सप्तम स्कंध - अध्याय दहावा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्री गणेशायनमः ।
व्यास म्हणती भूपती । सूर्यवंशराजकिर्ती । कथिलीतुजदेवी भक्ती । सोमवंशसांगेन ॥१॥
निश्चयेजाणभरता । जेथेंविशेषदिसेसत्ता । ऐश्वर्यरुपनिरोगता । देवीअंशजाणिजे ॥२॥
संसारवृक्षकुठार । जाणदेवीभक्तनर । सर्वसोडुनिव्यापार । देवीचरणसेविजे ॥३॥
धान्यार्थीजेवींकर्षक । टाकीतसेसर्वतुषादिक । तेवींजाणूनिअलोक । देवीभक्तेटाकीजे ॥४॥
वेदक्षीरोदमंथन । केलेंमीबहुतदिन । तदालाभलोंअमोलरत्न । पादपंकजदेवीचे ॥५॥
तेव्हांझालोंकृतार्थ । उरलानाहींकांहींअर्थ । खराखुराझालास्वार्थ । परमार्थसर्वसाधला ॥६॥
पंचब्रम्हाचेआसन । नसे एकतिजवांचून । अधिकनाहींपांचाहुन । स्पष्टवेदींगाइले ॥७॥
पंचब्रम्हसनातन । ब्रम्हाविष्णुरुद्रतीन । ईश्वरचौथाखुरजाण । मंचकाचेशोभले ॥८॥
सदाशिवफैलकस्थान । एवंजियेचेंआसन । विस्तारेयाचेविवरण । पुढेंहोईलप्रसंगे ॥९॥
ऐसीजीपरमेश्वरी । घ्यावीसदाअंतरी । भयकायभवसागरीं । चरणनौकासापडतां ॥१०॥
नजाणतांदेवीकला । मुक्तिकैचिजंतुला । चर्मवत आकाशेंवेष्टिला । मुक्तकेवींसंसारी ॥११॥
देहावरीजेवींचर्म । आकाशतेंवीमायावर्म । ज्ञानावांचूनमनभ्रम । नासनसेशून्याचा ॥१२॥
आकाशहेंएकशून्य । दुजेजाणिजेमन । तिजेंमीजीवपण । वेष्टणकेलेंज्ञानाशी ॥१३॥
तीनशून्यापलीकडे । स्वरुपराहेरोकडे । केवींनिरसेसाकडे । आत्मलाभदुर्लभ ॥१४॥
श्वेताश्वतराश्रुति । निश्चयेंसांगेमुक्ति । अंबासेवाहेचयुक्ती । वेष्टणेंदूरकराया ॥१५॥
जन्मव्हावाजरीसफल । अंबेचेपदकोमल । ह्रदईंधरावेसर्वकाळ । निश्चळमनकरावे ॥१६॥
कोणचेहीअसोनिमित्त । अंबानाममुखींयेत । भयेंअथवालज्यायुक्त । दंभेंकामेंस्मरावें ॥१७॥
कीजेदेवीकीर्तन । तिचेचकीजेपूजन । सदाकीजेनामस्मरण । उठतांबसतांबोलतां ॥१८॥
खातांपितांगातांहंसतां । निजतांरडतांभांडतां । जातांयेतांमार्गक्रमितां । स्मरावीएकमातोश्री ॥१९॥
विराटरुपेंव्यापिली । सूत्ररुपेंप्रत्ययाआली । अंतर्यामीरुपेंभासली । क्रमयोगेंसेविजे ॥२०॥
स्थिरचरदेवीच ऐसें । समदृष्टीनेंजैंभासे । सूत्ररुपमाळेसरिसे । ओळखहोयतेधवा ॥२१॥
दृश्यजेंजडभान । तेंचिपुष्पासमान । चाळवीजेंचैतन्य । सूत्ररुपतेंचिपैं ॥२२॥
सूत्रजेंव्हांप्रकाशलें । चैत्तन्यतेंकळोआलें । अंतर्यामींव्यापलें । तेंचिआलेंअनुभवा ॥२३॥
ऐसेंहेंदेवीरुपभान । होतांशुद्धहायेमन । यासर्वांचेंएकसाधन । अखंडस्मरण अंबेचे ॥२४॥
एवंहासोपानक्रम । भक्तिविनासोपानक्रम । येथेंनचलेपराक्रम । धनविद्यादिकांचा ॥२५॥
जरीभाग्यवशेंसदगुरु । लाधेल उपदेशवरु । तरीगवसेमोक्षतरु । मूळज्याचेदेवीपद ॥२६॥
एवंतुजकथानक । कथिलेनृपासंम्यक । काय इच्छिसीआणिक । श्रवणार्थसांगवदेनमी ॥२७॥
नृपम्हणेमुनिवर्या । कथाकथिलीदेवाचीया । आणीकहीऐकाया । मन इच्छाकरीतसे ॥२८॥
प्राशितांहेंकथामृत । तृप्तीनसेकर्णाप्रत । क्षुधावाढलीबहुत । सुधापानेंजेविदेवा ॥२९॥
बम्हाविष्णुआणिहर । पूर्वीगेलेश्रीपुर । देवीकृपेंमनोहर । शक्तित्रयपावले ॥३०॥
हराचीशक्तीजीकाली । पुन्हादक्षकन्याझाली । पर्वतराजहिमाचली । पुन्हाजन्म ऐकिले ॥३१॥
क्षीराब्धीमाजीरमा । आलीकेवीपुनर्जन्मा । शक्त्यंश असोनिपरमा । जन्मांतरकेवीत्याशी ॥३२॥
संदेह असेमानसी । ज्ञानशस्त्रेंछेदिशी । भाग्ययोगेंलाधलाशीं । गुरुमाझागुरुवर्या ॥३३॥
व्यासम्हणेऐकनरपती । हालाहलनामेंविख्याति । दैत्यझालेबलिष्ट अति । चतुर्मुखवरदानें ॥३४॥
रोधिलेतैंकैलास । उपद्रविलेवैकुंठास । दोघेकरितीयुद्धास । हरिहरादिदेवता ॥३५॥
माजलाबहुकोलाहल । दैत्यतेहीअतिप्रबळ । साठसहस्रवर्षेतुमुल । देवासुरींयुद्धझाले ॥३६॥
अतियत्नेकरुन । दैत्यवधिलेदारुण । रुरुआणिसंकर्षण । स्वगृहासीपातले ॥३७॥
गर्वजाहलामानसी । विक्रमवर्णितीस्रियेशी । छलयुक्तहास्याशी । उमारमाकरितीत्या ॥३८॥
आमुच्यायोगेंकरुन । शक्तदोघेहीअसून । गर्वेंकरितींवर्णन । छळकेलातेणेंगुणें ॥३९॥
क्रोधावलेहरिहर । केलात्यांचातिरस्कार । अपमानितोचिसत्वर । गुप्तझाल्यादोघीजणी ॥४०॥
दोघांच्याहरल्याशक्ति । अशक्तझालेनिश्चिती । तेजहीनदोघेहोती । कुणापापरीपडियेलें ॥४१॥
ब्रम्हदेवेंतयापाहिलें । ध्यानयोगेंत्यासकळलें । उभयकर्मसंभाळिलें । तपोयोगेंसावधान ॥४२॥
दक्षादिकांबोलाऊन । आज्ञाकरीचतुरानन । करादेवीआराधन । जेणेंकल्याणहरिहरा ॥४३॥
आज्ञावंदूनीनिघाले । सनकादिसर्वपातले । हिमाचलीआराधिले । लक्षवर्षपर्यंत ॥४४॥
पाश अंकुश अभयवर । चतुर्बाहूमनोहर । रक्तमाल्यरक्तांबर । ध्यानयोगेंचिंतिली ॥४५॥
मायाबीजशक्तीबीज । वाणीतैसेकामराज । कोणीजपतीरमाबीज । पल्लवयुक्तभक्तीनें ॥४६॥
प्रत्यक्षझालेंदर्शन । सर्वहीकरितीनमन । प्रदक्षिणास्तुतीस्तवन । प्रेमयुक्तकरितीते ॥४७॥
विश्वमूर्तीआदिमाये । तेजरुपेअग्निमये । सूत्ररुपिणीअव्यये । लिंगरुपेनमोगमः ॥४८॥
ओतप्रोततूंचिसंचली । प्राज्ञतेजसविश्वबली । अविनाशमूर्तीरेखिली । नमोनमोनमोस्तु ॥४९॥
एवंकरुनिस्तवन । सर्वींवंदिलेचरण । मागाम्हणेवरदान । इच्छितजेंजेंमानसी ॥५०॥
हरिविष्णूचीदेहशांति । पुन्हाप्राप्त असोशक्ति । दक्षम्हणेअंबेप्रती । माझेंकुळींप्रगटावें ॥५१॥
जेणेंमीकृतकृत्य । होईनसर्वजगतांत । पुजाध्यानविधिसहित । स्वमुखेंमज उपदेशी ॥५२॥
परांबाबोलेआपण । माझाकेलाअवमान । तेणेंतयादुःखदारुण । प्राप्तझालेहरिहरा ॥५३॥
एतादृशअवमान । माझानकरावाजाण । आतांमत्कृपेकरुन । स्वस्थहोतीलहरिहर ॥५४॥
माझ्याप्रेरणेकरुन । शक्तीहोतीलनिर्माण । शिवशक्तितवगृहींजाण । क्षीरसागरीहरिशक्ती ॥५५॥
मायाबीजमुख्यमंत्र । प्रियकरमजपवित्र । विराटरुपविचित्र । अथवासन्मुख असेंजें ॥५६॥
अथवा सच्चिदानंद । रुपमाझेंमोक्षद । अशेषेंजगकामद । स्थानमाझेंचिजाणिजे ॥५७॥
सदैवमाझेंपूजन । तुम्हीकीजेभक्तीन । व्यासम्हणे एवंवदोन । गुप्तझालीपरांबा ॥५८॥
दक्षादिसर्वमुनि । आलेकृतार्थहोऊनी । ब्रम्हदेवानिवेदूनि । स्वस्वस्थानिपातले ॥५९॥
शक्तझालेहरिहर । अभिमानझालादूर । कित्येकवर्षानंतर । प्रगटलीदक्षगृहीं ॥६०॥
सत्यत्वेंनामासती । दक्षेंकेलेंकन्येप्रती । शिवासीअर्पिलीप्रीती । शिवशक्तीजाणूनिया ॥६१॥
तीपुन्हादग्धझाली । हिमाचलीप्रगटली । बहुकाळेंशिवालाधली । पार्वतीझालीकाळिका ॥६२॥
रावम्हणेजीमुनी । महद्वस्तूदाक्षायणी । किमर्थदग्धहोऊनि । पर्वतींकिमर्थजन्मसांग ॥६३॥
व्याससांगेनृपालागुनी । एकदादुर्वासमुनी । जांबूनदेश्वरीपाहूनी । मायाबीजजपतसे ॥६४॥
प्रसन्नहोऊनिदुर्वासाला । देवीदेतमंदारमाला । रुंजीकरीभ्रमरमाला । मकरंदार्थजीवरी ॥६५॥
ऋषीतेथूनीनिघाला । सहजदक्षगृहींआला । कंठीशोभेदिव्यमाला । दक्षेंपुसिलेंसप्रेमें ॥६६॥
दिव्यमाळामहामुनी । दुर्लभहित्रिभुवनी । लाधलीकेवीतुम्हाझणी । भाग्ययोगेंसांगिजे ॥६७॥
प्रेमसदगदबोलेऋषी । देवीप्रसाददेतमजसी । दक्षमागेमुनिवरासी । समर्पिलीमुनिवरे ॥६८॥
मस्तकेमाळाघेउनी । मनुस्थापिनिजशयनी । सुवासेंमदयूक्तहोऊनी । पशुकर्मीरतलातो ॥६९॥
व्यापापाच्याविपाके । शिवद्वेषमनीठाके । सतीसहीनिंद्यभाके । यज्ञमंडपीदक्षतो ॥७०॥
तेव्हांतीकोपली । तुजपासूनतनुझाली । मजलागीनसेभली । शिवद्वेष्ट अधमतूं ॥७१॥
एवंवदलादाक्षायणी । उडीघातलीयज्ञदहनी । हाहःकारत्रिभुवनीं । वर्तलातेव्हांनृपाळा ॥७२॥
सतीदाहेशिवकोपला । वीरभद्रप्रगटकेला । दक्षयज्ञविध्वंसिला । शिरच्छेदिलेदक्षाचे ॥७३॥
ब्रम्हादितेव्हांसुरगण । कैलासालागीजाऊन । शिवकेलाप्रसन्न । स्तवकरुनिभक्तीनें ॥७४॥
दक्षाजोडिलेबस्तरशिर । मंडपीआलास्वयेहर । मृतपाहूनसतीशरीर । शोकतप्तजाहला ॥७५॥
खांदाघेऊनकलेवर । रुदनकरीतशंकर । चाललाजेव्हांवनांतर । कोणाकांहींसुचेना ॥७६॥
चापसज्जकरुनहरी । कलेवराशरमारी । खंडेकरुनपृथ्वीवरी । पाडिताझालामुरहर ॥७७॥
जेथेंजेथेंखंडपडले । तेथेंतेथेंपीठझाले । देवीस्थानप्रर्वतलें । नानारुपेंराहेहर ॥७८॥
देवाशीसांगेहरि । हीस्थानेंभुमिवरी । सिद्धीप्रदसंसारी । स्वयेस्वांगेदेवीह्या ॥७९॥
यास्थानीजेनर । मंत्रजपतीतत्पर । दुर्लभनसेमोक्षद्वार । भोगसर्वलाभती ॥८०॥
नृपम्हणेहोमुनी । स्थानेंसांगामोजूनी । कोठेंकितीत्रिभुवनीं । विस्तारेंकरायागायन ॥८१॥
व्यासम्हणेऐकनृपती । पीठेंसर्वनिगुती । उपासितांचीभगवती । फलदहोयसेवका ॥८२॥
काशीमाजीगौरीमुख । पूर्वींतेथेंपडलेदेख । मुखपीठावरीप्रमुख । विशालाक्षीविराजे ॥८३॥
नैमिषनाम आरण्यी । नामेदेवीलिंगधारीणी । प्रयागीललिताभवानी । गंधमादनीकामुका ॥८४॥
कुमुदादक्षिणमानसी । तैसीच उत्तरमानसी । विश्वकामपुरणीसी । विश्वकामप्रपूरणा ॥८५॥
गोमतनामपर्वती । देवीअसेगोमती । तैसीमंदरपर्वती । कामचारिणीपरांबा ॥८६॥
मदोत्कटाचैत्ररथी । हस्तनापुरीजयंती । कांन्यकुब्जीगौरीम्हणती । मलयपर्वतीरंभाख्या ॥८७॥
एकांम्रपीठवसती । नामेदेवीकीर्तिमती । विश्वेश्वरीविश्वपीठी । पुष्करातेपुरुहूता ॥८८॥
केदारीसन्मार्गदायिनी । हीमपर्वतीमदानामिनी । गोकर्णीतीभद्रकर्णी । स्थानेश्वरीभवानी ॥८९॥
बिल्वकीबिल्वपत्रीका । श्रीशैलीमाधवीऐका । भद्रेश्वरीभद्रानामका । जयावाराहपर्वती ॥९०॥
कमलालयींकमला । रुद्रकोटीमाजीप्रबला । रुद्राणीनामतिजला । कालंजरीकालिका ॥९१॥
शालग्रामीमहादेवी । जलप्रियाशिवलिंगधामी । महालिंगीकपिलानामी । माकोटीमुकुटेश्वरी ॥९२॥
मायापुराकुमारिका । संतानीललितांबिका । गयेतमंगलानामिका । विमळातिपुरुषोत्तमी ॥९३॥
उत्पलाक्षीसहस्राक्षी । विपाशांत अमोघाक्षी । पुंड्रवर्धनीपाडला ॥९४॥
सुपार्श्वीनारायणी । त्रिकुटींतीरुद्राणी । विपुलींविपुलाभवानी । कल्याणीमलयाचली ॥९५॥
सह्याद्रीनामपर्वती । एकवीराभगवती । हरिश्चंद्रीचंद्रज्योती । रामतीर्थीरमणाख्या ॥९६॥
यमुनातटीमृगावती । कोटवीतेकोटितीर्थी । सुगंधानामेंभगवती । माधववनीविराजे ॥९७॥
गोदावरीतत्रिसंध्या । गंगाद्वारीरतिप्रिया । शिवकुंडपीठठाया । शुभानंदाविराजे ॥९८॥
देवीकेतनंदिनी । द्वारकेतरुक्मिणी । राधानामेवृंदावनी । मथुरेंतदेवकी ॥९९॥
पातालांतपरमेश्वरी । चित्रकुटीसीतांबरी । विंध्यवासिनीविंध्यावरी । कोल्हापुरीमहालक्ष्मी ॥१००॥
विनायकींरुमादेवी । वैद्यनाथीआरोग्यदेवी । महाकालीशांभवी । माहेश्वरीनामिका ॥१०१॥
उष्णनगीअभयदायिनी । विंध्यावरीनितंबिनी । मांडव्यीमांडवीनाम्नी । स्वाहानामेमहेश्वरी ॥१०२॥
छगलंडीप्रचंडिका । अमरकंटकींचंडिका । सोमेश्वरीवरारोहिका । प्रभासीपुष्करावती ॥१०३॥
सरस्वतीतदेवमाता । समुद्रतिरीविख्याता । प्रारावारादेवता । महाभागामहालयीं ॥१०४॥
पयोष्णीचेरम्यतिरीं । देवीअसेपिंगलेश्वरी । कुतशौचिसिंहिकेश्वरी । शांकरीकार्तिकेवनीं ॥१०५॥
लोलाउत्पलावर्ती । सुभद्राशोणसंगमाती । मातासिद्धवनप्रांती । लक्ष्मीदेवीविराजे ॥१०६॥
भरताश्रमीअनंगवती । विश्वामुखीजालंदरपर्वती । ताराकिष्किंदपर्वती । दारुकवनीपुष्ठिका ॥१०७॥
मेधाअसेकाश्मीरी । भीमाहिमाद्रीवरी । तुष्टिनामेविश्वेश्वरी । कपालमोचनीशुद्धिदा ॥१०८॥
कायावरोहीमाता । शंखोद्धारीधरादेवता । पिंडारकींधृतिविख्याता । कलाचंद्रभागेमाजी ॥१०९॥
मच्छोदिशिवधारिणी । अमृतानामेजेथेंवेणी । उर्वशीबदरकाननी । उत्तरकुरुंत औषधी ॥११०॥
कुशोदकाकुशद्वीपांत । मन्मथाहेमकूटांत । सत्यवादिनीकुमुदांत । अश्वथांतबंदिनी ॥१११॥
कुबेरगृहींनिधिनाम्नी । गायत्रीअसेब्राम्हणी । पार्वतीशिवसंनिधानी । इंद्राणीदेवसंनिध ॥११२॥
ब्रम्हमुखीसरस्वती । सूर्यामाजीप्रभाज्योती । वैष्णवीमातृमध्यवर्ती । अरुंधतीसतींत ॥११३॥
तिलोत्तमाअप्सरांत । ब्रम्हकलाचित्तांत । सर्वत्ररुप असेव्याप्त । परांबेचेजन्मेजया ॥११४॥
अष्टोत्तरशतनामावळी । पठणकरितांत्रिकाळीं । सर्वकामनाचंद्रमौळी । पुरवीत्याचीपरांबा ॥११५॥
एकशेंसत्तेचाळीस । पद्यात्मकभागवतास । देवीबोलेपीठाख्यानास । भाषारुपेगोडहें ॥११६॥
देवीविजये सत्पमेदशमः ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : February 26, 2023
TOP