सप्तम स्कंध - अध्याय चवथा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नृपम्हणेबादरायणा । संशयवाटेमाझेंमना । शक्तकेवींझालागमना । कन्येसहरैवत ॥१॥

स्वर्गादिसर्वलोकांत । गतिनव्हेंयादेहांत । पुण्यकर्मेगतीहोत । मरणानंतर ऐकिलें ॥२॥

व्यासम्हणेनृपती । महत्पुण्येंलोकगती । होयसर्वांनिश्चिति । याचिदेहींमनुष्या ॥३॥

इंद्र अग्नीयमनैऋत । वरुणवायूसोमविख्यात । ईशानादिलोकसमस्त । मेरुवरीविराजती ॥४॥

रुद्रब्रम्हाविष्णुस्थान । मेरुवरीसर्वजाण । महत्पुण्येंहोयगान । सर्वत्रसर्वांसर्वदा ॥५॥

तुझाआजाअर्जुन । पांचवर्षेंसंपुर्ण । राहिलाइंद्रलोकीजाऊन । महाभिषब्रम्हलोकी ॥६॥

स्वपुण्येकरुनिविशेष । इंद्रजाहलास्वयेंनहुष । ककुस्थादिपुण्यपुरुष । स्वर्गगमनीजाहले ॥७॥

असोकन्येसहरैवत । ब्रम्हसभेंगेलात्वरित । तेथेंहोतेगंधर्वगीत । सुरस ऐकेक्षणभरी ॥८॥

संपतांचिसुरसगायन । नृपेंवंदिलाचतुरानन । म्हणेवरनमिळेसमान । रुपेंगुणेंपराक्रमी ॥९॥

आलोंपुसायातुजसी । योग्यवरसांग इजसी । ऐकुनिरैवतवाक्यासी । हांसोनिबोलेविधाता ॥१०॥

नृपातूंजेंमनीचिंतिलें । तेनृपसर्वनासले । तववंशाखंडनझाले । नष्टजाहलीतवनगरी ॥११॥

कालबहूतजाहला । चतुर्युगेंनक्षत्रवेळा । गेलींद्वापरयेवेळा । अठ्ठाविसावेंवर्ततसे ॥१२॥

सोमवंशीयदुकुळीं । विष्णुअवतरलायेवेळीं । द्वारकेमाजीमहाबळी । राहतसेसांप्रत ॥१३॥

तयाचाज्येष्ठसहोदर । नामत्याचेहलधर । तोअनंत अवतार । कन्यादेईतयाशी ॥१४॥

जाईंआतांसत्वरी । तयासीकन्यादानकरी । तपालागीनिर्धारी । तपोवनांजावेंत्वां ॥१५॥

एवंऐकतांचिवचन । रावनिघालावंदून । पाहिलेनगरयेऊन । अन्यसर्वदेखिलें ॥१६॥

मनामाजीनवलकरी । कन्यादेऊनीरामकरीं । स्वयेंगेलाझडकरी । तपोवनासीरैवत ॥१७॥

युगेंअष्टोत्तरशत । गेलींतेथेंनिमिषांत । जराग्लानीक्षुधाकिंचित । नसेतेथेंजनमेजया ॥१८॥

ब्रम्हलोकींगेलानृपती । मागेराक्षसीत्यांचिसंतती । मारिलीजाणनिश्चिती । शर्यातिवंशखंडिला ॥१९॥

इक्ष्वाकूजोमनुसुत । तोतपलासृष्ठ्यर्थ । देवीसेवींनिश्चलचित्त । नारदाच्याउपदेशें ॥२०॥

विकुक्षिप्रभृतिशत । पुत्रजाहलेबळवंत । अयोध्येशीराज्यकरित । इक्ष्वाकुनामारविवंशी ॥२१॥

श्राध्यार्थ आणिमांस । म्हणोनिआज्ञापीपुत्रास । तोगेलामृगयेस । श्रमलाबहुविकुक्षी ॥२२॥

श्राद्धाचेंझालेंविस्मरण । शशककेलाभक्षण । शेषमांसदिलेंआणुन । ओळखिलेंवसिष्ठें ॥२३॥

उछिष्ट आणिलेंमांस । कळतांचिऐसेंनृपास । त्यागिलातेणेंपुत्रास । शशादनामपुत्रपावे ॥२४॥

विकुक्षीतोचिशशाद । वनीराहेसखेद । पुढेंत्यासीचनृपपद । प्राप्तझालेंदेवीकृपें ॥२५॥

तेणेंबहुयज्ञकेले । अंबेलागीअराधिले । प्रजापालननीटकेलें । शत्रूजिंकिलेसमस्त ॥२६॥

ककुस्थनामेंत्याचासुत । तोपराक्रमीअदभूत । परांबेचापरमभक्त । ककुस्थनामपावला ॥२७॥

एकदांदैत्यभयेंसुरपती । शरणगेलाविष्णुप्रती । साह्यकीजेरमापती । दैत्यहरीदैत्यारे ॥२८॥

तयासांगेनारायण । प्रार्थीशशानंदन । करीलतोशत्रुदमन । देवीभक्तपराक्रमी ॥२९॥

ऐकुनीसर्वदेव आले । शशादपुत्रेपूजीले । किमर्थ आगमनझाले । धन्यकेलेम्हणेतो ॥३०॥

देवम्हणतीनृपा । साह्यकरीसुराधिपा । तुजवरीअंबकृपा । कठिणकायतुजलागी ॥३१॥

तवबोलेनृपनंदन । शक्रासाह्यकरीन । जरीहोईलममवाहन । सत्यजाणादेवहो ॥३२॥

व्यासम्हणेपुरंदर । ऐकूनिलज्जितांतर । होऊनीवृषभथोर । नृपासमीपठाकला ॥३३॥

नृपेंतेव्हांआनंदोन । वरीकेलेआरोहण । दैत्यनाशिलेसंपूण । पदस्थित इंद्रकेला ॥३४॥

वृषाचेजेंअसेपाठी । ककुंनामेंतीगांठी । बैसेनृपत्यासाठीं । ककुस्थनामपावला ॥३५॥

त्याचेवंशज । काकुस्थम्हणविलेसहज । सुतत्याचामहाराज । काकुस्थनामेंजाहला ॥३६॥

त्याचाप्रुथूनामेंसुत । विष्णवांशतोविख्यात । विश्वरंधीत्याचासुत । चंद्रनामेंपुत्रत्याचा ॥३७॥

युवनाश्वत्याचासुत । तयाझालाशावंत । स्वनामेंपुरीनिर्मित । दुजीकेवळ इंद्रपुरी ॥३८॥

त्याचापुत्रबृहदश्व । त्यापासोनिकुवलयाश्व । धुंधुनामादैत्यास । मारिलेतेणेंनिजबळें ॥३९॥

नामपावलाधुंधुमार । दृढाश्वत्याचाकुमर । त्याचाहर्यश्वसुंदर । निकुंभपुत्रतयाचा ॥४०॥

निकुंभाचाबर्हणाश्व । त्याचापुत्रकृशाश्व । प्रसेनजिन्नामेंत्यास । यौवनाश्वतयाचा ॥४१॥

यौवनाश्वाशतनारी । परीपुत्रनसेसंसारी । पुत्रार्थतेव्हांविप्रवरी । इष्टीकेलीइंद्रदेवा ॥४२॥

पुत्रार्थ उदकसमंत्र । द्विजावरीस्थापिलेंपवित्र । दैवयोगेंतृषितगात्र । प्राशनकरीभूपती ॥४३॥

नृपेंउदकप्राशिलें । गर्भराहिलामंत्रबळें । पोटफोडूनदैवबळे । पुत्रनिघालाबाहेर ॥४४॥

विदरिलेंजरीउदर । तरीवांचलानृपवर । केवींवांचेलहाकुमर । आक्रोशतिसर्वही ॥४५॥

इंद्रेंतेव्हांयेऊनी । दुग्धलेंपितृतर्जनीं । मांधाताऐसेंम्हणोनी । देवेंद्रगुप्तजाहला ॥४६॥

मांझेंकरीलधारण । एवंजाहलेंइंद्रवचन । मांधातानामाजाण । पुत्रझालादेवीकृपें ॥४७॥

मांधातापरमसुंदर । राज्यकरीनीतिपर । शत्रूकपटीक्रूरचोर । निर्मूळकेलेपराक्रमें ॥४८॥

चोरांअतित्रासविले । त्रसदस्यूनामठेविले । शक्रेंत्याचेअतिवत्सलें । शक्रप्रियनृपझाला ॥४९॥

अंबेचापरमभक्त । झालातोपरमशाक्त । अंबामंदिरेंव्यक्त । अष्टोत्तरशतकेली ॥५०॥

शशबिंदूचीबिंदूमती । कन्याअतिरुपवती । विवाहिलीनृपाप्रती । दोनपुत्रजाहले ॥५१॥

पुरुकुत्सज्येष्ठसुत । धाकटामुचकुंदविख्यात । जेणेंदेवशत्रूसमस्त । मारुनिविवरीनिजेला ॥५२॥

तोचिपुढेंकृष्णावतारीं । कालयवनादग्धकरी । अल्पपाहूनिप्रजासारी । नेलावेगेंतपोवनां ॥५३॥

पुरुकुत्साअरण्यसुत । बृहदश्वतयाहोत । हर्यश्वतयाचासुत । त्रिधन्वापुत्रत्याचा ॥५४॥

त्रिधन्व्याचापुत्र अरुण । सत्यव्रतपुत्रदारुण । झालात्याचाकुलक्षण । उपद्रवीलोकासी ॥५५॥

विवाहहोताद्विजाघरी । बळेचहाकन्याहरी । विप्रसर्वराजद्वारी । आक्रोशतीतवेळ ॥५६॥

अरुणोंविप्रवंदिले । दुःखकायतयांपुसिलें । पुत्रकृत्यनिवेदिले । कोपलानृपवर ॥५७॥

बोलाऊनपुत्रासी । म्हणेवृथाउपजलासी । डागलाविलाकुळांशी । निघसत्वरदुष्टात्म्या ॥५८॥

तेव्हांतोभयेकरुन । कोठेंराहूवदेस्थान । नृपम्हणेचांडाळाजाऊन । चंडाळांतवसावे ॥५९॥

विप्रस्त्रीचेहरणकरी । चांडाळतोनिर्धारी । पुत्रगेलाचांडालघरी । दुःखान्वितराहिला ॥६०॥

मनीम्हणेमाझापिता । कोपलाजैंमजवरता । वसिष्ठेंबोधिलातत्वता । निष्कासितावसिष्ठाची ॥६१॥

एवंचिंतूनिमानसी । द्वेषबाळगीगुरुसी । कवचखड्गधनूसी । बाणभातेबाळगीतसे ॥६२॥

कोणीविप्रापासून । नवार्णवकेलाग्रहण । चांडालगृहीचबैसून । जपकरीनित्यतो ॥६३॥

पुत्र इच्छामनीधरुन । तपागेलाराव अरुण । तेसमईंगाधिनंदन । तपार्थगेलाअन्यस्थळी ॥६४॥

नृपजेंव्हांगेलावनी । अयोध्यापाळीवसिष्ठमुनी । सत्यव्रतचंडालसदनीं । वसेदुःखीजपीमनू ॥६५॥

पडलेंतेव्हांआवर्षण । द्वादशवर्षेंदारुण । विश्वामित्रभार्याजाण । राहेतेथेंसपुत्रा ॥६६॥

शतपुत्र असतीतीस । नमिळेंतयांभक्षणास । रुदनकरितीअतित्रास । पतिव्रतेसीजाहला ॥६७॥

पतीनाहींमाझाघरी । भिक्षानमिळेनगरी । नृपनाहींराजमंदिरीं । यांचूंकोणामनींम्हणे ॥६८॥

अन्नाविणेंसर्वांमरण । होईलकींनिश्चयान । पतीगेलाटाकूनसदन । समर्थ असूनपोषणी ॥६९॥

आतांकायम्याकरणें । एकक्रयेसर्वरक्षणें । पुत्राहेंचिबरवेंपणें । निश्चयकेलामानसी ॥७०॥

दर्भाचीवळिलीदोरी । ह्रदयकेलेंदगडापरी । मध्यमाबांधूनीसत्वरी । विकावयाजातसे ॥७१॥

राजपुत्रेंतीपाहिली । पुत्रगळांदोरीबांधिली । सत्यव्रतादया आली । विचारिलेंतियेशी ॥७२॥

बाईतूंकोणाचीदारा । किमर्थबांधिलेकुमरा । आलीसकांबाजारां । सर्वसांगमजलागी ॥७३॥

तीम्हणेमीराजसुता । आहेविश्वामित्रकांता । पुत्रविकितेंतत्वता । अन्नाकारणेंयेसमईं ॥७४॥

तोम्हणेहोऋषिसती । जावेस्वस्थगृहांप्रती । तुझेंद्वारीनित्यप्रति । भक्ष्यठेवीननचुकतां ॥७५॥

यावद्येईलमुनी । तावद्देईनआणूनी । पुत्राचाकंठसोडुनी । घराजायपतिव्रते ॥७६॥

ऐकुनितीसंतोषलीं । दोरीतत्कांळसोडिली । पुत्राघेऊनघरांगेली । राहीलीसुखेंकरुनिया ॥७७॥

गळयाशीपुत्रबांधिला । गालवनामतोपावला । महासमर्थऋषीझाला । विश्वामित्रपुत्रतो ॥७८॥

अरुणपुत्रनित्यवनी । पशूमारीजाऊनी । तिचेद्वारींमांसबांधुनी । परतयेईभक्षीस्वयें ॥७९॥

एकेदिनीपशूनमिळें । वनींहिंडेबहुवेळें । वसिष्ठाधेनूसीदेखिले । वधिलीतत्काळलोभानें ॥८०॥

मांसबांधूनवृक्षासी । शेषभक्षिलेंसंतोषीं । नेणोनीतेंचिबाळकासी । देईंभक्षीमुनिदारा ॥८१॥

वसिष्ठासिजेव्हांकळलें । येऊनितयाशापिलें । दुष्टातुवाअकृतकेलें । गोहत्यापापजाणूनी ॥८२॥

केलेंस्त्रीचेहरण । दुजेंधेनूचेमारण । तिजापितृकोपदारुण । त्रिशंकूहोततुजलागी ॥८३॥

एवंतयाशापुनी । स्वगृहीगेलामुनी । परीहाचांडालभुवनी । मंत्रजपेसर्वदा ॥८४॥

सत्याहत्तर आणिशत । वंशाख्यात्रिशंकुचरित । सारसंग्रहप्राकृत । करीतसेपरांबा ॥८५॥

देवीविजयेच्यवनोपाख्यानेंसप्तमेचतुर्थः ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP