ह्मणोनिबोलेममपिता ॥७२॥
नारदसांगेबादरायणा । सदाध्याइजेअर्पणा । तीचगुणानिर्गुणा । वरदावरिष्ठातीचपै ॥७३॥
नारदे एवंवदूनि । गमनकेलेंतेथोनी । व्यासेकैलासाजाऊनी । दुश्चरतप आरंभिलें ॥७४॥
शत आणि अठ्ठेचाळीस । भागवतांतीलश्लोकास । वदलीयेथेंतात्पर्यास । महापूर्वाभाषेनी ॥७५॥
इति श्रीमद्देवीभागवत्सारसंग्रहे श्रीदेवीविजये प्रथमस्कंदे देवीप्रशंसननामद्वितीयो ऽ ध्यायः ॥२॥
श्रीत्रिगुणांबिकाप्रीतयेभवतु । * * * *
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP