पंचम स्कंध - अध्याय पहिला
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । श्रीसरस्वत्यैनमः । श्रीमहाकालीमहालक्षुमीमहासरस्वती त्रिगुणरुपिण्यैनमः । भजनसारकलींत । भजनहेंचिमहाव्रत । भजनेंनासेंदुरित । भजनेंवांछितहोतसे ॥१॥
भजनेंनासेरिपुवर्ग । भजनेंसुलभस्वर्ग । भजनेंलाधेअपवर्ग । जीवन्मुक्तभजनेंची ॥२॥
भजनाचेंभेदतीन । विहिताविहितहेदोन । तिसरेंकेवळप्रेमपूर्ण । उत्तमसर्वांतहेंचीअसे ॥३॥
शास्त्रयुक्तेंविहित । दांभिकतेंअविहित । निरिच्छभजनएकांत । सुखकारककर्त्याशी ॥४॥
भजनम्हणजेसेवन । विहितकरीजोब्राम्हण । निष्कामसकामदोन । विहितभजनाचेभेदपै ॥५॥
स्वधर्माचेपालन । ऐसेंनाहादुजेंभजन । विंप्रजोवेदाज्ञाटाकुन । भजनमिषेंटाळकुटी ॥६॥
उभेंरेखिलेंगोपीचंदन । माथारुमालबांधून । तुलसीमाळाघालुन । मुद्राठोकीमुखीउरी ॥७॥
हातींविणाआणिचिपळी । खांदालोंबेभगवीझोळी । भीकमागेआळोआळीं । कांसेकसिलीकौपीन ॥८॥
वरीवेष्टिलीशुद्धछाटी । कंबरकसिलीअतिनेटी । कुबडीदिलीखाकोटी । चाळपाईंबांधिल ॥९॥
ब्रह्मचारीनागृहस्थ । नयतीनावानप्रस्थ । निराळेंचहेंपांचवेंप्रस्थ । वेदबाह्यकलिप्रिय ॥१०॥
नाहींस्नानसमंत्रक । नाममंत्रम्हणेसम्यक् । तेथेंहीनसेंऐक्य । वत्तिचांचल्यसर्वदा ॥११॥
सध्यादिकर्मेंटाकिलीं । भजनवृत्तीस्वीकारिली । विषईंसदामतीरंगली । नाचेडोलेउगाची ॥१२॥
किंचित्बिथरलाताल । बुवाघाबरेतात्काळ । तानेंमाजीगुतलेंमन । कैंचाविठ्ठलठसावे ॥१३॥
नाचोनिबांधिलारंग । प्रेमखेंगाय अभंग । गिरक्यामारीउडवीअंग । दंगकरीस्त्रीपुरुषा ॥१४॥
ऐसाझालामहासंत । स्वयेंबुडेलोकाबुडवीत । दांभिकभजनविख्यात । यायुगींमाजलेंसे ॥१५॥
नव्हेंहेंब्राह्मणकर्म । विप्रेंपाळिजेस्वधर्म । भजनतेंचिथोरपरम । पावनकरीब्राह्मणा ॥१६॥
स्वधर्मटाकुनीझालेसंत । संतनव्हेंतेचिजंत । विषयाविष्ठासेवित । नर्कवासनिश्चयें ॥१७॥
वेदीजेंसांगितलें । तेंजेणेंअंगिकारिलें । स्वर्गादिसर्वजिंकिंलें । निश्चयेतेणेंयालोकीं ॥१८॥
विप्राजेंचेंअविहित । शूद्रादिकासितेंविहित । तैआचरितांविप्रविहित । नर्कतयांहोतसे ॥१९॥
निष्कामझालेंमन । पावलेंह्रदईंसमाधान । विहिताविहितभान । नुरेंमगतयांसी ॥२०॥
भजनत्याचे एकांत । टाळविणातोन इछित । दंभाचारझालागलित । पायवंढूतयाचें ॥२१॥
असोएवंत्रिविधभजन । मुख्यांतसमाधान । तेंचिप्राप्तीचेंकारण । देवीचरित्रपाहूंया ॥२२॥
चारस्कंदभागवत । बोलिलीअंबाप्राकृत । कृष्णचरित्रनृपाप्रत । व्यासबोलिलासंक्षेपें ॥२३॥
व्यासालागीह्मणेनृपती । ऋषीसूताप्रश्नकरिती । कृष्णासाक्षातूश्रीपती । सर्वज्ञ आणिसर्वेश्वर ॥२४॥
पुत्रनेलाराक्षसीं । केवींनकळलेंत्याशीं । किमर्थ आराधीशिवाशीं । तयाहूनन्यूनकीं ॥२५॥
व्यासह्मणेनृपती । सत्येश्वरतोयदुपती । मनुष्यभावकृती । जडावेंतेणेंअज्ञान ॥२६॥
जेवीरामासीवनवास । नकळेंमृगराक्षस । जानकीचेतस्करास । नजाणेजेवीरघुवीर ॥२७॥
सीताअसोनीमहासती । दिव्यकरवीमागुती । रजकेनिंदितावनांती । नेणत्यापरीत्यागीतो ॥२८॥
नकळलेआपलेसुत । वाल्मीकतेव्हांबोधीत । विप्रवेषेंकाळयेत । तोहीनकळेरामचंद्रा ॥२९॥
तैसाकृष्णापुत्रहरण । नकळतांनवलकोण । अहंकारबळेंजाण । दाटेंज्ञानसर्वांसी ॥३०॥
मीसर्वांमाजीथोर । माझाचिहासंसार । एवंव्यापिलाअहंकार । ज्ञानगेलेंदडपोनी ॥३१॥
ब्रम्हाविष्णूमहेश । अहंकारेंझालेंईश । अवतारादिगर्भक्लेश । तेणेंगुणेंपुनःपुनः ॥३२॥
विष्णूकरीशिवाराधन । तेंतोंयथायोग्यजाण । तारतम्येंपाहतांखूण । शिवविशिष्टजाणावे ॥३३॥
मुख्यप्रणवप्रमाण । अकारतोचतुरानन । उकारतोशेषशयन । शिवजाणामकारतो ॥३४॥
अर्धमात्राआदिजननी । सांनिध्येंथोरशूलपाणी । ब्रम्ह्याहुनीश्रेष्ठासनी । विष्णुम्हणतीसर्वशास्त्रें ॥३५॥
महारुद्राचाअंशभूत । प्रकटेविधीचेभ्रूत । तोहिपुज्यसर्वांत । नवलकायशिवपूजितां ॥३६॥
सर्वश्रेष्ठाआदिजननी । मूलप्रकृतीजगन्मोहिनी । पारनपावतीदेवतीनी । सर्वदामायध्याईजे ॥३७॥
व्यासमुखेंमधुरवाणीं । म्हणेचरित्रगोडवाखाणी । मुनिवर्याजननीचें ॥३८॥
सूतम्हणेशौनकादिका । देवीचरित्रसुरस ऐका । जेंवदलानृपनायका । गुरुमाझासप्रेम ॥३९॥
रंभकरंभदोघेजन । दनुपुत्रदैत्यदारुण । पुत्रार्थबहुवर्षगण । तपकरितीपंचनदी ॥४०॥
करंभबैसलाजलांतरी । रंभपंचाग्निसाधनकरी । करंभासीशक्रमारी । नक्ररुपेंकरुनिया ॥४१॥
ऐकुनीबंधूचेंमरण । रंभकोपलादारुण । स्वशिरच्छेदाकारण । केशखड्गस्वीकारी ॥४२॥
पाहूनतियाचेंसाहस । प्रत्यक्ष अग्नीबोलेत्यास । म्हणेमागेइच्छितवरास । व्यर्थप्राणकांदेशी ॥४३॥
रंभमागेबलिष्टपुत्र । होईलम्हणेवायुमित्र । जेंइच्छिशीलकलत्र । पुत्रलाभसीतेथेंची ॥४४॥
रंभगेलायक्षस्थानी । म्हैसदेखिलीपुष्ठतरुणी । भाव उपजलामैथुनी । दैवयोगेंतयाच्या ॥४५॥
महिषीसहरमेवनी । तयादुजारेडापाहोनी । रंभावरीआलाधावूनी । अभिलाषेंमैथुनाच्या ॥४६॥
ठोणग्यानीरंभवधिला । महिषीपाठीधाविनला । यक्षींतोरेडावधिला । महिषीरक्षणाकारणें ॥४७॥
रंभदेहाचासंस्कार । यक्षकरितीविधीप्रकार । महिषीसतीनिर्धार । पतीसवेंजाहली ॥४८॥
महिषीशिरलीआग्नींत । उत्पन्नझालामहिषसुत । रंभासुरहीप्रगटत । रक्तबीजनामेंपुन्हा ॥४९॥
तोदैत्यहयारी । मेरुपृष्ठींतपकरी । अयुतवर्षेंनिर्धारि । ब्रम्हाझालाप्रसन्न ॥५०॥
पुरुषमात्रापासून । नसोह्मणेमलामरण । स्त्रीऐसीबलिष्टकोण । जीमजमारुंशके ॥५१॥
वाक्यत्याचेऐकूनी । तथास्तूऐसेम्हणोनी । ब्रम्हागेलास्वसदनी । महिषेंतपसंपविलें ॥५२॥
एवंलाधलावर । राजकरीनिर्वैर । पृथ्वीजिंकुनसमग्र । दूतधाडीइंद्राकडे ॥५३॥
दूतम्हणेपुरंदरा । पदसोडीअहिल्याजारा । निघूनजायसत्वरा । अथवायुद्धकरावें ॥५४॥
अथवाव्हावेंशरण । ममप्रभुकरीलरक्षण । एवंऐकितांचिवचन । कोपेंखवळेंशतक्रतू ॥५५॥
म्हणेमाजलासीबहुतृणादा । कालयोगेंवदसीवादा । शृंगेंतुझीदुर्मदा । छेदूनकरीनचापमी ॥५६॥
असेंजरीबलगर्व । येताचिहरीनतुझासर्व । जायदूतासांगसर्व । अवध्यदूत आम्हांसी ॥५७॥
दूतवाक्येंमहिषासुर । सैन्यकेलेंसिद्धसमग्र । म्हणे एकलाचिजिंकीनसुर । शोभार्थनेतोंतुम्हांसी ॥५८॥
चिक्षुरनामेंप्रधान । सेनातयाचेआधीन । तांम्रदिदैत्यदारुण । सिद्धझालेयुद्धासी ॥५९॥
इकडेइंद्रेंकायकेलें । पुढिलेअध्याईंवर्णिलें । देविचरित्रसुरसबोले । ममनिमित्तकरुनिया ॥६०॥
सत्तावनश्लोक एकशत । महिषाख्यान आरंभित । व्यासनृपातेवर्णित । सूतसांगेशौनकादिका ॥६१॥
देवीविजयेपंचमे प्रथमः ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP