प्रथम स्कंध - अध्याय सहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


। श्रीसरस्वत्यैनमः । एवंराजाचीगतीझाली । व्यासेंमनींकल्पिली । कल्पनाचित्तीरचिली । निश्चयकांहींचगमेना ॥१॥

व्यासासपाहूनसचिंत । देवकन्याभयभीत । शुकीरुपेंगेली त्वरित । शापभयेंकरुनिया ॥२॥

व्यासेंतीसपाहिलें । मनींआश्चर्यगमले । तववीर्य स्खलनझालें । नाटोपेचीतेंधवां ॥३॥

अरणीअसतांमंथित । त्यामाजींपडलेंरेत । तत्काळ प्रगटलासुत । किंपावकदूसरा ॥४॥

तेजस्वीबाळपाहिला । व्यासेंतत्काळ उचलिला । गंगेमाजीन्हाणिला । आणिलामग आश्रमी ॥५॥

पुष्पवृष्ठीबाळावरी । देवकरितीहर्ष भरीं । स्वर्गस्थवाजल्याभेरी । नृत्यकरितींअप्सरा ॥६॥

उपजतांचिबाळवाढला । सप्तवर्षाचाकुमारझाला । व्यासेंव्रतबंधकेला । अतिउत्सवेंहर्षभरें ॥७॥

दंडकमंडलु अजिन । पडलेंदिव्यस्वर्गांतून । शुकींपाहतांझालाउत्पन्न । शुकनामठेविलें ॥८॥

बृहस्पतीगुरुकला । सांगवेदशुकशिकला । सर्वविद्यानिपुणझाला । थोडक्याचकालांत ॥९॥

दक्षिणादेउनीगुरुशी । शुक आलापित्यापाशी । व्यासेंआघ्रणुनीमस्तकासी । आलिंगुनिबैसविला ॥१०॥

कुशलपुसूनपुत्रासी । ह्मणेधर्मशास्त्रपढलासी । गार्हस्थ्य करुनिसुरवेंशी । देवपितरयजनकरी ॥११॥

सोडवीमजऋणांतून । गतीनसेपुत्रा वाचून । महानतपेंकरुन । प्राप्तझालासीअयोनिज ॥१२॥

ऐकून ऐसेंवचन । शुक ह्मणेव्यासालागून । अतिविरक्ततोआपण । ह्मनेंहेंकायशिकवितां ॥१३॥

यालोर्कीं सुखकाय । पितयासांगेनिरामय । सुखजेंभासेदुःखमय । तेंअमान्यज्ञानिया ॥१४॥

जरीआताकीजेदारा । मगदिसेप्रपंचसारा । स्त्रीवशहो उनीसैरा । चिंताग्रस्तफिरावें ॥१५॥

अन्नचिंतावस्त्रचिंता । लौकीक आणि धनचिंता । माझेसर्व ऐसीममता । मनाझ गडेयेउनी ॥१६॥

माझापुत्रमाझामित्र । माझेबंधूमाझेकलत्र । माझीकन्यामाझापौत्र । कुळगोतसर्वमाझें ॥१७॥

एकशत्रुएकसखा । मिळतीसर्व आपलेसुखा । प्रारब्धेंप्राप्त दुःखा । सखेसर्वदुरावती ॥१८॥

लोहबेडीपडलीपाईं । कालेकरुनतुटेजाई । संसार बेडीअक्षई । जन्मोजन्मीतुटेना ॥१९॥

तैसेंबंधननिगड । स्वहस्तेचीघेऊनदगड । स्वघा तकर्णेकींउघड । मनमाझेंइच्छीना ॥२०॥

मीझालोअयोनिज । तीयोनिनकोमज । विष्टाभक्षणीकायचोज । दारासंग्रहनकोनको ॥२१॥

प्रथमकेलेंवेदाध्ययन । तेतोकर्माचें कारण । यज्ञमिषेंहिंसाविधान । जन्ममरणदायकते ॥२२॥

गुरुमिळालेबृहस्पति । तेतोसंसारींबुचकळति । मुमुक्षुचेमनाशांती । कैशीमजमिळेतेथें ॥२३॥

गुरुनमूनितुज पाशी । आलोंजेबंधतोडिशी । भ्यालोंसंसारसर्पाशि । तारीतारीदयाळा ॥२४॥

व्यास ह्मणेसुकुमारा । बंधनमानिशीसंसारा । गृहस्थाश्रमसाजिरा । नव्हेकारणबंधासी ॥२५॥

मनेंजरीसुखावला । तोगृहस्थहीमुक्तझाला । हाआश्रम अतिभला । धन्यधन्यजाणिजे ॥२६॥

ब्रह्मचारीसंन्यासी । वानप्रस्थ आणितापसि । येतीगृहस्थद्वारासी । मध्यान्ह समयहोताची ॥२७॥

वेदोक्त आचरतागृहीं । तयासारखादुजानाहीं । अनुपासावसर्वही तृप्तहोतीगार्हस्थ्यें ॥२८॥

प्रातः स्नानसंध्यावंदन । प्रेमेंकरीऔपासन । ब्रह्मयज्ञ आणि तर्पण । कालनियमेंकरीजो ॥२९॥

वैश्वदेवबलिदान । प्राप्त अतिथीसदेतसेअंन । ऋतुकालींभार्यागमन । करीनित्यसत्यवादा ॥३०॥

वेदाध्ययनसत्यभाषण । कीजे नित्यसत्कथाश्रवण । शांतठेवावेंअंतः कर्ण । इंद्रियनिग्रहकरावा ॥३१॥

शमवावीमूळ वासना । पात्रपाहूनदीजेदाना । सदैवकीजेयज्ञनाना । जेणेंतुष्टेपरमेश ॥३२॥

सहितकरुनिव्याह्रती । विद्याजपिजे एकांति । राहटीऐशाजेवागती । नित्यमुक्तगृहस्थते ॥३३॥

आश्रमाचियासत्पथे । जावेंकदानचिकुपथें । ब्रह्मचर्येगृहस्थें । वानप्रस्थसंन्यास ॥३४॥

पुत्रात्वांकरोनिदारा । सुखेनांदावेघरा । ऋणत्रयांतूननिर्धारा । सोडवीमज लाडक्या ॥३५॥

पुत्रकरोनिउत्पन्न । तयाशीसंसारीस्थापून । वनींकीजेसुखेंगमन । वाक्यमाझेंमान्यकीजे ॥३६॥

शुकह्मणेमीनकरी । लग्नकदाबंधकारी । नर्ककुंडामा झारी पडूंकेविजाणतां ॥३७॥

वाक्य ऐकूनिनिष्ठूर । व्यासादुःखझालेंफार । नेत्रांतूनअश्रूचेपूर । लोटलेतेव्हांदुःखभरें ॥३८॥

पाहूनिपितादुःखित । शुकझालाबहुविस्मित । म्हणेमायाबळ अभ्दुत । पुराणकर्तामोहिला ॥३९॥

शुकेंनमूनमायेशी । बोलूंलागेपित याशी । म्हणेव्यर्थशोककरिशी । जैसाकोणीप्राकृत ॥४०॥

कैचापुत्रकैचापिता । कैचा बंधूकैचीमाता । मोह अवघाचीपाहतां । विचारुनपाहिजे ॥४१॥

जलपानेंशमेताहन । अथवाकेल्यापुत्रदर्शन । होतेकींक्षुधानिवारण । अंनावाचूनीपुत्रानें ॥४२॥

पुत्रमोहटा कुनीदेणें । यथार्थतेंमजशिकविणें । भवबंधतुटेलजेणें । अखंडसुखलाधेजै ॥४३॥

ऐकूनिपुत्राचेभाषित । व्यासह्मणेहेंभागवत । पाहेशुकाएकचित्त । बहुविस्तारनसेची ॥४४॥

वटपत्रशाईनारायण । मानसीविचारीआपण । बाळरुपींमजनिर्माण । केलें कोणेंनेणवें ॥४५॥

अवघेंजलचीभरलें । केवीझाडहेंउभारिलें । पत्रपुटीमजनिजविलें । कोणीयेथेंआश्चर्य ॥४६॥

तेसमईंतयाशीं । अर्धलोक उपदेशी । भगवतीजीपूर्णपरेशी । धारणकेलेंमुकुंदें ॥४७॥

सर्वंखल्विदमेवाहंनान्यदस्तिसनातनं । हीसोळाअक्षरें । ब्रह्मज्ञानबहुबरें । हेंसर्वमीचखरे । अन्यनसेसनातन ॥४८॥

बालत्वेंतोनारायण । श्लोकार्धाचेंउच्चारण । करितांसमक्षजाण । प्रगटलीशांतरुपें ॥४९॥

चतुर्भुजानारायणी । शंखचक्रादिधारिणी । आसमंतातसखीजनिं । सेवितीमंदहासा ॥५०॥

पाहूनीविष्णूतर्ककरी । कोण असेहीनारी । जननीकिंवामावकरी । केंविकरणेंयासमईं ॥५१॥

बोलावोंकिंवानबोलावें जावेंतरीकोठेंजावें । उगेंच असूंबालभावें । हेंचिमज उच्चित ॥५२॥

स्वयेचिबोलेदेवेशी । विष्णोमजविसरलाशी । सृष्टिप्रळयसमयेशी । पुनःपुनः जन्मयोगें ॥५३॥

महाशक्तिचेनिबळें । सृष्टिहोऊनीपुनः वितळे । निर्गुणातोचि जाणवहिलें । सगुणरुपाअसेमी ॥५४॥

मुख्यजोसात्विकगुण । तीसात्विकीमजसीजाण । तवनाभींचतुरानन । प्रगटेलतोप्रजापती ॥५५॥

तोबहुतपतपेल । राजसी शक्तीपावेल । मगरक्तवर्णकरील । जगत्रयरचीलतो ॥५६॥

त्रिगुण आणीपंचभूतें । इंद्रियेंआणितद्दैवतें । मनाशीसहजगतें । रचीलतोविश्वकर्ता ॥५७॥

पालनकर्तातूं म्हणविशी । विधीचेभूमध्यभागेशी । क्रोधापासूनमहारोषी । प्रगटेलरुद्रतो ॥५८॥

तोहेंसर्वहरील । तामसीशक्तीलाधेल । हर्ताहरनामपावेल । घडमोडपुनःपुनः ॥५९॥

ऐकुनतीसपुसेहरी । मज अर्धश्लोकगगनांतरीं । तीकोण ऐकविणारी । पद्मालयेंसांग चोजा ॥६०॥

हांसोनीरमाबोलली । मजत्वांसगुणाचतर्किली । निर्गुणातीचसगुणाझाली । तीचवदलीतत्वहें ॥६१॥

जाणीवयाहूनपरतें । दुजेनाहींचनिगुतें । नविसंबावेंयातें । कदांकाळींमानसी ॥६२॥

पुढेंमधुकैठभवधिले । जपिताविधीनेंदेखिलें । तेणेंहरीशी पुसिलें । जपसीकायम्हणूनी ॥६३॥

तैंनारायणेंतयाशी । दिलेंअतिप्रेमेंशी । तेणेंदिलें नारदाशी । नारदेंमजदीधलें ॥६४॥

एवंवदोनीशुकाशी । भागवतातेउपदेशी । प्राप्त झालेंमजशी । तेचिवेळींऋषीनों ॥६५॥

व्यग्रपाहूनपुत्रास । पुनः संबोधीव्यास । बाळाकिमर्थचितोंत्रास । पावसीतूंदीनपणें ॥६६॥

ममवाक्यतुजनठसे । तरीजनका जाउनिपुसे । तेथेंतवसंदेहफांसे । अवश्यगळोनीपडतील ॥६७॥

देहींअसोनीविदेह । राजाअसोनिनिःसंदेह । सर्वकरोनिमुक्तमोह । देखकैसानांदतो ॥६८॥

ऐकताचिऐसिमात । शुकझालाअतिविस्मित । उठिलाजावयात्वरित । वंदनकेलेंपितयासीं ॥६९॥

व्यासम्हणेभाकदेऊन । मिथिलेंजाईमगयेथून । पुनःयेथेंयेईन । शपतमाझीकरावी ॥७०॥

देउनपितयारुकार । जायजैसामुक्तशर । मेरुपासूनविदेहनगर । वर्षत्रयेंपातला ॥७१॥

नगरद्वारीप्रवेश । करुंलागलायोगीश । प्रतीहाररोधीत्यास । ह्मणेआंतगमननकीजे ॥७२॥

ग्रामनांमकुळगोत्र । वेदशाखाआणिसूत्र । येण्याचेंकारणपवित्र । सांगोनी सुखेंआंतजाणे ॥७३॥

ऐकूनीतयाचेवचन । शुकतिष्टेधरोनिमौन । काष्ठ अथवापाषाण । तिष्टेतेवीमहाज्ञानी ॥७४॥

द्वारपाळपुसेतयासी । पिसाटकीमुकाअससी । येण्याचेंकारणनसांगसी । तिष्टसीवेड्यासारिखा ॥७५॥

शुकह्मणेजेंहोतेंकारण । तेंलाधलोंतुझेंबचन । विदेहनगरदर्शन । दुर्लभयेथेंप्रवेश ॥७६॥

मोहेंनादिलेंमजसा । दोषकायलोकांशी । उल्लंघोनिअतिसायाशी । तीनपर्वतपातलों ॥७७॥

बापेंचम जठकविलें । आशानसूनभ्रमविले । मोहेंलोटोनिपाडिलें । अंधकूपींअवचट ॥७८॥

ऐकतांच ऐशीवाणी । महाज्ञानीअसेकोणी । जाणूनीह्मणेवेत्रपाणी । गमनकीजेनगरांत ॥७९॥

अज्ञानेंमीरोधकेला । अपराधमोठाघडला । पाहिजेस्वामीक्षमाकेला । क्षमाबल साधूंचे ॥८०॥

शुकह्मणेअपराधनसे । वर्तलासीआज्ञेसरसे । राजाचाहीदोषनसे । परी क्षणेंचोरशत्रु ॥८१॥

माझाचीदोषसांप्रत । परगृहींउगेचजात । लघुतासहजयेत । परद्वारींतिष्ठता ॥८२॥

द्वारपाळह्मणेब्राह्मणा । मजवरीकरुनिकरुणा । करावेमम संदेहवारणा । प्रश्नोत्तरदेउनी ॥८३॥

सुखदुःखह्मणजेकैसें । करण्याकाययोग्य असें । शत्रुहितकरसरिसे । ओळखावेंकेवीतें ॥८४॥

शुकसांगेक्षत्त्याशी । द्विविधजाणेज नाशी । आसक्त आणिविरक्तासी । द्विविधजाणेसुखःदुख ॥८५॥

विरक्ताचेभेदतीन । अधमएकदुजाअज्ञान । जीवींझालेंपूर्णज्ञान । तोविरक्ततीसरा ॥८६॥

असक्ताचे दोनप्रकार । मूर्ख आणिदुजाचतुर । तेहीदोनचतुर । बुद्धीवानशास्त्रज्ञ ॥८७॥

युक्त आणि अयुक्त । दोनरुपेंबुद्धीपर्वत । ऐकूनीक्षत्ताप्रार्थीत । मज अर्थनातुडे ॥८८॥

मीतोकेवळ अज्ञान । मजसागींजेउघडून । जेणेंनिरसेमोहभान । जेणेंज्ञानठसावें ॥८९॥

शुकह्मणेसावधान । ऐकेप्रश्नाचेविवेचन । असक्तम्हणजेअज्ञान । आवडीज्याचीप्रपंचीं ॥९०॥

माझादेहमाझेंघर । माझीस्त्रीमाझासंसार । मीशाहणामीथोर । सोयरेसखे सर्वमाझे ॥९१॥

याअसक्तासीसंसारीं । धनपुत्रयशथोरी । हेंचिसुखपरोपरी । नसतां दुःखितबापुडा ॥९२॥

तेणेंस्वसुखासार्ठीं । कायकर्णेउठाउठी । उद्योग अनृतादिगोष्टी । जेणधनादीसंपादे ॥९३॥

कार्याशीजेआडयेती । शत्रूंतेचितयाप्रती । अनकुलेंवर्तती । मित्रतेचितयाचे ॥९४॥

तोजरीबुद्धिवान्‍ । तरीराखीकार्यानुसंधान्‍ । स्वचार्तुर्योमिळवी मान । धनादिकबहुवस ॥९५॥

शास्त्रजाणतांअसेजरी । रागीअसूनिसंसारीं । स्वर्गादिसुखप्राप्तकरी । मोहादिकेंनघाबरे ॥९६॥

तोचजरीआहेमूर्ख । इहपरकैचेंसुख । सदैवभोगींकष्टदुःख । नर्कदुर्गतीतोपावे ॥९७॥

आतांविरक्तजाण । संसारवाटेवमन । विषयादिसुखाभान । विटलातेथेंविरक्त ॥९८॥

संसारहचितयादुःख । आत्मज्ञानच ज्याचेंसुख । कार्यत्याचेंविचारएक । आत्मातोमीकोणाचा ॥९९॥

शत्रुत्याचेकामादिक । मित्रत्याचाविवेक । संतोषाचादायक । सदैवजाणविरक्त ॥१००॥

सुखदुःखशत्रुमित्र । कार्यादिकांचेवैचित्र । हेंमध्यम अज्ञानाचेतंत्र । ज्ञानविरक्तसदासुखी ॥१०१॥

सूतसांगेश्रोतेजना । ऐकूनीशुकाचेवचना । क्षत्तानमूनिचरणा । नगरांततयापोंचवी ॥१०२॥

नगरशोभादेखत । शुकमार्गानेंजात । जनसर्वरागयुत । पाहीलेतेव्हांशुकानें ॥१०३॥

पातलाराजद्वारीं । तेथेंहीक्षत्तानिवारी । उभाराहेद्वारा बाहेरी । ध्यानस्थयोगीविरक्त ॥१०४॥

मुहूर्तानंतरप्रधान । शुकानेतसेयेऊन । राजमाहलींबैसवून । व्यवस्थासर्वठेविली ॥१०५॥

स्नानसंध्यादिभोजन । नानाविलासशयन । सेवितीतेथेंनारीजन । सुंदरतरुणीतयासी ॥१०६॥

परीनचळेंतोमानसीं । मातृवद्वर्तै स्त्रियासी । स्वस्वकालींकर्मासी । प्रमादकदांकरीना ॥१०७॥

ऐकूनीपातलाराजा । शुकऋषीचीकरुनपूजा । परस्परकुशलवोजा प्रश्नादिकजाहले । चौसष्टश्लोकद्विशत । शुकाचेजन्मचरित । सादरजेश्रवणकरीत । पुत्रलाभज्ञानही ॥१०८॥

प्रथमस्कंदेषष्ठा ध्यायः ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP