प्रथम स्कंध - अध्याय चवथा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


। श्रीगणेशायनमः । शौनकम्हणेसूता । ब्रह्मांडजलमय असता । मधुकैटभमहादैत्या । युद्धींमर्दिलेंहरिनें ॥१॥

ऐसेंमागेंबोलिलासी । शंकाउपजलीमानसी । एकार्णवीसमरसी । दैत्यकेवीप्रगटले ॥२॥

तेसांगिजेविस्तारुनी । तवमुखाब्जमधुपानीं । मधुपहेसर्वमुनी । तृप्तकरीगासुधन्या ॥३॥

ऐकूनिवदेरोमहर्षण । देवीकथामृतपावन । एकार्णवीशयन । केलेंजेव्हांनारायणे ॥४॥

त्याचेकर्णमलापासून मधुकैटभदानवदोन । सहजझालेउत्पन्न । जलांतरीभ्रमतीते ॥५॥

जलचिसंचलेंअवघे । भ्रमतीतेंथेतेचिदोघे । मार्गकोठेंहीननिघे । अंतपारकळेना ॥६॥

विकळझालेदोघेजण । म्हणतीहेंकाय आह्मींकोण । मायबाप गोत्रखूण । कांहींयेथेनेणवे ॥७॥

वारिसंचलेंअपार । याशीकायसाआधार । पात्रा विणेनिर्धार । जळकेवीसाठवे ॥८॥

धारणाशक्तिजीभासे । तीचमाय आमुचीअसे । कल्पनाकल्पिताऐसे । शब्द ऐकिलावाग्बीज ॥९॥

मंत्रराजहाचिकेवळ । उच्चारिती वेळोवेळ । सहस्रवर्षेंप्रबळ । तपदोहींआचरिलें ॥१०॥

मग ऐकतीवरंब्रूही । इच्छामृत्यु असोदेहीं । लाधलेतेव्हांलवलाही । अंबेपासूनिवरदान ॥११॥

असुरझालेमहाबळ । जळींकरितीकल्लोळ । तवपाहिलेंफुल्लकमळ । वरीपुरुषचतुर्मुख ॥१२॥

मधुम्हणे चतुरानना । योग्यनव्हेसीआसना । त्यजूनिजाअन्यस्थाना । अथवाझुंजबळानें ॥१३॥

ऐकताचिविधीभ्याला । निद्रितपाहताविष्णूला । स्तवनतेणेंआरंभिलें ॥१४॥

दीना नाथादयाळा भक्तरक्षकाकृपाळा । वामनामाधवागोपाळा । जागाहोईसत्वर ॥१५॥

सर्वज्ञतूंसर्वरक्षक । सर्वब्रह्मांडाचापाळक । नेणसीकेवीह्रदयस्था ॥१६॥

एवंविनवी परोपरी । जागानहोयमुरारी । ब्रह्मातेव्हांतर्ककरी पराधीनसत्यहा ॥१७॥

निद्रेनें झालावश । निजलास्वस्थरमेश सकलाईशाचाईश । योगमायातामसी ॥१८॥

इजलाच जावेंशरण । ईचेनीचहोयरक्षण । ऐसानिश्चयकरुन । एकाग्रचित्तेंस्तवितसे ॥१९॥

सर्ववेदाचीप्रमाणें । पाहतांतुजओळखणें । प्रत्यक्षदेखतादेखणें । जाणिलेंतूजयाकाळीं ॥२०॥

याजगाचेंमूळकारण । तूंचितूंपटलीखूण । विष्णूचेजेजाणीवपण । नेणिवसह ज उदेले ॥२१॥

सृष्टिकर्तामीच असे एवंमजसदाभासे । विष्णूमाझेकारण ऐसे । तर्कींत होतोंव्यर्थमी ॥२२॥

गतप्राणजेवीकुणप । तेवीपडलामाप । भ्रमविरालाआपोआप । सर्व कर्तातूंचितूं ॥२३॥

जननीतुझ्यामोहलीला । कोणजाणेऐसाठेला । मीमहामूर्खपहिला । हरीझालापरवश ॥२४॥

आताराहिले देवकोटी । कासयातेमनुष्यगोष्टी । चरित्रपाह ताहिंपुटी । उमारमाशारदा ॥२५॥

जीवमात्राचेमानसी । मायारुपेंतूंवससी । निर्गुणातूंचिसगुणाहोशी । कदाकोणानेणवे ॥२६॥

वेदांतीहुंबाघालिती । मायेशीतेजड ह्मणती । परीतेचिझालेजडमती । प्रमाणनलगेप्रत्यक्षा ॥२७॥

सर्वमायेचाईश । माधव हाजगदीश । तूंजरीजड अनीश । जडत्वकेवीईश्वरी ॥२८॥

निश्चयेतूंचीकर्त्री । तूंची जगाचीभर्त्रीं । तूंचीअंतीसंहर्त्री । गुणानिर्गुणातूंचितूं ॥२९॥

सगुणरुपेंस्वलीला । खेळहातुवांरचिला । जाणेकोणतवकृतीला । भलभलतेबरळती ॥३०॥

गारुडियेखेळ रचिला । पुंगीफुंकीतबोलेबोला । देखताचिसर्पकेला । वादीचातेणें ॥३१॥

सर्पटाकि फुस्कारा । प्रत्यक्षवाहेविषवारा । खोटाकिंवाखरा । कोणासीतोनेणवे ॥३२॥

एकटा गारोडीचजाणे । सहजतयाचेखेळणे । सर्पवादीदाखविणे । तेवीतवचरित्र ॥३३॥

तेवी गुणांचीमांडणी । करिशीपुनः जोडणी । सवेचिकरिशीमोडणी । एकलीचजाणसीतूं ॥३४॥

मुनीमानसीतुजध्याति । परीतेहीगुणचीकल्पिती । तेजोमयासंध्याह्मणती । तरीतीहीसगुण ॥३५॥

जीम्हणविशीनिर्गुणा । तीनगवसेकोणा । जरीकरिशील करुणा । तरीसर्वत्रलाभसी ॥३६॥

बुद्धीरुपेंअंतरींवससी । गुणागुणतूंसुचविशी । लक्ष्मी रुपेंसकळासी । सुखदायकतूंचितूं ॥३७॥

ज्ञानलक्ष्मीदेवांची । मदलक्ष्मीदैत्यांची । विषलक्ष्मीसर्पाची । द्रव्यलक्ष्मीमानवा ॥३८॥

संतोषलक्ष्मीविप्रांची । प्रतापलक्ष्मीरा ज्यांची । सांचलक्ष्मीवैश्यांची । शूद्रलक्ष्मीनम्रता ॥३९॥

वैराग्यलक्ष्मीसाधकांची । शांतीलक्ष्मीसिद्धांची । श्रद्धालक्ष्मीभक्तांची । आनंदलक्ष्मीसंतजना ॥४०॥

एवंनानारुपें विशद । लक्ष्मीतूंहरिशीखेद । तूंचिसाधूंचिसुखद । दुःखदतूंचिदुष्ठांची ॥४१॥

कोठें नांदसीकिर्तिरुपा । कोठेंतूंधारणारुपा । कोठेंसन्मतीअनूपा । कांतिरुपेशोभसी ॥४२॥

कासयातर्कबहूवस । किमर्थ आतासायास । तुझेस्वाधीनहरीस । पाहतातुजजोडिली ॥४३॥

वेद अथवावेत्ता । तुजनजाणेचीतत्वता । हीसर्वतुझीसत्ता । कृपेविणदुर्गम ॥४४॥

तुझाअपारमहिमा । हरिहरानकळेचिनिगमा । ममपुत्रानकळेसीमा । सर्वलोकींअनिर्वाच्य ॥४५॥

यज्ञामाजींपुरोडाश । देवानदेचीहुताश । जरीनसेनामनिर्देश । स्वाहाहेनामतुझें ॥४६॥

स्वधानामावाचून । पितरांहीनमिळेंअन्न । सर्वांघालिशी भोजन । मातातुचीजगाची ॥४७॥

पूर्वकल्पींरक्षिलेंमज । तेंचिस्मरलोंसहज । शरण आलोंतुज । भेणेंपळालोंदैत्याचे ॥४८॥

विवशकेलेनारायणा । नजाणेंतोममवेदना । दैत्यावधीवादेवराणा । सोडीपरमदयाळे ॥४९॥

थोरवीतुझीनजाणतां । सेवितीइतर देवता । जेवीटाकूअमृता । कांजीचाखितीआनंदे ॥५०॥

कायसांगुनवलपरी । अह र्निशजीपायचुरी । तीहीव्याप्तनिद्राभरी । नजागवीआजिपद्मा ॥५१॥

धन्यमांन्य तेचिजन । जेजाहुलेतुजशरण । चुकलेंत्यांचेंजन्ममरण ।  सुखीतेचीमीजाणें ॥५२॥

बुद्धीकांतिआणिकीर्ति । अनेकगुणजेशुभवृत्ति । एकहीयेथेंनदिसती । कोठेंलोपलेहरीचे ॥५३॥

बंदितठेविलात्वांहरी । विसरलाकलाकूसरी । तवप्रभावमानभारी । सामर्थ्य तेथेंनचालें ॥५४॥

जैंकेलीससृष्टिरचना । रचिलेतूंचीनारायणा । तुवांचीशक्तीची प्रेरणा । केलीहोतीससर्गादी ॥५५॥

आतांतुवाचीशक्तिकाढिली । सर्पावरीतनूपाडिली । निद्राउरीदडपिली । इच्छातुझीपरांबे ॥५६॥

निर्मुनिआतांचिमजला । जरी वाचविणेअसेतुला । सदयेहेमौनकशाला । धरिलेंसांगयेसमईं ॥५७॥

कालरुपहेराक्षस । उत्पादिलकासयास । कांआरंभिलाउपहास । विनापराधबाळाचा ॥५८॥

जाणिला तुझास्वभाव । रत्रजिशीविश्वस्वयमेव । स्वतंत्रखेळसीअभिनव । सहजपुनः संहारिशी ॥५९॥

तेविइच्छिशीजरीघात । तरीनवलकायसेयांत । परीमजविख्यात । कर्ताह्मणो नीकेलेकीं ॥६०॥

कर्ताजरीहेमारिती । याततुझीच अपकीर्ती । मृत्युचीमजनसेभीती । परीएकप्रार्थितों ॥६१॥

रुपघेउनीउत्कट । अंबेआतासत्वरऊठ । दैत्य अथवामाझाकंठ । निर्दाळुनिटाकिवेगें ॥६२॥

सहजतुझीबाललीला । करीवासोडीहरीला । साध्यसर्व असे तुजला । नवोसंडीयेसमईं ॥६३॥

सूतह्मणेब्रह्मस्तुती । ऐकतांझालीप्रेमवती । सोडूनी विष्णुदेहाप्रती । तिष्ठेबाजूसजगदंबा ॥६४॥

जागाझालानारायण । पाहुनवेधाझालाप्रसन्न । ऐकूनसूताचेंवचन । ऋषिकरितीप्रश्नासी ॥६५॥

ब्रह्माविष्णुआणिहर । हे सर्वामाजीथोर । त्यामध्येंही गदाधर । थोरह्मणोनी वेदबोले ॥६६॥

ऐसादेव रमेश । त्यासी केवीकेलाविवश । कोठेंहरपलेंयश । सत्ताविज्ञानहरीची ॥६७॥

तीकोण असे माया । जीचापारनपडेठाया कोठेंप्रगटलितीसदया । स्वभावकायतियेचा ॥६८॥

निवटीसंदेहथोर । सृष्टीमाजीकोणथोर । कर्ताएककिंवाफार । असतीतेसांगवा ॥६९॥

सूतम्हणेयाशंकेसी । तोडीलकोणसायासी । कुडेंपडलेंवेदाशी । आणीकबापुडेंकायतेथें ॥७०॥

वेदाचीचमतेअनेक । सूर्यविरंचीविष्णुपावक । हरदुर्गाआणिगणनायक । थोरसर्ववर्णिले ॥७१॥

सूर्यकालाचीमोजणी । सूर्यापासाव अन्नपाणी । त्रिगुणात्मकहा चितरणी । सर्वसाक्षीथोरहा ॥७२॥

गायत्रीसूर्यदैवत । सूर्यतेचिब्रम्हवदत । सूर्यमंडळीं जेजात । पुनर्जन्मनसेतया ॥७३॥

विरंचीहाआदिकर्ता । वेदाचाहीनिर्मायिता । गायत्री चाभर्ता दातासर्वजगाचा ॥७४॥

याहूननसेदुजाथोर । ऐसावेदांचाआधार । विष्णुव्या पकासाचार । जगद्वीजयोनिरुप ॥७५॥

अग्नीदेवाचेमुख । अग्निसर्वव्यापक । अग्नीपा साववेदसम्यक्‍ । नारायणतोजिअग्नी ॥७६॥

हरहाचमहेश्वर । व्यापिलेंयेणेंचराचर । कल्पांतीयेकक्षयकर । उर्वरीतपरमात्मा ॥७७॥

दुर्गाहीआदिमाता । ब्रह्मादिकाचीही माता । सृष्ठिस्थितिसंहारिता । इजवाचोनीअन्यनसे ॥७८॥

गणपतीगणाचानायक । ऋद्धिसिद्धिदायक । आधींपूज्यविनायक । सर्वांतश्रेष्ठदेवहा ॥७९॥

अग्नितोचीनारायण । सूर्य आपोनारायण । सर्वत्रसर्वनारायण । ऐसेवेदबोलती ॥८०॥

श्रुतीस्मृतीऋषिवचन । हेंचिसर्वत्राप्रमाण । वेदार्थतेचीपुराण । केवीप्रमाणपावावे ॥८१॥

कोणथोरकोणसान । हेतोसर्वहीअज्ञान । बिंबेबहुएकभान । चिन्मयएकभरलेंसे ॥८२॥

तारतंम्यपहाणेंजरी । स्वयेतर्कावेअंतरी । दृष्टांतकिंवाभाषांतरी । शिष्ठवाक्य ऐकावें ॥८३॥

सुष्टिरुपारा जसी । शक्तिविधीचीसाहसी । सात्विकीअसेविष्णुशी । तामसीनेंयुक्तशिव ॥८४॥

दाहकशक्तीवन्हीस । प्रकाशशक्तिसूर्यास । शोषिणीतीवायूस । धारणाशक्तिधरेची ॥८५॥

जरीयांतशक्तिनसे । अनुमानेंकेंविदिसे । अवश्यतेकार्यनासे । शक्तिआधीन स्पष्टची ॥८६॥

लोकभाषणीसहजदिसे । ह्मणे एकशक्तीनसे । आतांकार्यकरुंकैसें । जाहलोंमीअशक्त ॥८७॥

जरीदेहीशक्तीअसती । तरीकृत्येटाकिलीनसती । सर्वचिजि रालीमस्ती । शक्तीक्षीणहोताची ॥८८॥

अविष्णुमीजाहलों । महादेवरहितठाकलों । सूर्यनसतांवायागेलों । कोणीऐसेनह्मणती ॥८९॥

दृष्ठांतेकरुनीजाणा । शिवयाअक्ष राचीखुणा । कल्याणवाचकशद्बजाणा । सर्वशास्त्रीवर्णिलें ॥९०॥

तेचिशद्बाचेप्रथमाक्षर । शकारीमिळालाइकार । तीवेलांटिकरीतादूर । शिवहोतातोझालाशव ॥९१॥

कोठें अर्थकल्याण । केवढेंहेंअकल्याण । एकेकुंडलिनीवांचून । गेलेंव्यर्थसर्वही ॥९२॥

तीच कुंडलिनीशक्ती । तीचेनीचसर्वयुक्ति । भुक्तिआणिमुक्ति । शक्तिवांचूनीनातुडे ॥९३॥

सर्वत्रसर्वभरलें । शक्तिरुपचीकोंदलें । प्रत्यक्ष अनुभवाआलें । केलापाहिजेविचार ॥९४॥

सिंव्हावलोकनेंकरुन । मागीलकथेचेंअनुसंधान । जागाझालानारायण । जांभयादेत ऊठिला ॥९५॥

नेत्रमुख आणिनासिका । हस्तपादह्रदयरेखा । सोडूनगेलीह्रल्लेखा । योगनिद्राजेधवां ॥९६॥

नेत्रचोळूनिपुढेंपाहे । तवब्रह्माउभाआहे । तयाविष्णूपुसताहे । किमर्थयेथेंपातला ॥९७॥

ब्रह्माह्मणेंदेवाधिदेव । तवकर्णमलापासाव । प्रगटलेदोनदा नव । मारुंमजपातले ॥९८॥

भिऊनीआलोंतुह्माजवळी । बोलेतोचिदेत आरोळी । पातलेदोघेदैत्यबळी । झुंजह्मणतीचतुर्मुखा ॥९९॥

जरीभेणेंपळालास । हातजोडूनि ह्मणेदास । नातरीठाकेयुद्धास । देखतायाचेतुजमारु ॥१००॥

मगमारुसर्पशयना । ऐकताऐशीयावचना । हरीह्मणेकावल्गना । करितातुम्हीउन्मत्त ॥१॥

युद्ध इच्छापुरवीन । मदतुमचाजिरवीन । यमसदनाधाडीन । करायुद्धमजसवें ॥२॥

सूतसांगेऋषीश्वरा । दैत्येऐकुनीऐसीगिरा । मधूसरसावेपुढारा । मल्लयुद्ध आरंभलें ॥३॥

वरदर्पीतदानव । भिडेतयासीमाधव । दुर्धरसमर अभिनव । प्रवर्तलेतेसमईं ॥४॥

प्रेक्षकतेथेंदोघेजण । देवी आणिचतुरानन । थकतामधुकैटभान । युद्धकरावेंहरीशीं ॥५॥

एकथकताठाके एक । विरमतीते एकमेक । दोघांसीझुंझेहरीएक । विश्रामतयानमिळेची ॥६॥

पांचसहस्त्रवर्षें झालीं । करितांअशीरणधुमाळी । परीदोघेमहाबळी । थकलेनाहींकिचित्‍ ॥७॥

बल क्षीणझालाहरी । तेव्हांविचारीअंतरीं । नवलकाय आहेतरी । पराभवयांचानसेकां ॥८॥

माझेंकोठेंगेलेंबळ । असुरकेवींझालेसबळ । मुखम्लानपाहूनितेवेळ । मधुबोलेहरीशीं ॥९॥

थकलाशिजरीझुंजून । दासह्मणेहातजोडून । किंवाझगडेबळान । जरीसमर्थ आहेसी ॥१०॥

तूंसमर्थमहाबुद्धी । परितुजमारुनयुद्धीं । मगचतुर्मुखाचीअवधी । सरत आलीमरणवेळा ॥११॥

हरीह्मणेहोदानवा । मध्येंमजनसेंविसावा । युद्धींअन्याय नसावा । धर्मयुद्धकरावें ॥१२॥

जोथकलाकिंवाभ्याला । शस्त्रत्यागींआणिपडला । वीरनमारितीबाळाला । हाचिधर्मसनातन ॥१३॥

तरीश्रमलोंमीबहुत । तोंवरीअसावें तुह्मीस्वस्थ । करुनिमीविश्रांत । पुन्हाझुंजेनतुम्हासी ॥१४॥

ऐकतांऐशियाबोला । दानव गेलेदूरस्थला । तैंविष्णूध्यानस्थझाला । सर्वतेव्हांसमजलें ॥१५॥

म्हणेंश्रमव्यर्थगेले । इच्छामरणीदानवझाले । मृत्युशीकोणीवांछिलें । संकटदारुण असेंकीं ॥१६॥

भेद आणि सामदान । येथेंसर्ववृथाज्ञान । मगहोऊनीएकमन । स्तविताझालाभुवनेशी ॥१७॥

प्रसन्नहोऊनीईश्वरी । म्हणेविष्णोचिंतानकरी । ठकऊनदानवामारी । मोहितदोघाकरीन मी ॥१८॥

ऐकूनऐसेंवचन । उभाठाकेनारायण । तवआलेदोघेजण । युद्धपुन्हांचा लिलें ॥१९॥

युद्धकरितांतेव्हांवरी । दीनवदनेंपाहेवरी । करुणारसप्रेमझरी । हसली बहुतपरांबा ॥२०॥

राक्षसेंपाहतांउपरी । वामकटाक्षतयांमारी । मोहिलेदोघेपरोपरी । युद्धकरितीव्यग्रचितें ॥२१॥

पाहून असुरांमोहित । हरीतेव्हांकायवदत । धन्यधन्य तुम्हीदैत्य । धीरवीरंरणांगणीं ॥२२॥

वीरपाहिलेबहूत । परीश्रेष्ठतुम्हीसर्वांत । प्रसंन्नझालोंमीरमाकांत । पुरवीन इच्छिततुमचें ॥२३॥

मागामागावरदान । किमर्थहें युद्धदारुण । ऐकूनीऐसेभाषण । गर्वमोहेंहांसिले ॥२४॥

ह्मणतीचतुराभोगिशयना । मागम्हणसीवरदाना । याचकदेखिलेदोघेजण । दातेआम्हीनभिक्षुक ॥२५॥

तूंएकला यादोघांसी । बहुकाळभांडलासी । आम्हीहीप्रसंन्नतुजसी । मागइच्छितआपुलें ॥२६॥

ऐकतांचिबोलेहरी । जरीप्रसन्नमजवरी । इच्छितपुरवावेंसत्वरी । मरातुम्हीममहस्तें ॥२७॥

ऐकतांऐसेंवचन । चकितजालेदोघेजण । म्हणतीठकविलेयान । उपायकाय करावा ॥२८॥

सर्वपाहूनजलमय । सुचलात्यास उपाय । पूर्वदत्तदेईसमय । सत्यवाक्यहोम्हणती ॥२९॥

जलनसेलजेथें । आह्मादोघांवधीतेथें । जंघापसरुनरमानाथे । स्थलशुष्कदाखविलें ॥३०॥

देहदोघींवाढविलें । सहस्त्रयोजनेंविस्तारले । द्विगुणतेव्हां वाढविले । जंघास्थलहरीनें ॥३१॥

विस्मितझालेदोघेजण । करितीमस्तकेंअर्पण । देवे स्मरोनीसुदर्शन । तूर्णछेदिलींमस्तकें ॥३२॥

उभयतांचेमेदेंकरुनी । व्याप्तकेलेंसमुद्र पाणी । नामतेणेंझालेंमेदिनी । अभक्ष्यझालीयेणेंगुणे ॥३३॥

हेंआदिमायेचेचरित्र । सुरस अतीशयपवित्र । प्राशनकरोतमाझेंमित्र । अंबापदाब्जभृंगजे ॥३४॥

जयजयवर देभवानी । मुळप्रकृतीमाझेजननी । वदसीजिव्हाग्रीबसोनी । तुझेगुणतूंचिस्वये ॥३५॥

इतिश्रीदेविविजये प्रथमस्कंदेचतुर्थोध्यायः ॥४॥      

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP