पंचम स्कंध - अध्याय नववा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । समरंगणींआलाअसुर । वर्षेदेवीवरीशर । अंबिकाछेदूनीस्वशर । मारीतयासीमहातीक्ष्ण ॥१॥
सैन्यामाजिबाणजाल । अंबाटाकीविशाल । छिन्नभिन्नकेलेसकल । मूर्छितकेलेरक्तबीजा ॥२॥
दैत्यकरितीहाहःकार । बोंबकरितीदुर्धर । ऐकूनिवृत्तशुंभासुर । सर्वसैन्यपाठवी ॥३॥
कांबोजकुळाचेअसुर । धूम्रकुळाचेरणचतुर । कालकेयमहादुर्धर । अपारसैन्यचतुरंग ॥४॥
अतिरथीमहारथी । असंख्यातरणांयेती । रणदुर्मदमहाहत्ती । कोटिशःयेतींदैत्यासवें ॥५॥
असंख्यातघोडेस्वार । तैसेंचदुजेंउष्ट्रावर । तैसेंचमहाखरस्वार । मितीनाहींपायदळां ॥६॥
सैन्यचीलेउमटेध्वनी । शब्दनसांठवेगगनीं । पदंन्यासेंधूळ उडोनी । दिवसारात्रभासली ॥७॥
अगाधसैन्याचासागर । वाद्येंवाजतींअपार । झळकतींशस्त्रेंसुंदर । देखिलेंयेतांदेवीनें ॥८॥
केलागुणटणत्कार । घंटावाजवीझणत्कार । शंखफुंकीरणत्कार । नादेंभरलेंत्रैलोक्य ॥९॥
कालीकरीमुखविस्तार । गर्जेअतिभयंकर । सिंह आरोळीदुर्धर । मदगलितगजहोती ॥१०॥
दैत्यांचेंह्रदयकांपलें । देवगणतेसंतोषले । तवदेवीसैन्यपातलें । आनंदकरदेवांशीं ॥११॥
ज्यादेवाचेंरुपजैसें । शस्त्रभूषणवाहनतैसें । सैन्यासहयेतसे । प्रधानशक्तिमंडल ॥१२॥
हंसीरुढाचतुरानना । शुभ्रवस्त्रपरीधाना । अष्टभुजाशस्त्रेंनाना । दंडकमंडलूपुस्तकांदी ॥१३॥
एवंसर्वसुभाषणीं । सैन्यासहपातलीरणीं । नामजीचेब्रम्हाणी । सरस्वतीसत्वमूर्ती ॥१४॥
वृषावरीआरुढली । व्याघ्रचर्मातेनेसली । करिकृतिपांघुरली । मुंडमाळाकंठनिळा ॥१५॥
पंचवदनपंचदशनयन । वेणीगुंफजटेंसमान । माथाचंद्रशोभायमान । गंगावाहेझुळझुळा ॥१६॥
सर्वांगीभस्मचर्चिलें । माथाकुंकुमशोभलें । दशभुजींशस्त्रांधरिलें । शूलखड्गतोमर ॥१७॥
परशुपट्टिशपाशशर । डमरुचापकपालकर । माहश्वरीतेमहाक्रूर । संव्हारार्थपातली ॥१८॥
वाहनजियेचेंमयूर । षण्मुख अणिद्वादशकर । शक्त्यादिशस्त्रेंपरिकर । गुहशक्तिपातली ॥१९॥
गरुडरम्यवाहन । चतुर्भुजशोभायमान । फणीसमवेणीशोभन । लेईलीसर्वभूषणें ॥२०॥
शखचक्रगदाकमल । धनुर्बाणखड्गनिर्मल । पीतपीतांबरसाज्वळ । रुळेगळांवैजयंती ॥२१॥
कौस्तुभलेइलीसुंदर । मुगुटशोभलेरत्ननिकर । सैन्यशक्तिअपार । वैष्णवीतेथेंपातली ॥२२॥
प्रेतासनामहाघोर । दाढादिसतीभ्यासुर । गर्जत आलीघर्घर । शक्तियुक्तावाराही ॥२३॥
रुपशोभेनरहरी । दंष्ट्रानखेंशस्त्रापरी । पिंगठनेत्रसटापसरी । नारसिंहीनादपूर्णा ॥२४॥
चतुर्दंत ऐरावती । बैसलीसेवज्रहातीं । इंद्राणीतीइंद्राकृती । शक्तीसैन्येंआलीतेथें ॥२५॥
महिषारुढयमशक्ति । कालदंडजीचेहातीं । अष्टदिग्पालांच्याशक्ती । सैन्यासहपातल्या ॥२६॥
येऊनीतेथेंशंकर । अंबेसीम्हणेसत्वर । करुनिदैत्यसंहार । स्वर्गदेऊनीइंद्राशी ॥२७॥
चलावेंमगस्वस्थानीं । बोलेऐसेंशूलपाणी । तोंतीच्याशरीरांतुनी । शक्तिएकप्रगटली ॥२८॥
भयंकररुपनटली । चामुंडेसम उभीठेवली । हांसोनिम्हणेचंद्रमौळी । दूतहोयींईश्वरा ॥२९॥
शुंभनिशुंभाजाऊन । सांगावेंमाझेंवचन । इच्छाजरीप्राणरक्षण । जावेंसत्वरपाताळां ॥३०॥
इंद्रपावोंआतांस्वर्ग । ऋषिप्रणीतयज्ञभाग । बलगर्वाचातुजवेग । मरणप्रद असेजरी ॥३१॥
तरीत्वांकीजेत्वरा । सर्वांसहयेईसमरां । तुमचींमांसेरक्तधार । माझ्याशिवातृप्तहोत ॥३२॥
शिवेंतैसेचिजाऊन । आलाशुंभासीसांगून । तेहींवाक्य ऐकून । युद्धावेगेंधाविनले ॥३३॥
जिणेंशिवापाठविले । तिचेनामविख्यातझालें । शिवदूतिम्हणोनिवहिलें । जगामाजीतेधवा ॥३४॥
शरवृष्टीकरितीदैत्य । अंबाछेदूनिटाकित । स्वयेंत्यावरीप्रेरित । नानाशस्त्रेंलीलेंनें ॥३५॥
कालीकरुनीअट्टहास । आरंभकरीभक्षणास । कालरात्रीदैत्यास । शूलघातेंपाडीतसें ॥३६॥
कमंडलूंतीलवारी । मंत्रपुतदैत्यामारी । कित्येकपाडीदंडप्रहरी । ब्रम्हाणीतीक्रोधभरें ॥३७॥
त्रिशूलखड्गतोमर । नानाशस्त्रेंप्रहार । करुनिकरीसंहार । माहेश्वरीदैत्यांचा ॥३८॥
गुहांबामारीअसुर । करीशक्तीचेप्रहार । गर्जेउडेमयूर । रणांगणीजियेचा ॥३९॥
वाजवीपांचजन्यदर । शब्देंकरीदैत्यबधिर । गदाधार्येकरीचूर । दैत्यसैन्यवैष्णवी ॥४०॥
तुंडाचाचकरीमार । शक्तिटोंचीनिरंतर । सहस्त्रशःमारिलेअसुर । वाराहीनेंसक्रोधे ॥४१॥
नारसिंहीगर्जेक्रूर । केशझाडीवारंवार । नखफाडूनीअसुर । रक्तपानकरीतसे ॥४२॥
इंद्राणीचावज्रपात । दैत्यांचाकरीतसेघात । दिग्पालशक्त्यामारित । राक्षससैन्यपरोपरी ॥४३॥
ऐकोनीशिवदूतीस्वन । दैत्यहोतीप्राणहीन । सिंहजेवीहुताशन । दैत्यावनींसंचरे ॥४४॥
हातपायनाककान । छेदितीअंबेचेबाण । दैत्यशस्त्रेंशक्तिसैन्य । किंचितहीदुखावेना ॥४५॥
कोणाचीतुटलींशिरें । कबंधेचिफिरतींफेरे । दांतदाखवूनहांसतींशिरें । मारामारागर्जती ॥४६॥
कोणीझालेंएककर । तैसेचिकरितीसमर । एकापायेचिसाचार । उडतीहाणितीशक्तिसैन्या ॥४७॥
कित्येकांचीनुसतींशिरें । गिळूंधांवतीभयंकरे । चामुंडाचावींसत्वरे । सैन्यतेव्हांअपार ॥४८॥
कित्येकनाचतींरुडें । कित्येक उडतीमुडे । कित्येकमरतीघोडे । रथ उष्ट्रखरादिक ॥४९॥
विमानींबैसलेसुर । आनंदेंकरितीजयजयकार । पुष्पवृष्ठिशक्त्यांवर । वारंवारकरितीते ॥५०॥
दैत्यसैन्यनासावलें । चहूंदिशापळूंलागलें । बुंबारवीआक्रोशलें । मेलोंमेलोंम्हणताती ॥५१॥
नकोनकोहायहाय । वाटनसेकरुंकाय । ठावदेगेंधरणीमाय । एवंरडतींअसुरते ॥५२॥
एवंपाहूनसैन्यगती । रक्तबीज आलारणाप्रती । महायोद्धापापमती । वृष्टीवर्षेशस्त्रांची ॥५३॥
सर्वशक्त्यापृथकत्याशी । शस्त्रेंमारितीबहुवशी । तोहीहाणीसर्वांशी । नानाशस्त्रेंकठोर ॥५४॥
वैष्णवीमारीसहस्रार । स्रवेतेणेंत्याचेंरुधिर । बिंदुपडतीभूमीवर । रक्तबीजनिपजती ॥५५॥
तैसेंचीरुपतैसेंचिबल । गदापाणीमहाखल । भरलेंत्यानी भूमंडल । युद्धकरितीदारुणते ॥५६॥
सर्वशक्त्यादेतीमार । दैत्यांचेस्रवेंरुधिर । रक्तबीजझालेअपार । भयचकितदेवझाले ॥५७॥
उद्विग्नपाहनसुरासी । अंबाम्हणेचामुंडेसी । पसरुनिमुखत्वरेशी । रुधिरचाटींदुष्ठांचे ॥५८॥
मीमारितेंशस्त्रघात । तूंप्राशीतेंलोहित । बींदूपृथ्वीसीनपडत । तेसेंकरीवेगानें ॥५९॥
जाहलेंजेउत्पन्न । त्याचेकरीचर्वण । एवंफिरसीतूरण । मरेलतेव्हांदैत्यहा ॥६०॥
पिशीलजेव्हांरुधिरा । नुपजतींमग असुर । ऐसेंवदोनीसत्वर । मारीशूलरक्तबीजा ॥६१॥
चामुंडागेलीतयांजवळ । जिव्हाकरीलळलळ । चाटींरक्त उतावेळ । मांसचावींचरचरा ॥६२॥
क्रोधभरेंतोअसुर । करीतीसीगदाप्रहार । नचळेंपरीभयंकर । उग्रसीमाचामुंडा ॥६३॥
मूर्तकेवळरौद्ररसाची । चामुंडाकालिकासाची । कायाचाटिलीतयाची । रुधिरसर्वशोषिले ॥६४॥
अंबिकाशस्त्रेंकरुन । देहकरीछिन्नभिन्न । चामुंडासर्वचाटून । शुष्ककेलातयाशी ॥६५॥
रक्तपडेमुखाभितरीं । उत्पन्नहोतींदैत्यभारी । पुन्हात्याचेचर्वणकरी । एवंपडलादैत्यतो ॥६६॥
जेहोतेव्यापुन । चामुंडाचावींमुखींघालून । आणीकहीशक्तिसैन्य । दैत्यसैन्याभक्षीतसे ॥६७॥
रक्तबीजरणीपडला । शेषसैन्यापळसुटला । वर्तमानकळेशुंभांला । निशुंभ आलास्वसैन्यें ॥६८॥
पाहवयाबंधुसमर । स्वयेंआलाशुंभासुर । आतांतोयुद्धप्रकार । अन्याध्यायेंऐकिजे ॥६९॥
तेवीसश्लोकएकशत । रक्तबीजाचाकेलाघात । अंबावदलीप्राकृत । चित्रचमत्कृत आख्यानहें ॥७०॥
देवीविजयेपंचमेनवमः ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP