प्रथम स्कंध - अध्याय पांचवा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
॥ श्री० ॥ जयजयाजीआदिमाये । विश्वजननीनिरामये । स्थितिलयकर्तीचिन्मये । नमस्कारतूंघेईजे ॥१॥
मधुकैटभारव्यान । सांगऋषीनींऐकून । पूर्वकथेचाप्रश्न । शुकोत्पतीसांगम्हणती ॥२॥
सूतम्हणेसावधान । ऐकाकथापुरातन । नारदमुखेंसर्व ऐकून । व्यासगेलेतपाशी ॥३॥
मेरुशिखरींबैसले । एकाग्रध्यानलाविलें । शिव शक्तीशीह्रदईंधरिलें । नारदोक्तमंत्रजपती ॥४॥
तपतेजतेव्हांफाकलें । अग्निवर्णकेश जहाले । पाहूनियामनभ्यालें । देवेंद्राचेतेसमईं ॥५॥
सखेद इंद्रातेपाहूनी । बोधीतया शूलपाणी । कांहोदुःखतुमचेमनीं । तपस्व्यातेपहाता ॥६॥
मजजाणोनिशक्तियुक्त । तपकरितीमाझेंभक्त । ऐश्वर्यादिकीतेविरक्त । विरुद्धनसतीतुम्हासी ॥७॥
इंद्रम्हणेदेव नाथ । व्यासाचेंतपकिमर्थ । रुद्रसांगेपुत्रार्थ । करितोकीशतवर्षें ॥८॥
सदयझालाउमाकांत । शक्तीसहप्रकटेतेथ । होऊनिबोलेव्यासाप्रत । पुरेतपबादरायणा ॥९॥
सर्व तेजोमयविशाळ । प्राप्तहोईलतुजलाबाळ । योगियाचाइंद्रकेवळ । वर्धकतूझेकीर्तीचा ॥१०॥
ऐकून ऐसेंवरदान । उमामहेशानमून । पावलावेगेंस्वस्थान । अंर्तधानहरझाला ॥११॥
एकेसमयींआश्रमांतरी । अरणीचेमंथनकरी । मनितेव्हांविचारी । पुत्रकेविहोईल ॥१२॥
हीअरणीअग्नीची । दुजीनसेमजपुत्राची । अग्नितुल्यसुताची । प्राप्तीकेवीसंभवे ॥१३॥
विवाहजरीकरावा । बळाचखोडापायद्यावा । नातरीमनाचाहेंवा । केवीलागेलतडासीं ॥१४॥
एवंघटनामानसीं । करीतांदेखेआकाशीं । तवघृताचीरुप राशी । रंभासमोरदेखिली ॥१५॥
कामशरेंमुनीताडिला । परिविवेकबळेंनाडिला । तरीमानसींअतिपीडिला । ह्मणेआताकायकरुं ॥१६॥
जरीइजलाभोगिले । तरीमान धनगेलें । ऋषीहांसतीलवहीले । बुद्धीगेलीवृद्धाची ॥१७॥
सहनकरुंउपहास । जरी असेंसुखविशेष । हीतोअप्सराकामभास । नोहेगार्हस्थ्य इचेनी ॥१८॥
जरीसुखवही विशेष । तरीतेंअसेथोडेदिवस । नारदमुखेंइतिहास । पुरुरव्याचाऐकिला ॥१९॥
ऐकतांच इतकीमात । शोनकसुताविचारीत । कोणराजाकैचीमात । तेंआश्चर्य ऐकवीत ॥२०॥
सूतेतेव्हांआरंभिली । कथापुरातनचांगली । सोमवंशाचीविस्तरिली । मूळपी ठिकासुंदर ॥२१॥
देवगुरुचीकामिनी । तारानामेंअतितरुणी । रुपेलावण्याचीखाणी प्रत्यक्षरतीचकेवळ ॥२२॥
तीएकदाचंद्रगृही । सहजगेलीदिव्यदेही । चंद्रेपाहतांलव लाही कामातुरजाहला ॥२३॥
चंद्रपाहुनीसुंदर । सुंदरीझालीकायातुर । रतझाले परस्पर । कामबाणेंव्यापिले ॥२४॥
तेथेंचराहिलीतारा । घरानजायगुरुदारा । क्रोधें बृहस्पतीसत्वरा । शिष्यप्रेषीचंदाकडे ॥२५॥
शिष्ययेतीपरतोन । परीभार्यानपाहें सदन । तेव्हांगुरुकोपोन । स्वयेंगेलासोमाकडे ॥२६॥
क्रोधेंह्मणेबृहस्पती । चंद्रा गेलीतुझीमती । रक्षिलीकीभोगिलीसती । कलंकलाविलाकुलासी ॥२७॥
अभक्ष्यभक्ष्य सुरापान । स्वर्णस्तेयगुरुदारागमन । हेमहापातकीचौघेजण । तत्संसर्गीपांचवा ॥२८॥
मीगुरुतूंयजमान । शिष्यपदवीपावून । अनर्थीकांघातलेंमन । स्त्रीमाझीमज देई ॥२९॥
नातरीतुजपाशीन । इत्यादिबोल ऐकून । चंद्रबोलेहांसोन । कोपब्राह्मणा नसावा ॥३०॥
येथेंजरीराहिलीकामिनी । यांतकायतुमचीहानि । राहिलीतीस्व इच्छेनी । कांहींदिवसायेईल ॥३१॥
बार्हस्पत्यतुम्हीरचिलें । त्यांतधर्मशास्त्रलिहिलें । स्त्रीसजार दोषवाहिले । होतनाहींह्मणोनी ॥३२॥
ऐकुन ऐसेंवचन । गुरुझालाअतिखिन्न । घरा गेलापरतोन । वाटपाहेस्त्रियेची ॥३३॥
मासपक्षजरीगेले । घरींनयेदाराआपले । दुःखेंमनपोळलें । पुन्हागेलाचंद्राकडे ॥३४॥
तवप्रतीहारेंरोधिला । तेणेंफारसंतापला । बाहेरुनचीओरडला । अधमादुष्टापापिष्टा ॥३५॥
गुरुदारेचाअपहार । करुनमोठा दुराचार । अवमानिसीमजसाचार शिक्षाकरीनतुजलागी ॥३६॥
ऐकूनसोमकोपला । उठूनमगबाहेर आला । निष्टूरवाक्येंगुरुसबोलला । नाहींभ्यालापातका ॥३७॥
अरेभटा तूंकुरुप । तारातीअतीसुरुप । तुजयोग्यनव्हेतेंरुप । दुजीकुरुपावरीकी ॥३८॥
तीकोमलांगीसुवेषा । ममयोग्यतेयोषा । गृहींजाईंभैक्ष्यपोषा । आशासोडयोषेची ॥३९॥
मज बोधिसीचतुरा । स्वयेंभोगिलीबंधुदारा । विरक्तझालीतेव्हातारा । तुजसीमंदाबृहस्पते ॥४०॥
तुजकरणेंतेंकरी । मीनदेतुझीनारी । शापरुपावैखरी । तुझीकदानबाधो ॥४१॥
ऐकूनीकठोरवाणी । गुरुगेलानिघोनी । अतिदुःखेंइंद्रसदनीं । रडतरडतपातला ॥४२॥
देखतांचिइंद्रेंगुरुशीं । पूजिलाअर्घ्यपाद्येशी । ह्मणेआजसायासी । पडलेकाहोंगुरुनाथा ॥४४॥
कोणेदुष्ठेंदुखावलें । ममगुरुशींदुर्बोले । सांगिजेस्वामीजेंझालें । आज्ञांकित हाशिष्य ॥४५॥
हीसर्वदेवसेना । मानितेगुरुआज्ञा । किमर्थकीजेदुःखप्राज्ञा । साह्य मजहरिहर ॥४६॥
गुरुमुखेंऐकिलेंवृत्त । आश्चर्यकरीशचीकांत । चंद्राकडेप्रेषिलादूत । चतुरसुजाणबोलका ॥४७॥
दूतेंचंद्रासीनमूनी । सन्मुख उभाराहुनी । बोधकरीइंदु लागुनी । मिष्टेगर्भितभाषणें ॥४८॥
पुरंदरेंप्रेषिलेंमज । निरोपत्याचाअसेगुज । परि सावेस्वामीसहज । सविचार उत्तरदेणें ॥४९॥
धर्मज्ञतूंनीतिजाणसी । अत्रिऋषीचापुत्र अससी । जुगुप्सितकेंविकरिसी । लोकपालत्वपाउनी ॥५०॥
तुज अठ्ठावीसकामिनी । दक्षकन्याअतिरमणी । आणीकहीदेवरमणी । बहुत असतीमेनकादिका ॥५१॥
तूंअमृताचनिधी । शीतकरकोणानबाधी । असेंअसतांहीउपाधी । केंविकरिसीशिवभूषणा ॥५२॥
गुरुदारेचाअपहार । होतोअन्यायथोर । रक्षणीयसर्वांधनदार । यथाशक्ति बुद्धीनें ॥५३॥
तदर्थ अवश्यकलह । परस्परातहोणेंदुःसह । टाकोनीचंद्रादुराग्रह । समर्पावीगुरुदारा ॥५४॥
धर्मरक्षक ऐसेंकरी । मगधर्मनांदेकोणेपरी । श्रेष्ठजनींदुराचारीं । मळवूंनयेमानस ॥५५॥
ऐकूनदूताचेंवचन । चंद्रकिंचित्कोपायमान । ह्मणेधर्म ज्ञतूंकाश्यपनंदन । उपाध्यायतुमचातैसाची ॥५६॥
परोपदेशींसर्वकुशल । स्वयें होतीसदांविकल । बार्हस्पत्यशास्त्रसकळ । प्रमाणचीअसेंकीं ॥५७॥
जरीस्त्रीझाली वश । तीसभोगितांकायदोष । सर्वस्वकीयबलिष्ठास । परकीयसर्वदुर्बला ॥५८॥
अनुरक्ताजीमजसी । केंवीत्यागावेंतिजसी । धर्मन्यायजाणतोसी । विचारुनपाहवें ॥५९॥
नसोडीनमीतारा । दूतासांगेदेवेश्वरा । समर्थ आहेसपुरंदरा । इच्छितकीजेआपुलें ॥६०॥
दूतमुखेंऐकतामात । कलहलागलादेवांत । मंत्रबळेंशुक्ररक्षीत । युद्धसमयींचंद्रासी ॥६१॥
शंकररक्षीगुरुशी । युद्धलागलेंबहुवशी । देवासह इंद्रचंद्राशी । झुंजतांलोटलींबहुवर्षें ॥६२॥
मगविरंचीनेंयेऊन । कलहकेलाशमन इंदूसरागेंभरुन । देवविलीगुरुपत्नी ॥६३॥
बृहस्पतीतुष्टला । स्त्रीसहीतघरींआला । कांहींदिवशींपुत्रझाला । जातक करीबृहस्पती ॥६४॥
माझापुत्रचंद्रह्मणे । पुन्हालागलीभांडणें । मगतारेसीपुसूनवि धीनें । पुत्रओपिलाचंद्रासी ॥६५॥
पुत्र आणिलाघरासी । चंद्रकरीउत्सवासी । बुधना मठेविलेंसरसी । ग्रहांतनेमिलाविधीनें ॥६६॥
पुरुखाबुधपुत्र । सोमवंश अतिपवित्र । सूतसांगेचरित्र । वंशोत्पत्तीपरिसावी ॥६७॥
वैवस्वतमनूचासुत । सुदयुम्ननांमेंवि ख्यात । सूयवंशींसत्यरत । महाराजाचक्रवर्ती ॥६८॥
तोराजाएकेसमईं । अश्वारुढ मृगयेजाईं । मेरुपर्वताचेंतळाईं । कुमारवनींप्रवेशला ॥६९॥
शिरलाजोंवनांत । तोंस्री झाला अकस्मात । सचीवसेवकासहीत । अश्वहीझालाअश्विनी ॥७०॥
वनहेंशिवें शापिलें । तेणेंगुणेंस्त्रीत्त्वपावलें । शापकारण ऐकावहिलें । सूतसांगेऋषीशी ॥७१॥
वनींक्रीडातीगौरीहर । एकांतपाहूनमनोहर । नग्नपार्वतीअंकावर । नग्नहराच्याक्रीड तसे ॥७२॥
तोंतेंचीअवसरीं । सनकादिमुनिचारीं । शिवदर्शनासत्वरी । जातहोते कलासा ॥७३॥
मार्गीक्रीडतांपाहिलें । ऋषीतेथोनीपरतले । वेगेंवस्त्रसांवरले । दूरगेली अपर्णा ॥७४॥
शिवम्हणेकांलाजसी । एकांतीरंमतांविलासी । सुखकारकवनासी । करितोंआतांप्राणप्रिये ॥७५॥
पुरुषजोमजवांचुनी । शिरेलजरियेवनीं । तत्काळचिकामिनी । होइलजाणनिश्चयें ॥७६॥
तेंवृत्तराजानेणे । सुंदरीझालातेणेंगुणें । अतिदुःखीलाजिर वाणें । केविजाउंगृहाआतां ॥७७॥
सखीसहतोचिंताक्रांत । फिरतसेवनोपवनात । कामबाणेंपीडिलाबहुत । तवबुधाचिभेटिझाली ॥७८॥
चंद्रपुत्र अतिसुंदर । तैसीच स्त्रीसकुमार । नेत्रमिळतांपरस्पर । कामवशझाली ॥७९॥
वनामाजीबुधेंभोगिली । इलानामतीपावली । बहुकाळरतझाली । कामिनीतीबुधासवे ॥८०॥
सुद्यम्नेंगुरुस्मरिला । तत्काळवसिष्ठपातला । स्त्रीत्वपाहूनवहिला । शिवतोषविलावसिष्टें ॥८१॥
वशिष्ठह्मणेशिवाशी । शंभोजरीप्रसन्नमजसी । पुरुषकीजेनृपासी । कष्टतारणाउमेशा ॥८२॥
शिवह्मणेंममवचन । सत्यतेंहीपाळीन । इच्छिततूझेंदेईन । भक्तिवश्य असेमी ॥८३॥
एकमासहोइलपुरुष । पुन्हाकामिनीएकमास । पुन्हाहोईलपुरुष । प्रतिमास येणेंपरी ॥८४॥
वरदेउनीउमारण । कैलासांगेलाआपण । वसिष्ठहीनृपाघेऊन । पदींआणोनीस्थापिला ॥८५॥
अंतर्गृहींएकमास । रावकरीतसेविलास । नृपासनी एकमास । बैसुनीराज्यचालवी ॥८६॥
बुधापासावझालासुत । पुरुरवानांमेविख्यात । तायाराज्यदेउनीत्वरित । वनासुद्युम्नपातला ॥८७॥
नारदापासूननवाक्षर । मंत्रपा वलाअतिसुंदर । जपकरीआनंदनिर्भर । प्रगटझालीजगदंबा ॥८८॥
पाहूनीराव आनंदला । साष्टांगचरणीलोळला । सदगदवाक्येंबोलिला परोपरीचीस्तुतिपद्यें ॥८९॥
देवीकृपायोगेंसहज । रावपावलासायुज्य । पुरुरवाकरीराज्य । यथान्यायस्वधर्मै ॥९०॥
नानायज्ञनानादानें । नानातीर्थेंनानासाधनें । प्रजातोषलीमानेधनें । कीर्तिध्वज उभारिला ॥९१॥
ब्रह्मशापेंउर्वशी । दुःखेंराहेभूमिशी । तिणेमगपुरुरव्याशी । वचनीगो उनीवश केला ॥९२॥
राहीनह्मणेंतुजपाशी । जरीप्रतिज्ञापाळिशी । ह्यामाझ्यादोनबस्ताशी । पुत्रापरीरक्षिजे ॥९३॥
एकसंभोगावांचून । नपाहेंतुजनग्न । दिसंशीलजईंतईक्षण । टाकूनजाईननिश्चयें ॥९४॥
केवळघृतचीआहार । करीनतुजसंगेविहार । मानूंनीनृपेंसत्वर । निजगृहींआणिली ॥९५॥
बहुवर्षेपर्यंत । रावझालाउर्वशींरत । क्षणएकन विसंबित । मोहावेशेंगुंडाळला ॥९६॥
धर्मकर्मसर्वराहिले । मनतेंउर्वशीमयझालें । इतक्यात इंद्रेंपाठविलें । न्यावयातिजगंधर्व ॥९७॥
राजाआणिउर्वशी । रममाण असतांनिशीं । नग्नदोघेकामावेशीं । तोंरचिलीतैंमाया ॥९८॥
मेघ उटावेंएकसरा । सोसाटेंसुटलावारा । चमचमाटविजांचाएकसारा । होयकडकडाटदारुण ॥९९॥
वृष्टिवर्षेंघोरदार । गगनीं अतिअंधार । गंधर्वेंयेउनीसत्वर । उर्णकघेउनीनिघाले ॥१००॥
शद्बकरितीबस्तदोनी । हायहायकरीकामिनी । ह्मणेममप्राणहानी । कोणीबस्तदुखाविलें ॥१०१॥
तुजनपूंस काचेहातीं । बस्तमाझेंकोणघाति । त्यांच्यानाशेंमाझीगती । तीचिआतांहोईल ॥१०२॥
ऐकूनघाबराराव । नग्नचतेणेंघेतलीधांव । टाकून उर्णकेगंधर्व । गुप्तझाले एकसरे ॥१०३॥
बस्ताघेउनीआलापरत । तवतीदामिनीझळकत । उर्वशीनग्नपाहत । भोगावांचूनि राजेंद्रा ॥१०४॥
सवेंचगेलीअप्सरा । रावपाहेंसैरावैरा । रडेआक्रोशेंएकसरा । भ्रांतचित्त भ्रमतसे ॥१०५॥
कुरुक्षेत्रीतीपाहिली । पाचारीतसेअतिविव्हळी । तेव्हांतीबोलली । राजामूर्खाआहेसतूं ॥१०६॥
स्त्रीकोणाचीसखी । वृकसंगेकोणसुखी । विश्वासूनव्हेती नखी । तेवीचोरदुःखद ॥१०७॥
नऊश्लोकदोनशत । पुरुरव्याचेचरित । अंबाबोलली चमत्कृत । माहाराष्ट्रभाषेनें ॥१०८॥ अध्याय ५ ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP