पंचम स्कंध - अध्याय तिसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । परमरंम्यविष्णुभुवन । सर्वसंपत्तीचेनिधान । महालक्ष्मीचेवासस्थान । शोभाआपारनवर्णवे ॥१॥

वनेंउपवनेंउद्यानें । सरोवरेंसरोजशोभनें । शुद्धनिर्मल उदकानें । रंम्यशीतळतुडुंबली ॥२॥

सर्ववृक्षसर्वलता । नवपल्लवपुष्पेंफलिता । सर्वदानिवासवसंता । वैकुंठीचलाभेकी ॥३॥

नानापक्ष्यांचेथवें । अनेकरंगदेखावें । मंजुलसुस्वरत्यांचीरवे । कुजीतवनेंजाहली ॥४॥

नानाजातीकमलावरी । गुंजल्याषटपदांच्याहारी । रम्यसरोवराचेंतीरीं । सारसजोडेशोभले ॥५॥

जलामाजीमत्स्यतळपती । पडेतयावरीसूर्यकांती । शुद्धरजतापरीझळकती । मोहकरितींप्रेक्षका ॥६॥

चाललेमार्गेंसर्वसुर । तोदेखिलेंमुख्यनगर । नवरत्नाचेप्राकार । गगनचुंबितीस्वमुखें ॥७॥

एकखणापासूननवखणी । समानगृहांचीबांधणी । जाळयाखिडक्यानक्षीठेवणी । अलोलिकभासतसे ॥८॥

विस्तीर्णमार्गसुंदर । जागोजागींजलनिर्झर । दीपपंक्तीमनोहर । चंद्रबिंबेंचिउभारली ॥९॥

मोठमोठेबाजार । अनेकवस्तुअपार । मोठाबहुव्यापार । पेठमोठीवैकुंठ ॥१०॥

जयविजयमहाद्वारी । देववाक्येविजयसत्वरी । प्रवेशूनीगृहांतरी । वंदूनीकळवीदेव आले ॥११॥

ऐकतांचीस्वयेआपण । बाहेर आलानारायण । सर्वदेवकरितीनमन । हरीहरदोघेभेटती ॥१२॥

महालांतसर्वांनेले । योग्यासनीबैसविले । कुशलपुसुन वृत्तपुसिल । आगमनाचेंकारण ॥१३॥

देवम्हणतीसर्वजाणसी । तीन्हीकर्मेस्वयेंकरिसी । आम्हांकांउपेक्षिसी । महिषासुरेंगांजिले ॥१४॥

बसावयानाहींस्थळ । भोजनासिनाहींकवळ । यज्ञभागतोचिसकळ । पृथक्‍ पृथक्‍ भक्षितो ॥१५॥

तुजसरिसाअसोनिनाथ । फिरतोंआम्हींअनाथ । योजींदेवातयाचाघात । दुष्ठदमनम्हणविसी ॥१६॥

अनेकमारिलेत्वांअसुर । रक्षिलेंबहुवेळांसुर । येवेळींकिमर्थ उशीर । करिसीकांगाजनादना ॥१७॥

हरीबोलेसस्मित । महिषब्रम्हवरेंगर्वित । स्त्रियेकरवीतयाचाघास । रचिलापूर्वींविधीनें ॥१८॥

पूर्वींआम्हींकेलासमर । जयपावलादुष्ठ असुर । स्त्रीकोण ऐसीधुरंधर । जीतयांमारुशके ॥१९॥

गौरीअथवाममकामिनी । सरस्वतीवाइंद्रपत्नी । जरीसर्वदेवतेजानी । प्रगटेस्त्रीमारीलती ॥२०॥

सर्वदेव आणिस्त्रियांमिळून । तेजांशातेप्रार्थून । करावीस्त्रीउत्पंन । निःसंशयेंवधीलती ॥२१॥

वदतांचिंऐसेंहरी । नवलवर्तलेंतेंअवसरी । रक्तवर्णतेजभारी । विधिमुखांतूनिनिघालें ॥२२॥

पद्मरागसमसुंदर । तेजनिघेपर्वताकार । उष्णसीतकिरणाकार । चहुबाजूंशोभलें ॥२३॥

नवलकरितीहरिहर । तवतेतेजदैत्यभयंकर । शूभ्रवर्णपर्वताकार । शिवमुखांतूनिप्रगटलें ॥२४॥

विष्णुमुखातुनिनीलवर्ण । इंद्रापासावचित्रवर्ण । यमादिसर्वदेवांतून । प्रचंडतेज उदेलें ॥२५॥

तेंसमस्तएकवटलें । हिमाद्रीपरीभासलें । ज्वालामयव्योमझालें । महाश्चर्यजनकतें ॥२६॥

तयातेजाचीएकनारि । प्रगटझालीतेअवसरी । गौरमुखाबिंबाधारी । कृष्णनेत्रासुरुपा ॥२७॥

शिवतेजेंझालवदन । यमतेजेकेशकृष्ण । अग्नितेजेंनेत्रतीन । भ्रुकुटीजीच्यासंधितेजें ॥२८॥

वायुतेजेंदोनीश्रवण । नासिकातीकुबेरतेजान । अधरजीचातेजारुण । प्राजापत्येंदतझालें ॥२९॥

उत्तरोष्ठस्कंदतेजे । वैष्णवेअष्टादशभुजे । बोटेसर्ववुसुतेजे । चंद्रेदिव्यस्तनयुग्म ॥३०॥

ऐद्रेंकटिभागउदर । जंघावरुणतेजाकार । पृथ्वीतेजेंनितंबभार । तेजोमयमूर्तीही ॥३१॥

सर्वांगेंअतिसुंदरी । देवीपाहिलीतीनारी । विष्णुमतेत्याअवसरी । संन्मानिलीवस्रांदिकी ॥३२॥

निर्मललालबहुसुंदर । दोनवस्त्रेक्षीरसागर । तैसाचिएकरत्नहार । समर्पित आनंदें ॥३३॥

चूडामणीदिव्यकुंडलें । कंकणकेयूरादिनिर्मले । विश्वकर्म्यानेंअर्पिलें । परमसंतोषेंकरुनी ॥३४॥

सुस्वरपायीनूपुर । त्वष्ठाअर्पींमनोहर । कंठकरालंकार । लवणांषुधीसमर्पीं ॥३५॥

सुंगधिकमलांचीमाळा । नूतनराहेसवकाळा । तसीचवैजंयतीगळां । वरुणसमर्पीभक्तीनें ॥३६॥

हिमाचलप्रेमभरी । कनकच्छवीमहाकेसरी । अर्पींरत्नेंनानापरी । सिंहारुढाझालीती ॥३७॥

कृष्णेंस्वचक्रांतून । दिव्यकाढिलेंसुदर्शन । समर्पिलेंतिजलागुन । आयुधश्रेष्ठस्वीकारी ॥३८॥

शूलापासावशूल । काढूनिअर्पिरुद्रनिर्मल । तेवीशंखशक्तितेजाळ । वरुणपावकसमर्पिंती ॥३९॥

धनुष्यज्यादिव्यबाण । समर्पिंतसेसमीरण । घंटावज्रमहादारुण । पुरंदरसमर्पी ॥४०॥

कालदंड अर्पियम । पाशीअर्पिपाशपरम । काल अर्पिखड्गचर्म । विधीअर्पीकमंडलू ॥४१॥

तीक्ष्णधारकुठार । अर्पितियेशीसुंदर । विश्वकर्माअतिचतुर । स्वयेत्याणेंनिर्मिला ॥४२॥

मधुकरितांप्राशन । रीतेनहोयपरिपूर्ण । ऐसेंपात्रस्वर्णवर्ण । धनद अर्पिभक्तिनें ॥४३॥

प्रचेताअर्पीकमल । गदाघंटाअतिसोज्वल । त्वष्ठाअर्पीकराल । विविधशस्त्रेअस्त्रेंपैं ॥४४॥

तियेच्यारोमरोमांतरी । सूर्यरश्मीअर्पणकरी । एवंविथीनेंतीनारीं । प्रगटलीआदिमाया ॥४५॥

स्वरुपेंकोटीसूर्यकांती । वस्त्रेंभूषणशोभतीं । आयुधेंधरिलीहाती । सिंहासनींदयासिंधू ॥४६॥

सर्वदेवींकेलेंनमन । मृदुरवेंकरितीस्तवन । भक्तिसदभावेंकरुन । शरणचरणींजाहलें ॥४७॥

शिवेकल्याणीशांती । पुष्टीदेवीमगवती । कालरात्रीरुद्रशक्ती । इंद्राणीतुजनमन असो ॥४८॥

सिद्धीबुद्धीवैष्णवी । तूंचिवृद्धीआणिपृथ्वी । पृथ्वीमाजीअसूनपृथ्वी । नेणेंतुज अंबिके ॥४९॥

अंतःकर्णाचेआंत । राहसीपरीनेणोभ्रांत । मायानेणेंअंतस्थित । अससीपरीतियेच्या ॥५०॥

आंतबैसोनीप्रेरिसी । तूंअजाचिम्हणविशि । ऐशीतूंतवपादासी । वंदुआदरेंसर्वदा ॥५१॥

कल्याण आमुचेंकरी । मातेशत्रुपासूनतारी । वधीआतांहयारी । महामायीकमोहुनिया ॥५२॥

नृपासांगेबादरायण । देववाक्य ऐसेंऐकुन । स्वयेबोललीअभयवचन । मारितेंत्यासीस्वस्थव्हा ॥५३॥

एवंदेवाआश्वासुनी । हांसेसुस्वरजगनन्मोहिनी । देवसंकटीपाहूनी । आश्चर्यवाटेतियेसी ॥५४॥

अट्टहासेंकेलेंगर्जन । धराझालीकंपायमान । सागरक्षोभलागहन । पर्वतसर्वथरारले ॥५५॥

दानवझालेभयचकित । जयपाहीदेवम्हणत । महिषकोपलागर्वित । म्हणेशब्दकोणेत्राहटिला ॥५६॥

महिषम्हणेदानवासी । कोणकरितोगर्जनेशी । पहाजाऊनवेगेशी । धरुन आणासत्वर ॥५७॥

भयमाझेंटाकून । गर्वेंपहागर्जेकोण । स्वहस्तेंमीघेईनप्राण । शब्दकर्त्यादुष्टाचा ॥५८॥

देवसर्वपराजित । शब्द ऐसानकरित । दानवममवशसमस्त । नोरडतीतेकदापि ॥५९॥

कोणमूर्खगर्जला । तयामृत्युसमीप आला । राक्षसनिघालेतेवेळा । वंदुनीआज्ञामस्तकी ॥६०॥

येऊनीतैपाहिली । सर्वांगतीरुपशाली । अष्टादशभुजीशोभली । आयुधेंदिव्यजियेच्या ॥६१॥

नगनगभूषणेंल्याइली । सिंहावरीबैसली । चषकलाऊनमुखकमळी । मधुपानकरीतसे ॥६२॥

पाहुनिजाहलेचकित । महिषाजाऊनीसांगत । कामिनीएकगर्जत । अंतराळीसिंहासनीं ॥६३॥

नामानुषींदेवांगना । नायक्षीनासुरीजाणा । अठराभुजींआयुधेंनाना । हर्षेंदेवस्तविताती ॥६४॥

जयशब्द उच्चारिती । त्राहीशब्देंप्रार्थिती । शत्रूंवधीऐसेंम्हणती । किमर्थपातलीतेनकळे ॥६५॥

विवाहिताकिंवाकुमरी । नलक्षवेंतेजभारी । अदभुतरौद्राहासश्रृंगारी । चारीरसतियेमाजी ॥६६॥

आलोंआम्हींनबोलतां । भयवाटेंतीसपहातां । केवीपुढेंविचार आतां । करणेंतोस्वामीकिजे ॥६७॥

महिषाचेमनमोहिले । प्रधानासिआज्ञापिले । त्वरितजाऊनीवहिले । शोधकरीतियेचा ॥६८॥

तीकोणकोठुनिआली । इच्छाकायजाणूनिसकळी । सामदानभेदबळी । वशकरुन आणिजे ॥६९॥

पट्टराणीमीकरीन । कार्यसाधीकौशल्यान । आहेसतूंबुद्धिमान । नलगेविशेषसांगणें ॥७०॥

नृपासांगेबादरायण । निघालाआज्ञावंदून । देवीसमीपयेऊन । विनयनम्रगोडबोले ॥७१॥

हेदेवीमधुरस्वरे । कोणाचीकोणरुपसुंदरे । आगमनकिमर्थकेलेंचतुरें । कुशलपुसेप्रभुमाझा ॥७२॥

त्रैलोक्याचाईश्वर । कामरुपीमहिषास्रुर । सर्वजिंकिलेजेणेंसुर । यज्ञभागभोक्ताजो ॥७३॥

ब्रम्हवरेंअतिबलिष्ट । पुरुषाहातींमृत्युउत्कट । नसेत्याचासर्वश्रेष्ठ । गर्विष्ट असेनाथमाझा ॥७४॥

परीतवरुप ऐंकून । इछितोतुझेंदर्शन । जेविआज्ञापिशीवचन । तेविमांन्य आम्हाशीं ॥७५॥

गमनकीजेतेथवरी । अथवाम्हणसीलजरी । येथेंचयेईलहयारी । मनुष्यरुपेंकरुनिया ॥७६॥

ऐकूनीहांसेभवानी । बोलेमेघगंभीरवाणा । मंत्रिश्रेष्टादेवजननी । महालक्ष्मीजाणमज ॥७७॥

महिषाचेवधाकरितां । देवोंमजसीप्रार्थितां । प्रगटझालेंतत्वता । एकलीचयेसमई ॥७८॥

बोलिलासमृदुवचन । तेणेंझालेंप्रसन्न । नातरीतुजसमान । असुरदग्धबहुकेले ॥७९॥

जाऊनीतयाबोधकीजे । स्वर्गपृथ्वीटाकिजे । शीघ्रपाताळींजाइजे । प्राण इच्छाअसेजरी ॥८०॥

असेलबलगर्वजरी । त्वरेयेईरणांतरी । पोंचवीनवेगेंयमपुरी । सपरिवारदुष्ठात्मन ॥८१॥

मंत्रीम्हणेरुपगर्विते । कायबोलसीएवंभलते । तूंआणिमहिषबलाते । पुष्पमर्दनगजाजेवी ॥८२॥

ममवाक्येंसुंदरी । महिषास्रुरासीप्रेमेंवरी । सुखभोगसीअपारी । नमितोंतुजचरणीमीं ॥८३॥

रसभंगभयेकरुन । प्रार्थितोंतुजलागुन । नातरीतुजवधून । सहजजाऊंशक्यमी ॥८४॥

परिवश्यतुजनृपती । तेणेंयेतोकाकुळती । उत्तरदेतभगवती । पशुचासचीवपशूचतूं ॥८५॥

तववाक्येकरुन । कळलेंमूढातुझेंज्ञान । जीस असतीपुच्छविषाण । टोणग्याशीतीवश्य ॥८६॥

स्त्रीहातींइच्छिलेंमरण । नपूंसकाचेलक्षण । वीराहातीइच्छिमरण । शूरवीरतोम्हणवे ॥८७॥

युद्धींजिंकिलेहरिहर । पराक्रमीरेडाथोर । विधिवचन अव्हेर । करितीकेवींहरविष्णु ॥८८॥

विधिवाक्यसत्यकराया । स्त्रीरुपेंआलेंयाठाया । वेगेवदेतवस्वामिया । दूतकार्यसंपादी ॥८९॥

एवंवाक्य ऐकून । रसभंग अयोग्यजाणून । परतगेलाप्रधान । सविस्तरकळविले ॥९०॥

महिषेंवृत्त ऐकून । वृद्धमंत्रीमिळऊन । विचारमगकरुन । ताम्रासुरप्रेषिला ॥९१॥

तोसन्मुखयेऊन । महीषस्त्रीहोम्हणून । बोलेतीवाणीऐकून । क्रोधेंगर्जलीजगन्माता ॥९२॥

नादेंतेणेंगर्भस्रवती । ताम्रपळालागृहाप्रति । विचारकरुनमागुती । बाष्कलदुर्मुखनिघाले ॥९३॥

बेचाळीसतीनशत । श्लोक असेभागवत । प्रगटजहालीअंबायेथें । अंबनेंचवर्णिलें ॥९४॥

देवीविजयेपंचमेतृतीयः ॥३॥    

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP