प्रथम स्कंध - अध्याय सातवा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । जनकम्हणेऋषेश्वरा । धन्यकेलेंममपुरा । निस्पृहाशांताउदारा । किमर्थजाहलेंआगमन ॥१॥
कार्यजेंअसेलआपुलें साधावेंमीतेंचिवहिले । स्वयेंपाहिजे निवेदिलें । निःशंकतेंमजप्रती ॥२॥
शुकम्हणेमहाराज । पिताउपदेशितोमज । करीतूंगृहाश्रमसहज । सर्वश्रेष्ट आश्रमीं ॥३॥
बंधह्मणीनीमजभासे । तेणेंमीअव्हेरी तसे । बंधनाहींम्हटलेव्यासें । ऐकिलेंनाहींतत्रापि ॥४॥
संशयींपाहूनमज । पिताउप देशीगुज । संशयछेदीलविदेहराज । मिथिलेशमहाज्ञानी ॥५॥
ऐकुनीयेथेंपातलों । भवबंधेंभांबावलों । अनंन्यशरण आलों । तुजलागीराजेंद्रा ॥६॥
मोक्षेच्छामाझेंमानसी । करावेकायतत्प्राप्तीसी । तपतीर्थयज्ञव्रतासी । स्वाध्याय अथवाविवेक ॥७॥
जनक म्हणेऐककारण । मोक्षमार्गस्थजोब्राह्मण । तेणेंहोतांचिउपनयन । शरणगुरुसीरिघावे ॥८॥
सांगकरावेंवेदाध्ययन । ब्रह्मचर्याचेंपालन । मगगुरुदक्षणादेऊन । समावर्तन करावे ॥९॥
मगकरोनीविवाह । सुखेंरहावेभार्येसह । न्यायवृत्तीत्यक्तमोह । निरि च्छविषईंअसावें ॥१०॥
अंतरींकरावेंमनन । खोटाप्रपंचह्मणून । पातकासीदूरटाकून । शुद्धमार्गेवर्तावे ॥११॥
अग्निहोत्रादिकर्म । सांगसाधावास्वधर्म सत्यशांतीइंद्रियदम । हळूंहळूंसाधावा ॥१२॥
पुत्रपौत्रझालियावरी । आपणजावेंवनांतरीं । तोषबलेंसाही वैरी । निर्दाळुनटाकावे ॥१३॥
भार्याठेवूनपुत्राघरीं । अग्निकार्येसंप उनीसारी । उपजेदिव्यवैराग्यजरी । चतुर्थाश्रमघेईजे ॥१४॥
अधिकार एकविरक्तास । तणेंचकीजे संन्यास । अन्यथातोभलत्यास । उभयनाशकनिश्चयें ॥१५॥
वेद आज्ञाऐसींच आहे । शुकातूंविचारुनिपाहे । अठ्ठेचाळीससंस्कारदहे । चाळीसत्यांतगृहस्थांचे ॥१६॥
मुमुक्षूचेसंस्कार । शमादिअष्टप्रकार । पायरीनेंचिचढावेंवर । शिष्टशिक्षण ऐसेंची ॥१७॥
शुकम्हणेवैराग्यजरी । अनुभवेलह्रदयांतरी । तेणेंराहीजेअवश्यघरीं । वनींअथवाअवश्य ॥१८॥
जनकसांगेशुकासी । बलिष्ट इंद्रियेंनेणशी । भोगावांचूनिअहर्निशी । नाना विकार उदभव ॥१९॥
जोंवरीपरिपाकनाहीं । अतृप्त इंद्रियेंदेहीं । वैराग्यनाशितीसह जहीं । मुरडोनिमनापाडिती ॥२०॥
वैराग्यपाहूनमानस । बाळपणींचकेलासंन्यास । अविचारेंगेलावनास । तटस्थहोऊनीबैसला ॥२१॥
उष्णेंझालाकासावीस । क्षुधातृषा व्यापीत्यास । नेणूनदुःखानुभवास । डळमळेंमनतेंधवा ॥२२॥
वैराग्यज्ञानमागेंसरे । सुख इच्छापुढेंसरे । आहळेंजीवक्लेशभरें । सीतोष्णसहनकरवेना ॥२३॥
वासना जालदुर्जर । शांतनोहेकामपूर । उभयभ्रष्ठकरणार । अपक्ववैराग्यहेंलटिके ॥२४॥
इंद्रियेंमनवासना । उपाययोजिलायाचेशमना । गृहस्थाश्रमवेदानुशासना । उल्लंघन नकरावें ॥२५॥
जोझोंपघेईवरी । खालींपडेअवश्यतरी । मुळीचखालींनिजेजरी पतन भयनाहींच ॥२६॥
संन्यासकरुनीनिघाला । सुखदुःखेंमगत्रासला । उभयपंथनासला मार्गपुन्हानलाधे ॥२७॥
हळूंहळूंचालचालली । मुळापासुनीमुंगीचढली । वृक्षाग्रीती फळपावली । श्रमलीनाहीकिंचित ॥२८॥
फळांचारसचाखिता । सुखेंरमलीतत्वता । तेवींमार्गगृहापरता । सुलभ अन्यनसेची ॥२९॥
टाकूनियाविघ्नशंका । पक्षीउडाला चटका । बसतांशाखेशींडचका । पावलाश्रम उड्डाणें ॥३०॥
तेवींसंन्यासकठिण । मार्ग नपवेंगुण । मनदुर्जय इंद्रियगण । वशनोहेंसर्वथा ॥३१॥
घरींचबैसोनिशांती । कीजे मानसशुद्धमती । हानिलाभसमानचित्तीं । हर्षशोकटाकिजे ॥३२॥
कर्म आचरावेंवि हित । सदावर्तेंसंतोषात । आत्मानात्मविचारात । सुखीवसावेंगृहस्थें ॥३३॥
पहामी राज्यकरुनी । जीवन्मुक्तसदाध्यानीं । तैसातूंहीनिष्पापमुनी । कांननांदसीसुखानें ॥३४॥
जसेंजसेंमजवाटें । तसेंचवर्तेंमीनेटें । भोगभोगूनीचोखटे । मोकळाजेंवीतेंविहो ॥३५॥
जेंअदृश्यकेवळ । सच्चिदानंदनिर्मळ । दृश्यपदार्थेंत्यासीमळ । केविलागे सांगपा ॥३६॥
दृश्यहींतत्वेपांच । तीनगुणहीत्याचेंच । पांचभौतिकदेहसाच । तदुदभ व इंद्रियें ॥३७॥
याशींचसर्वसुखदुःख । मनझालपराड्मुख । लटिकेंचमानितदुःख । भांबावलेंभ्रमानें ॥३८॥
जरीझालमननिर्मळ । तरीगेलीतळमळ । संन्यासगार्हस्थ्य केवळ । सरिसेंजाणनिर्मळा ॥३९॥
सर्वतीर्थीस्नानकेलें । यज्ञतप आचरिलें । उपवासें अंगवाळलें । संन्यासकेलाशवटी ॥४०॥
करुनीइतकेप्रयास । निर्मळतानसेंमनास । व्यर्थझालेसायास । जन्ममरणचुकेना ॥४१॥
तेजरीनिर्मळजाहलें । नकरितांचिसर्व केलें । करितांहीतेणेंनकेलें । सदासुखींमोकळा ॥४२॥
मित्रशत्रुउदासीन । भेददाखवीस्वयेंमन । एक आत्मापरिपूर्ण । द्वैतकेवीसंभवे ॥४३॥
भेदनसेंब्रह्मजीवीं । भदतो बुद्धीजाणवी । तेचीअविद्याओळखावी । विद्यातेचिनिवृत्ती ॥४४॥
अविद्याजरीनसे । मगविद्याकेविभासे । उष्णावांचूनकैसे । सुखछायेचेंकळेल ॥४५॥
गुणगुणीप्रवर्तती । खेळमांडीलापंचभूतीं । स्वार्थीइंद्रियेंराबतीं । विरोधकाय आत्म्यास ॥४६॥
मर्यादावे देंगाईली सृष्टीक्रमानेंचालविली । आज्ञाजेणेंउल्लंघीली । धर्मंनष्टजाहला ॥४७॥
धर्मनाशेसृष्टिनाश । जरींह्रदब्जिंझालाप्रकाश । तरीमर्यादाउल्लंघनास । अधिकारनाहीं ॥४८॥
तरीवेदमार्गेंचिजावें । जाणीवमनीजाणावे । सुकर्मैलोकतोषवावे । कल्याण मार्गहाचिपै ॥४९॥
शुकह्मणेजीजनका । दूरनोहेंचिममशंका । मोक्षफलदकेविहोय ॥५०॥
प्रत्यक्षजोअनाचार । मद्यमांस अंगिकार । द्युतक्रीडादिसाचार । पुराणा दिकींवर्णिली ॥५१॥
रावशशबिंदूविख्यात । तेणेंकेलेयज्ञ अमीत । चर्माचाजाहलापर्वत विंध्यसमानदुसरा ॥५२॥
मेघोदकेंत्यांतूनवाहिली । तीएकमहानदीझाली । चर्मण्वती नामपावली । कीर्तिशेष अद्यापी ॥५३॥
हिंसाधर्मवेदसांगती । मजनवाटेतेथेंप्रीती । स्त्रीसंगेसुखपावती । नसतांदुःखजाहलें ॥५४॥
जनकम्हणेवेद आज्ञा । तोदोंषनसे प्राज्ञा । उपाधियोगेंयज्ञा । दोषनोहेकदापि ॥५५॥
काष्ठयोगेंधूरझाला । तरीकांअग्निमळला । तेविविरागीजनाला । यज्ञहिंसादिनबाधे ॥५६॥
शुकह्मणेवोनृपती । मायेमध्येंजेंराबती । निस्पृहतेकेविहोती । असंभवगोष्टीहे ॥५७॥
शास्त्रविचारपरोपरी । करितांनजायमोहभारी । सदावर्ततांसंसारीं । निस्पृहत्वकेवीलाधे ॥५८॥
द्रव्यसुखयश सत्ता । नित्यभोगिसीतत्वता । शत्रुमित्रासिसमता । असेकीतवराजेंद्रा ॥५९॥
दंडिशीशत्रुचोर । वंदिसीगुरुतपस्वीथोर । हेंमाझेंहेंपर । जाणशीवानजाणसी ॥६०॥
सुषुप्तिस्वप्नजागृतीं । नित्यतुजप्राप्त असती । तूरीयेचीसांगसीस्थिति । दंभकेवळमजभासे ॥६१॥
मिष्ठामिष्ठभक्षिसीअन्ना । कधींसुखींकधींविमना । माळाआणीसर्पभाना । जाणसीवानजाणसी ॥६२॥
मृत्तिकाआणिसुवर्ण । मानिसीकींएकवर्ण । ज्ञानीम्हण विसीआपण । विदेहनामदांभिक ॥६३॥
तुझेंवंशानामविदेह । अर्थताभासेसंदेह । सदाचिंतीसीदेहगेह । आपणाम्हणविशीअनुभवी ॥६४॥
तवपूर्वजन्मीं । तेणेंशापिलागुरुस्वामी । तोहीविदेहनामीं । ह्मणवीतहोताकीं ॥६५॥
ग्रहादिकींमाझे चित्त । कदारमेनाअशांत । मीतोसेवीनएकांत । मुक्तसंगपरिग्रह ॥६६॥
जनकह्मणे पितृसंग । टाकूनीहोसीनिःसंग । वनपशूचाहोईलसंग । निःसंशयतुजलागी ॥६७॥
पंचभूतेंसर्वत्र । व्याप्तभरलींएकत्र । निसंगत्व अणूमात्र । नलाधेतुजब्रह्मांडीं ॥६८॥
जैशीमजराजचिंता । वनींतुज आहारचिंता । दंड अजिनचिंता । तुजलागीनसोडी ॥६९॥
विकल्पेतुजग्रासिलें । आत्मज्ञाननासिलें । वृथाचिभयभरलें । बद्धबद्धह्मणोनि ॥७०॥
तेणेगुणेंतुदुःखी । निर्विकल्पेंमीसुखी । मीमाझेंह्मणतादुःखि । टाकितांसुख अखंड ॥७१॥
संदेहबळेंभ्रमलासी दूरदेशींआलासी । तोनसेमाझेंमानसी । सुखींसर्वदासर्वत्र ॥७२॥
संदेहटाकुनिदुरी । सदामुक्तमीसंसारी । निश्चयेंजाणुनिमानसांतरी । सुखभोगीएकांत ॥७३॥
आश्रमादीदेहस्थिती । घडोसुखेंदेहाप्रती । आत्मारामतूंएकांति । निराळेपणेंओळखे ॥७४॥
मींबद्ध ऐसीशंका । टाकोनिदेईबाळाशुका । देहधर्मसाधूनिअ नेटका । सुखदेईंव्यासाशी ॥७५॥
सूतम्हणेऐकूनिवचन । निःशंकझालेंशुकाचेंमन । राजचर्यापाहून आश्चययुक्तजाहला ॥७६॥
निरोपघेऊननिघाला । येऊनीपित्यासि भेटला । व्यासेंतेव्हांआलिंगिला । प्रसन्नमुखपाहिलें ॥७७॥
कुशलसर्वव्यासेंपुशिलें । शुकसर्वनिवेदिलें । ह्मणेमननिःशंकझालें । गुरुजनकप्रसादें ॥७८॥
मगशुकलग्नकरी । स्त्रीलाधलापीवरी । सुखेंतोगार्हस्थ्यकरी । पुत्रचारजाहले ॥७९॥
कृष्णनामेंपहिला सुत । गौरप्रभदुजाह्मणवत । तिजाभूरिचौथादेवश्रुत । कीर्तिमतीकन्यापांचवी ॥८०॥
बिभ्राजराजाचासूत । अणुहासीकेलाजामात । दौहित्रतोब्रह्मदत्त । अतिज्ञानीजाहला ॥८१॥
पुत्राराज्यदेउनी । ब्रह्मदत्तगेलावनीं । उपदेशनारदापासूनी । मायाबीजलाधला ॥८२॥
ज्ञान झालेंउत्तम । पावलातोदेवीधाम । शुकविवाहपरम । कूर्मपुराणींवर्णिला ॥८३॥
शुकेंपुत्रठेवुनिघरीं । स्वयेगेलाकैलासशिंखरी । ध्यानस्थहो उनीअंतरी । उड्डाण केलेंआकाशीं ॥८४॥
परमसिद्धशुकयोगी । भासेरविसानभोभागीं । गिरिश्रृंगभिंन अंगीं । उड्डाणेकरुनीजाहले ॥८५॥
पुत्रशोकेव्यास आहळे । शुकाशुकाऐसेबोले । विरही पाहूनीउत्तरदिलें । प्रतिध्वनीशुकानें ॥८६॥
तेव्हांपासुनीप्रतिध्वनी । पर्वतीहोय आझुनी । शिवेंमगसमजाउनी । व्यासासीवरदीधला ॥८७॥
छायारुपेशुकपाहसी । टाकीशोकजाआश्रमासी । पुत्रगेलामुक्तीसी । शोकयोग्यनव्हेतो ॥८८॥
व्यासयेऊ निआश्रमाप्रती । सर्वशिष्यानिरोपदेती । स्मरलामगमातेप्रती । दाशपुत्रीमीनगंधा ॥८९॥
जेथेंतिजसोडिलें । तत्काळतेथेंपातलें । दाशराजाविचारिलें । कळलवृत्तसर्वतेव्हां ॥९०॥
शंतनूचीजीअंगना । माताव्यासाचीदाशकन्या । मगसेऊनीसूर्यकन्या । व्यासराहिले तेथेंची ॥९१॥
शंतनूचेपुत्रदोन । भ्रातव्यासेंमानून । स्वस्थराहे एकांतसेऊन । सर स्वतीतीरटाकिलें ॥९२॥
देवीभागवतपरमपावन । स्कंदप्रथमझालापूर्ण । अध्येज्यांत अंगुलमान । अक्राशेंचौर्यांशीश्लोकते ॥९३॥
पंच्यांणवश्लोकएकशत । जनकशुक संवादचरित । सूतसांगेऋषीप्रत । तेंचयेथेंवर्णिलें ॥९४॥
इतिश्रीमद्देवाभागवत्सार संग्रहे श्रीदेवीविजयेप्रथमस्कंदेसप्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीत्रिगुणांबिकाप्रीतयेभवतु । प्रथमस्कंवसमाप्तः ॥
प्रथम स्कंध समाप्त
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP