पंचम स्कंध - अध्याय अकरावा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । जन्मेजयम्हणेव्यासाशी । हींतीनचरित्रेंकोणाशी । कोणकेव्हांउपदेशी । सिद्धकेवीमजसांगा ॥१॥
व्यासम्हणेऐकनरपती । स्वारोचिषीसुरथनृपती । अत्युत्कृष्टचक्रवर्ती । चैत्रवंशीजाहला ॥२॥
पर्वतवासीम्लेंच्छकोल । शत्रूझालेतयाप्रबळ । सैन्यकरुनिदुर्बळ । परीजिंकितीदैवयोगें ॥३॥
रावझालापराजित । दुष्टपाहिलेअमात्य । मृगयामिषेंवनांजात । एकटाचीअश्वासह ॥४॥
योजनेतीनदूरगेला । तोरम्य आश्रमपाहिला । व्याघ्र आणिधेनुला । वैरनसेमुळीच ॥५॥
मग अश्वबाहेरबांधुनी । स्वयेंगेलाअंतःसदनीं । नमिलासाष्टांगेंमहामुनी । सुमधानामतयाचे ॥६॥
ऋषीनींतयासन्मानुनी । वृत्तसकळ ऐकुनी । ऐसम्हणतीसुखानी । वन्यवृत्तीनिर्भय ॥७॥
येथेंहिंसानकरावी । मुनीवृत्तीआचरावी । आज्ञावंदूनीमनोभावी । राहिलातेथेंनृपवर ॥८॥
एकदिनीतोनृपाळ । चिंतेनेंअसेव्याकूळ । राज्यकोश आणिकुळ । आठवेंसर्वघडोघडी ॥९॥
आश्रमाचेबाहेर । एकलाचफिरेचिंतातुर । तवपाहिलासमोर । दुःखितएकवैश्याते ॥१०॥
नृपपुसतयाप्रती । तोम्हणेमीवैश्यजाती । समाधीनाममजप्रती । बहुधनिकमीआहे ॥११॥
स्त्रीपुत्रेंमजकाढिले । धनलोभेंनिर्दयझाले । परीमजमोहेंग्रासिले । चिंतितोंमीतयासी ॥१२॥
समदुःखीतेपरस्पर । येतीमगमुनीसमोर । कांनहोयमोहदूर । सविनयप्रार्थिती ॥१३॥
मुनीनृपासीसांगती । महामायामूळप्रकृती । मोहकरीविश्वाप्रती । स्थितिकारिणीपरांबा ॥१४॥
सगुण आणिनिर्गुण । दोनरुपेंतीचीचजाण । मोहिलेविष्णूद्रुहिण । पाडकाय इतरांचा ॥१५॥
तीचजरीकृपाकरी । मोहजायनिर्धारी । ब्रम्हरुपाआनंदलहरी । चरित्र ऐकतिचेनृपा ॥१६॥
ब्रम्हविद्याज्ञानथोरी । प्राप्त्यर्थएकदांमुरारी । अयुताब्देंतपकरी । गिरिकंदरींबैसला ॥१७॥
तैसाचितपेचतुरानन । स्थळांतरकरावेंम्हणून । निघालेसहजदोघेंजण । परस्परभेटले ॥१८॥
चतुर्भुज आणिचतुर्मुख । विचारितीएकमेक । तूंकोणतूंकोणनामक । जगत्कर्ताम्हणेविधि ॥१९॥
कोपेंविष्णूबोलिला । अव्ययमीसर्वांपहिला । तुजसंकटींरक्षिला । विसरलाशीवाटते ॥२०॥
ब्रह्माम्हणेमीरचिलें । मिथ्याबोलसीगर्वबळें । अज अव्ययवेदबोले । मजसीचमुख्यमी ॥२१॥
एवंभांडतीपरस्पर । मध्येंप्रगटेंलिंगथोर । आकाशवाणीमनोहर । ऐकतीदोघेंतेसमईं ॥२२॥
वादव्यर्थनकरावा । लिंगाचाअंत आणावा । खालींवरीदोघेंधांवा । मिळतांअंतमोठातो ॥२३॥
विष्णूतेव्हांखालींगेला । बहुवर्षेंजातांथकला । गर्वहतपरत आला । पूर्वस्थळींश्रीहरी ॥२४॥
विधीगेल्यावरी । अंतकैंचाश्रमभारी । केतकीदळतेअवसरीं । शिवमस्तकीचेंपडियेलें ॥२५॥
तेंसापडेंब्रम्ह्याशीं । कपटसुचलेंमानसी । आधींचआलास्थळाशीं । हरीयेतांस्वयेंपुसे ॥२६॥
विधीम्हणेलाविलाअंत । लिंगशिरीचाप्रसाद अदभुत । केतकीहीतैसेंचवदत । चतुर्मुखशापभयें ॥२७॥
नविश्वसेनारायण । जरीसांगेलशिवआपण तरीचमीसत्यमानीन । शौरीएवंबोलिला ॥२८॥
ऐकतांचिऐसेंवचन । ध्वनीउठेलिंगांतून । खोटेंबोलेचतुरानन । दळबोलेतैसेंची ॥२९॥
मीतोंस्वयेंअनंत । तेथेंदुजयाकैचाअंत । केतकीमीत्यागित । अपूज्यविद्धीमत्शापें ॥३०॥
तेव्हांब्रम्हालज्जित । श्रीविष्णूशीनमस्कारित । स्वस्थळांसीदोघेजात । चित्रचरित्रअंबेचे ॥३१॥
नृपपुसेऋषीशी । सांगाअंबाप्रभावाशी । तैंसांगतीतयाशी । चरित्रत्रयमुनिवर ॥३२॥
उपदेशितीदोघांशी । नवाक्षरमंत्राशी । सांगकथिलेंपूजाविधीशी । हर्षितझालेनृपवैश्य ॥३३॥
दोघेंआज्ञाघेऊनी । पातलेनदीच्यापुलिनी । मृन्मयमूर्तीकरुनी । परांबेशीस्थापिले ॥३४॥
स्थलपाहोनीएकांत । जपतीमंत्रअदभुत । सांगअंबेसीपूजित । वर्षएकजाहले ॥३५॥
स्वप्नींपाहिलीभगवती । रक्तांबरादिव्यकांती । जडलीचरणीप्रीती । वाटेव्हावीप्रत्यक्ष ॥३६॥
जलाहारदुजेंवर्षीं । निराहारतिजेंवर्षींपरीनसेअंबाप्रत्यक्षी । मगहोमआरंभिला ॥३७॥
अग्निकुंडरचून । स्वमांसाचेंकरितीहवन । तेव्हांजाहलेंदर्शन । प्रत्यक्ष आलीजगदंबा ॥३८॥
ह्मणेतुमचीभक्तीपाहून । झालेमीतुम्हांप्रसन्न । मागाइच्छितदेईन । अलभ्यजरीत्रिभुवनी ॥३९॥
दोघानीरुपपाहून । साष्टांगकरितीनमन । भूपम्हणेनृपासन । निष्कंटकदेइजे ॥४०॥
वैश्यमागेदिव्यज्ञान । अंबाम्हणेनृपासन । निष्कंट आणिस्वाधीन । भोगिशील अयुतवर्षे ॥४१॥
देहांतीसूर्यापासून । दिव्यजन्मातेपावून । अष्टममनूसावर्णीहोऊन । मन्वंतरभोगावे ॥४२॥
वैश्यातुज असोज्ञान । एवंवरदानेंदेऊन । अंबाझालीअंतर्धान । कृपाळुतीआदिमाया ॥४३॥
नृप आलामुनीजवळी । नतझालापादकमळीं । म्हणेश्रीगुरोकृपाकेली । कृतार्थझालोंदातारा ॥४४॥
वैश्यझालामहाज्ञानी । क्रमीकाळतयेवनी । रतलाअंबगुरुचरणी । जीवन्मुक्तजाहला ॥४५॥
तव आलेप्रधान । करितीनृपासीनमन । घेऊनगेलेप्रार्थन । सुरथसुखेंराज्यकरी ॥४६॥
एवंअंबेंचेंचरित्र । नृपासांगेशक्तिपौत्र । सुरथाख्यानपवित्र । पठणेंश्रवणेंसर्वामिळे ॥४७॥
सूतसांगेऋषीशी । पंचमस्कंदकथेशी । दोनशेंअठ्ठावीसश्लोकासी । प्राकृतेंवदेअंबिका ॥४८॥
तीचबुद्धीतीचवाणी । तीचजीवतीचलेखणी । तीचमनतीच अंतःकर्णी । मीपणयेथेंनसंभवें ॥४९॥
परशुरामएकव्यक्ती । दिसेपृथक् पंचभूतीं । परीव्यापकसर्वशक्ती । भूषणामाजीकनकजैसें ॥५०॥
पूजनभजनध्यान । स्तोत्रयोगकिंवानमन । हेंतोंसर्वपृथक् भान । रचिलेंतिणेंस्वलीलें ॥५१॥
इतिश्रीमद्देवीभागवत्सारसंग्रहे देवीविजयेपंचमस्कंदे एकादशोध्यायः ॥११॥
स्कंदः समाप्त । श्रीजगदंबार्पणमस्तु ॥५॥
इति श्रीदेवीविजये पंचमस्कंदः समाप्तः
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP