पंचम स्कंध - अध्याय दुसरा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । जातांचिदैत्यदूत । देवापाचारीशक्रत्वरित । पावकयमसोमवात । कुबेरादिसर्व आले ॥१॥
मघवासांगेमहिषवृत्त । म्हणेरभपुत्रमदोन्मत्त । पदटाकींम्हणेत्वरित । यथेष्टजायनिघोनी ॥२॥
अथवायावेंशरण । दयाळूतोकरीलपालन । एवंदूतवदोन । गेलानिःशंकतयाचा ॥३॥
ब्रम्हवरेंरेडामाजला । उपायपाहिजेयोजिला । दानसंधीनीचाला । करणेंअसेंनिरर्थक ॥४॥
बलाबलओळखून । शाहणेकरितींरण । भेदेंनाकळेमूर्खजन । हातोप्रत्यक्षटोणगा ॥५॥
सर्वांहीविचारकरुन । राज्यकरावेंरक्षण । यावदुपायचालेपूर्ण । भक्तिव्यमुख्य असे ॥६॥
परीतेपूर्वींनेणवे । पदहीसहसानसोडवे । शरणपशूसकेवींजावें । लोकमान्यहोऊनी ॥७॥
व्यासह्मणेनृपती । एवंवदोनीशचीपती । सर्वांचीघेऊनसंमती । गुप्तदूतप्रेषिला ॥८॥
सैन्यपाहूनीयादूत । कळवीयेऊनीत्वरित । शक्रेंऐकूनिमात । विस्मितझालामानसी ॥९॥
मगसर्वांसंहएकांती । सवेंघेऊनवाचस्पती । मंत्रकरीशचीपती । प्रार्थीगुरुसीतेंधवा ॥१०॥
म्हणेजीगुरुराया । संकटसमईंबुद्धीद्याया । योग्य आम्हांसीविप्रवर्या । जेंवीशुक्रदैत्याते ॥११॥
युद्धायेतसेमहिषासुर । मंत्रबळेंरक्षीसुर । केवीकरावाविचार । सांग आम्हांयेसमई ॥१२॥
गुरुबोलेपुरंदरा । स्वस्थहोयघरीधीरा । उद्योगकीजेदेववीरा । दैवाधीनसुखदुःख ॥१३॥
प्राप्तहोतांसंकट । उपाययकीजेबळकट । जाणुनीदैवबलिष्ट । निरुद्यमनव्हावें ॥१४॥
अंधपंगुखुळापिसा । निरुद्योगफिरेजैसा । शाहणाकदानव्हेंतैसा । झटोनिकार्यकरीतसे ॥१५॥
निरिच्छजेमुनिजन । जाणतीसर्वदैवाधीन । परीस्वमुक्त्यर्थसाधन । निरालस्येंकरिताती ॥१६॥
उद्योगकरितांनसेंसफल । दैवतेव्हांजाणप्रबळ । दोषनसेहोतांनिर्फळ । दैवाधीनम्हणोनी ॥१७॥
सुखदुःखदैवाधीन । समठेवावेंसदामन । श्लोककीजेसदापठण । विवेकहोयसहजची ॥१८॥
श्लोक । दुःखेदुखाधिकान्पश्ये सुखेपश्येसुखाधिकान् । आत्मानहर्षशोकभ्यांशत्रुभ्यामिवनार्पयेत् ॥१॥
अर्थ - दुःखहोतांआपणासी । पहावेतेव्हांबहुदुःखितासी । सुखहोतांअपणासी । सुखाधिकादेखिजे ॥१९॥
हर्षशोकत्रूचेंहातीं । कदानद्यावेंजीवाप्रती । धैर्यधरुनियाचित्तीं । स्वस्थसर्वदाराहावें ॥२०॥
आपणामिळालेंशिळेंअन्न । दुजयापडिलेंलंघन । सुखीआहेतयाहून । जाणोनिस्वस्थ असावें ॥२१॥
आपणाबैसायाहत्ती । मिळतांदेखिजेनृपती । तयासरसीममसंपत्ती । नाहींजाणूनीनहर्षांवे ॥२२॥
हर्षशोकहोतांदूर । ह्रदयीउपजेज्ञानांकुर । निर्गुणमीजाणोनीअंतर । सुखामाजीडोलवावें ॥२३॥
मनबुद्धिअहंकार । भूजलतेजसमीर । आकाशेंद्रियपरिवार । सहाविकारप्राणाचे ॥२४॥
एवंहेचोवीस । याहूनमीभिन्ननिर्विशेष । कारणहेंचिसुखदुःखास । मीतोप्रथकसदासुखी ॥२५॥
प्राणमन आणिशरीर । तिघांचेदोनदोनविकार । क्षुधातुषाशोकसाचार । मूर्छाआणिजरामृत्यु ॥२६॥
मीनिराळाओळखून । स्वस्थकीजेइंद्रामन । हेंमुख्यसुखसाधन । मोहाहंकारटाकिजे ॥२७॥
प्रपंचसुखपापमूल । दुःखतेचिपुण्यमूल । सुखतेंहोतांनिर्मूल । हर्षमानावापंडितीं ॥२८॥
बुद्धिवानतूंपुरंदरा । करुनियापूर्णविचारा । संदेहरुपकार्यसारा । दैवगतीनेणवे ॥२९॥
रण अथवादान । नसांगेमीतुजलागुन । करणेंतेपरिणामलक्षून । धीरधरुनीकरावें ॥३०॥
व्यासम्हणेभारता । ऐकूनवाक्येवृत्रजेता । जाऊनीसत्यलोकींतत्वता । शरणगेलाविधीशी ॥३१॥
सर्वांसहचतुरानन । शिवासहवैकुंठीजाऊन । विष्णुसीवृत्तकळवून । विचारकरितीसर्वही ॥३२॥
सर्वहीसज्जहोऊन । निघालेयुद्धालागून । हंसारुढचतुरानन । गरुडारुढनिघेहरी ॥३३॥
वृषारुढझालाशंकर । सेनापतिशिवकुमर । बैसोनियामोरावर । स्कंदनिघेमहाबळी ॥३४॥
शस्त्रास्त्रेंकरुनीधारण । पातलेकरावयारण । तोंवरीसैन्यघेऊन । महिषासुरपातला ॥३५॥
युद्धमाजलेंअपार । बाणखड्गमुसलतोमर । गदापरशुपट्टिशमुदगर । शूलचक्रहलशक्ति ॥३६॥
वर्षतातींअनेकशस्त्रें । एकमेकामारितीअस्त्रें । गजारुढेयेउनीचिक्षुरे । इंद्रामारीपांचबाण ॥३७॥
इंद्रेतेशरतोडुनी । अर्धचंद्रीएकाबाणी । मूर्छितपाडिलाधरणी । प्रधानशूरमहिषाचा ॥३८॥
महिषेंप्रेषिलाबिडालासुर । गजारुढ इंद्रासमोर । येउनीतेणेंपन्नासशर । इंद्रावरीप्रेरिले ॥३९॥
बाणतोडूनपुरंदर । वज्रेताडिलाकरीवर । स्वसैन्यीतोभयातूर । गजपळेबिडालाचा ॥४०॥
बिडालरथीबैसून । इंद्रासवेकरीरण । इंद्रेंजाणूनिदैत्यकठिण । जयंतासीपुढेंकेला ॥४१॥
पांचबाणेजयंत । पाडीबिडालामूर्छित । सारंथीतयामागेंनेत । ताम्रासुरपातला ॥४२॥
वरुणतयाशीयुद्धकरी । ताम्रवर्षेशरधारी । यमेंताडिलादंडेपरी । नचळेतोमहावीर ॥४३॥
अतिलाघवीताम्रासुर । बाणेझाकिलेसर्वसुर । देवीतोडूनीबाणनिकर । मूर्छितकेलाताम्राते ॥४४॥
दैत्यकरितीहाहःकार । जयशद्बेंगर्जतीसुर । कोपूनीधांवेमहिषासूर । गजारुढहोऊनी ॥४५॥
गदाघायेपुरंदर । ताडिलातेणेसत्वर । वज्रघायेंगदाचूर । करुनीधावेदैत्यावरी ॥४६॥
खड्गघेउनीमहिषधावे । दोघेक्रोधेझुंजतीसवे । अतिघोरचित्रबरवे । विस्मयकारकदोघेही ॥४७॥
तवदैत्येंमायारचिली । कोटिशाझालेमहिषबली । तैंसेनासर्वमर्दिली । इंद्रादिसर्वघाबरले ॥४८॥
तयाचामारनोहेसहन । हरिहारांचेंकरितीस्मरण । पातलेतवतीघेजण । सृष्ठिस्थित्यंतकारकते ॥४९॥
मायापाहूननारायण । सवेंसोडिलेंसुदर्शन । मायाविरालीतत्क्षण । तमजेवीसुर्योदयीं ॥५०॥
पाहूनितिघामहिषासुर । परिघहस्तधावेसत्वर । प्रधानेंतयाचात्रिक्षुर । उग्रास्यदुजाउग्रवीर्य ॥५१॥
असिलोमांत्रिनेत्रबाष्कल । अंधकताम्रबिडाल । युद्धकरितीतुमुल । अंधकधावेविष्णुवरी ॥५२॥
धारदिधलीपाषाणी । विषाचेंपाजिलेंपाणी । ऐशातिखटमहाबाणीं । ताडिलाशौरीअंधक ॥५३॥
बाणतोडीमुरारी । स्वयेंपांचबाणमारी । एवंअंधक आणिहरि । तुमुलकरितीसंग्राम ॥५४॥
इंद्राबाष्कलमहिषशंकर । त्रिनेत्र आणिसूर्यकुमर । महाहनूतैसाकुबेर । वरुण आणिअसिलोमा ॥५५॥
परस्परहेझूंजती । अंधकविष्णुबहुभांडती । पंनासदिवसदिनराती । नविरमतीएकक्षण ॥५६॥
अंधकेंगरुडताडिला । गदाघायेंबहुपीडिला । शौरीआश्वासीतयाला । दक्षिणकरेंस्पर्शोनी ॥५७॥
कोपेतेव्हांनारायण । दैत्यामारिसुदर्शन । अंधकेंस्वचक्रेकरुन । निवारिलेअनिवारतें ॥५८॥
असुरगर्जेदारुण । चक्रनिर्फलपाहून । शोककरितीदेवगण । विपरीतम्हणतीकाळहा ॥५९॥
हरीतेव्हांगदाझोकून । अंधकपाडिलामूर्छाधीन । त्तवधाविन्नलाकोपून । महिषासुरविष्णूवरी ॥६०॥
गदातयासामारिली । महिषासुरामूर्छाआली । सावधहोऊनीमहाबळी । परिघेमूर्छितकरीकृष्णा ॥६१॥
गरुडेंघेऊनीश्रीहरी । नेलारणापासूनीदुरी । दवबुडालेशोकसागरीं । महिषावरीरुद्रधावें ॥६२॥
शूलमारिलाशंकरें । चुकवूनीतोदैत्येश्वरें । शंकरासिअतित्वरें । शक्तिमारीगर्जोनी ॥६३॥
पुन्हामूर्छासांवरुन । युद्धाआलारमारमण । महिषेंतयादेखोन । महापर्वतझुगारिला ॥६४॥
पर्वततिलशःफोडून । महिषामारीसुदर्शन । पडेदैत्यमुर्छायेऊनी । सावधहोऊनीपुन्हाउठे ॥६५॥
मनुष्यरुपकरुन । दैत्यकरीसिंहगर्जन । हरीवाजवीपांचजन्य । त्रासलेअसुरतेधवा ॥६६॥
महिषेंसिंहहोऊन । कंठकेशातेफुलऊन । अतिशयेतेणेंगर्जोन । गरुडानखेंविदारिला ॥६७॥
नखेंविष्णूसीमारिली । महिषरुपेमहाबळी । श्रृंगेटोंचिलातेणेंहरी । विव्हलकेलातयानें ॥६८॥
भयभीतनारायण । केलेंतेणेंपलायन । पावलात्वरेनिजभुवन । अवध्यजाणोनीपळेरुद्र ॥६९॥
ब्रह्मागेलास्वलोकीं । धैर्यधरुनीसुरनायकीं । युद्धकेलेंबहुनेटकी । शतवर्षेंपर्यंत ॥७०॥
शेवटींदेवथकले । शौर्यवीर्यव्यर्थगेलें । इंद्रादिदेवपळाले । स्थानेंटाकुनीआपुली ॥७१॥
असुरांचाजयजाहला । महिष इंद्रपदींबैसला । यक्षकिंनरादिकींस्तविला । स्वर्गोपभोगभोगीतसे ॥७२॥
सूर्यचंद्रवायूवरुण । सर्वांचीहिरोनीस्थान । तेथेंतेथेंदैत्यनेमून । करीकार्येस्वतेजें ॥७३॥
हविर्भागदेतींब्राम्हण । स्वयेसेवीआपण । देवभोगितीदुःखदारुण । पीडाकरीनित्यतो ॥७४॥
एवंबहुकाळतेअमर । दुःखितकरितीसंचार । विनवूनिमगब्रम्हाशंकर । देव आलेवैकुंठा ॥७५॥
तेथीचाजोविचार । पुढिलेंअध्यायींसविस्तर । ऐकिजेश्रोतीसावध । रसभरितपुढेंपुढें ॥७६॥
बावीसश्लोकदोनशत । महिषासुराजयहोत । देवपळालेसमस्त । कथावर्णिलीसुरसही ॥७७॥
देवीविजयेपंचमेद्वितीयः ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP